जाहिरात
4 minutes ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार की, मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप सरकारकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. दरम्यान जुनी विधानसभा बरखास्त होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यताआहे. तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत एकनाथ शिंदे काळजी वाहू मुख्यमंत्री राहतील. आज जुनी विधानसभा बरखास्त होत असून तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे. 

Live Update : सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणाचा लढा उभारणार - मनोज जरांगे पाटील

निवडणूक संपली, लवकरच सरकार स्थापन होईल. आता मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारायचा असं आवाहन मनोज जरांगे यांनी बीडमधून केलं आहे. मराठा समाजाने आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा असे आदेश देखील जरांगे यांनी मराठा समाजाला दिले आहेत. मनोज जरांगे यांनी सरकार स्थापन होताच पुन्हा आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केले आहे. सर्व समाजाने आपले शेतीतील कामे आटवून आंतरवाली सराटीकडे येण्याचं आवाहन पाटलांनी केले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही. तोपर्यंत आंदोलन आणि उपोषणावर ठाम असणार असल्याचा देखील जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. 

Live Update : परळी विधानसभा मतदारसंघात 120 बुथवर मृतांनी मतदान केलं, राजेसाहेब देशमुखांचा गंभीर आरोप

परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी या मतदानाबाबत गंभीर आरोप केले होते. आज पुन्हा एकदा राजेसाहेब देशमुख यांनी परळी मतदार संघात 120 बुथवर मयतांचे मतदान झाले असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही ते म्हणाले आहेत. त्याची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केली होती मात्र त्यावर कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. असेही देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना परळी विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Live Update : महापुजेचा मान नाशिक जिह्यातील शिंपी टाकळी गावच्या अशोक व अलका लोखंडे दाम्पत्यास

कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 728 व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त देवाची आळंदी भक्तांच्या गर्दीने सजलीय,

उत्पत्ती एकादशीनिमित्त आज पहाटेच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक आणि दुधराती करण्यात आली. यंदा महापुजेचा मान नाशिक जिह्यातील शिंपी टाकळी गावच्या अशोक व अलका लोखंडे या दांपत्यास मिळालाय,  पवित्र इंद्रायणी नदीचा काठ देखील भक्तांच्या गर्दीने भरून गेलाय तर पहाटेपासून माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शन बारीत भाविक थांबल्याच चित्र पाहायला मिळतंय.

Live Update : शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरू

शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरू असून शिवसेनेच्या महत्वाच्या संजय राठोड यांच्या शिवनेरी बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे.  

उदय सामंत दादा भुसे अर्जुन खोतकर संजय शिरसाट संजय राठोड आदी नेते बैठकीला उपस्थित.

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी 

शरद पवार पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल 

अजित पवार यांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला

घड्याळ चिन्हासोबत जोडल्या गेलेल्या भावना आणि त्याबाबतचा लाभ घेण्याचाही प्रयत्न केला 

पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्याची परवानगी द्या, शरद पवार यांच्या पक्षाची मागणी

Live Update : मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी डिसेंबरमध्ये, रावसाहेब दानवेंनी दिले संकेत

मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी डिसेंबरमध्ये, रावसाहेब दानवेंनी दिले संकेत

Live Update : येत्या काही दिवसांत नवे सरकार स्थापन होईल - दीपक केसरकर

राजीनामा ही औपचारिकता असते, तसा तो राज्यपालांना सोपवला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्यास राज्यपालांनी सांगितले आहे. 

येत्या काही दिवसांत नवे सरकार स्थापन होईल.  उद्या भाजपची गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महायुतीच्या तीनही पक्षांच्या प्रमुखांची बैठक होईल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी यासंदर्भात निर्णय घेतील.

प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, मात्र तीनही पक्षांनी स्पष्टपणे सांगितलंय की जो निर्णय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेतील तो आम्हाला मान्य असेल.

बोलावले जाईल तेव्हा तिघेही दिल्लीला जातील. तिन्ही नेत्यांचं एकमत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने आम्ही काम करू. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की जो आपण निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे त्यांनी वरिष्ठांना सांगितले आहे.

- दीपक केसरकर

Live Update : एकनाथ शिंदे नाराज नाहीत, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल - दीपक केसरकर

एकनाथ शिंदे नाराज नाहीत, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल - दीपक केसरकर

Live Update : नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तिच व्यक्ती मुख्यमंत्री होईल - दीपक केसरकर

नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तिच व्यक्ती मुख्यमंत्री होईल - दीपक केसरकर

Live Update : एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला...

Live Update : देवेंद्र फडणवीसांसाठी लाडक्या बहिणी गणेश मंदिरात पोहोचल्या!

गणेश मंदिरात लाडक्या बहिणी पोहोचल्या

नागपूर येथील टेकडी गणेश मंदिरात भाजपच्या महिला कार्यकर्त्या एकत्रित झाल्या आहेत. भाजप महिला आघाडीच्या वतीने देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रिपदी निवड व्हावी यासाठी गणेशाची आरती करण्यात येणार आहे.

Live Update : एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Live Update : मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनावर दाखल

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनावर दाखल

Live Update : वर्षा बंगल्यावरुन एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना..

वर्षा बंगल्यावरुन एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना..

Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल

मुख्यमंत्रिपदावरुन शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसदेखील राजभवनावर दाखल होतील. 

Live Update : भाजपच्या मोर्चा आणि प्रकोष्ठ प्रमुखांची आज प्रदेश कार्यालयात बैठक

भाजपच्या मोर्चा आणि प्रकोष्ठ प्रमुखांची आज प्रदेश कार्यालयात बैठक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार आढावा

महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चासह उद्योग आघाडी प्रकोष्टचे संयोजक उपस्थित राहणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू

दुपारी १२ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन

Live Update : पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभेतील उमेदवारांना एक महिन्याच्या आत द्यावा लागणार निवडणूक हिशोब

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभेतील उमेदवारांना एक महिन्याच्या आत द्यावा लागणार निवडणूक हिशोब

303 उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम तपशील 23 डिसेंबर पर्यंत द्यावा लागणार

संबंधित खर्चाची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्च निरीक्षकांकडून पाठवला जाणार

Live Update : शिवसेना खासदार सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, सूत्रांची माहिती

शिवसेना खासदार सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, सूत्रांची माहिती

मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना आमदार आणि खासदार आग्रही

राज्यातील सद्य परिस्थिती आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूका लढवल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा एकनाथ शिंदेच असावा असं खासदारांचं म्हणणं आहे

Live Update : अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्यरेल्वेची वाहतूक काही काळ उशीराने

मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ उशिराने

अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला गेले होते तडे

रेल्वेकडून तडे गेलेला तुकडा बदलण्यात आला

यानंतर वाहतूक सुरू झाली असली, तरी वेळापत्रक मात्र कोलमडलेलं आहे...

Live Update : अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाला प्रति किंटल 8 हजारांचा बाजारभाव...

अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाला प्रति किंटल 8 हजाराचा बाजारभाव...

दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच लिलाव...

कापसाला 8 हजार रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकरी आनंदात 

आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून कापूस खरेदीचा शुभारंभ..

खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ..

Live Update : पुणतांबा येथे लसीकरण केल्यानंतर दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

पुणतांबा येथे लसीकरण केल्यानंतर दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू, चुकीची लस दिल्याचा नातेवाईकांचा आरोप, राहाता पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.

Live Update : 26/11 हल्ल्यातील शहिदांना अभिवादन, राज्यपालांनी वाहिली आदरांजली

26/11 हल्ल्यातील शहिदांना अभिवादन, राज्यपालांनी वाहिली आदरांजली

यावेळी पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. 

Live Update : इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये बिघाड, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान लोकल खोळंबल्या; नोकरदारवर्गाला फटका

पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नोकरदारवर्गाला मोठा झटका बसला आहे. इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याने अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान लोकल गाड्यांची रांग लागली आहे. २० मिनिटांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. 

Live Update : मनमाड परिसरात पारा घसरला; हुडहुडी वाढली

वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात अचानक थंडी जाणवू लागल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे..नाशिकच्या ग्रामीण भागात हुडहुडी वाढू लागली असून या थंडीपासून बचाव करण्याकरिता नागरिक घराबाहेर पडतांना गरम व उबदार कपडे परिधान करत बाहेर निघत आहे. 

Live Update : कोठारी वनपरिक्षेत्रात आढळला वाघाच्या बछड्याचा मृतदेह

मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्रातील चिवंडा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.138 मध्ये बछड्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वाघ मादी असून तिचे वय सात ते आठ वर्ष असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मादी शावखाचा शरीरावर ओरखडल्याचे निशाण आढलले आहेत. मृतक वाघिणीचे सर्व अवयव व्यवस्थित आहेत. प्रौढ नर वाघाने मादी शावकाला मारल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक शेंडगे यांचा मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे करीत आहेत. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.

Live Update : चंद्रपुरात पुन्हा शस्त्रसाठा जप्त, आरोपी ताब्यात

चंद्रपुरात शस्त्र सापडण्याच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. सोमवारला पुन्हा एका तरुणाकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे.नरेश भीक्षपति तूरपाटी असे आरोपीचे नाव आहे.तो मूळचा तेलंगणा राज्यातील असून सध्या तो शहरातील नरेंद्र नगर येथे वास्तव्यास आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेने केली असून  पुढील तपास सुरू आहे.

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Live Update : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून मंगळ ग्रह देवतेला घालण्यात आलं साकडं

राज्यात भाजपाला मिळालेल्या यशामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे, यासाठी अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी महापूजा व होम हवन करण्यात आले असून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांकडून मंगळ ग्रह देवतेला साकडे देखील घालण्यात आले आहे.

Live Update : तानाजी सावंत की राणा जगजीतसिंह पाटील, धाराशिव जिल्ह्यात कोणाला मिळणार मंत्रीपद?

तानाजी सावंत की राणा जगजीतसिंह पाटील, धाराशिव जिल्ह्यात कोणाला मिळणार मंत्रीपद? दोघंही शर्यतीत

Listen to the latest songs, only on JioSaavn.com