पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह जवळील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून 26 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं होतं. (Maharashtra Rain Update) मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. दरम्यान आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सकाळपासून कल्याण, बदलापूर, डोंबिवली भागात (Rain Alert) मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पहाटेच्या सुमारास कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. दीड दोन तास कोसळलेल्या पावसामुळे कल्याणमधील स्टेशन परिसरात केडीएमसीच्या पार्किंग इमारतीसमोरील रस्त्यावर पाणी साचलं. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना स्टेशन गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागलो. रिक्षा चालक, वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला.
मुंबईत यंदा पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडला आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत सुमारे अडीच हजार मिमी पाऊस पडतो. या वार्षिक सरासरीचा विचार करता यंदा आतापर्यंत मुंबईत शहर आणि उपनगरांत एकूण 102.45 टक्के पाऊस पडला. दरम्यान, मुंबईत बुधवारी संध्याकाळी पडलेल्या परतीच्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. त्यामुळे मुंबईत पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी संध्याकाळपासून पडलेल्या पावसाने मुंबईकरांची त्रेधा उडविली. मुंबई सुमारे 10 ठिकाणी घराचा भाग पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोकल ठप्प झाल्यामुळे घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.
सिनेट निवडणुकीत युवा सेनेचे 10 पैकी 9 उमेदवार विजयी ABVP चा धुव्वा
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत युवा सेनेने भाजप प्रणीत एबीव्हीपीचा धुव्वा उडवला आहे.
गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू बिबेक देबरॉय यांचा राजीनामा
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपती अजित रानडे यांची नियुक्ती रद्द झाल्याचे प्रकरण गाजत असताना, संस्थेचे कुलगुरू बिबेक देबरॉय यांनी राजीनामा दिला आहे.
सिनेट निवडणुकीत युवा सेनेचे 8 उमेदवार विजयी
सिनेट निवडणुकीत युवा सेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत घोषीत झालेल्या 10 पैकी 08 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सिनेट निवडणुकीत युवा सेनेचे 8 उमेदवार विजयी
सिनेट निवडणुकीत युवा सेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत घोषीत झालेल्या 10 पैकी 08 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सिनेट निवडणूक : खुल्या गटातून युवासेनेचे प्रदीप बाळकृष्ण सावंत हे विजयी
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत युवासेनेचे खुल्या गटातील उमेदवार प्रदीप बाळकृष्ण सावंत हे पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
बदलापूर प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधा, उच्च न्यायालयाचे निर्देश
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी सकाळी धाव घेतली होती. या प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. अंत्यसंस्कारासाठी दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याने जागा देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.
सिनेट निवडणूक, राखीव प्रवर्गातील युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी
सिनेट निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. राखीव प्रवर्गातील पाच जागांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पाचही जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. शीतल देवरुखकर , स्नेहा गवळी, मयूर पांचाळ, शशिकांत झोरे आणि धनराज कोहचाडे हे विजयी झाले आहे.
सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर
सिनेट निवडणूक निकाल :
- युवासेना उमेदवार मयुर पांचाळ विजयी, ओबीसी प्रवर्गातून युवासेना उमेदवार विजयी
- युवासेनेचे पाचही उमेदवार आघाडीवर
सिनेट निवडणुकीत निकाल हाती येण्याआधी ABVP उच्च न्यायालयात
सिनेट निवडणुकीत निकाल हाती येण्याची काही तास आधी अखिल भारतील विद्यार्थी परिषद ही युवासेना विरुद्ध उच्च न्यायालयात गेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सिनेट निवडणुकीच्या आधी युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांच्या पोलिंग एजंटमध्ये हेराफेरीचा आरोप अखिल भारतील विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला आहे. भोईर यांचा पोलिंग एजंट स्वप्नील सरवदे होते. मात्र ऐन वेळी स्वप्नील मढवी जे उपविधानसभा प्रमुख ऐरोली युवासेना आहेत, त्यांना तेथे बसवले असल्याचा आरोपी ABVP ने केला आहे. अल्पेश भोईर यांची मते ग्राह्य धरली जाऊ नये तसेच त्यांची सर्व मते बाद करावी अशी मागणी ABVPकडून करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयासमोर महिलेचा धिंगाणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका महिलेने धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयातील कार्यालयाची मोडतोड करीत तिने घोषणाबाजीही केली. ही महिला मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटने मंत्रालयाच्या आत गेली होती.पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एका गटात नाराजी
सिद्धिविनायकाच्या मंदिर ट्रस्ट पदी नियुक्ती प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एका गटात नाराजी असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाकडून मुंबई प्रदेशाला विश्वासात न घेता नियुक्ती केल्यामुळे नाराजीचा सूर आहे. मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांना विश्वासात न घेता तीन सदस्यांची नेमणूक केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे जी नावे पाठवण्यात आली त्याबाबत मुंबई अध्यक्षांना कळवल नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबई प्रदेश मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात किती मिमी पाऊस झाला?
- महाराष्ट्रात 1 जून 2024 ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत 1161.2 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
- महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून सहाजणं जखमी झाले आहेत.
- राज्यातील सर्व धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा 86.63 टक्के इतका आहे. गेल्यावर्षी हा पाणीसाटी 70.77 टक्के इतका होता.
शिवसेना शिंदे गटाला आणखी एक महामंडळ मिळणार ?
नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसेंचे पुनर्वसन होण्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच एका महामंडळाच्या अध्यक्षपदी गोडसे विराजमान होण्याची शक्यता आहे. 'एकनाथ शिंदे न्याय देतील' असं म्हणत गोडसेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. गोडसेंना महामंडळ मिळाल्यास महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात
मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. परिणामी सायन गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाणी जरी साचलं असलं तरी अजून वाहतूक कोंडीवर याचा परिणाम दिसून आलेला नाही.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतपत्रिकांच्या छाननीला सुरुवात
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतपत्रिकांच्या छाननीला सुरुवात झाली असून ७२०० मतपत्रिकांच्या एकूण बारा पेट्या खुल्या करण्यात आल्या आहेत. आता या छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली असून छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोटा ठरवला जाईल.
कपालेश्वर मंदिरातील त्या पाचही दानपेट्या अखेर सील
अखेर कपालेश्वर मंदिरातील त्या पाचही दानपेट्या सील झाल्या आहेत. नाशिक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या प्रसिद्ध श्री कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीच्या हिश्श्यावरून गुरवांमध्ये वाद-विवाद सुरू होते. दानपेटीच्या वादावरून मंदिराची शहरभर चर्चा रंगली होती. मंदिराच्या सीसीटीव्ही वरून गुरवांचे वाद सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर नाशिकच्या धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. मंदिरातील दानपेटीला सुद्धा सील करण्यात आले आहे. पंचवटी पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील पाचही दानपेट्या सील करण्यात आल्या आहेत.
अजित रानडेंना मोठा दिलासा..
अजित रानडे हे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू म्हणून 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहू शकतात असा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.