जाहिरात
1 hour ago
मुंबई:

पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह जवळील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून 26 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं होतं. (Maharashtra Rain Update) मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. दरम्यान आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सकाळपासून कल्याण, बदलापूर, डोंबिवली भागात (Rain Alert) मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पहाटेच्या सुमारास कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. दीड दोन तास कोसळलेल्या पावसामुळे कल्याणमधील स्टेशन परिसरात केडीएमसीच्या पार्किंग इमारतीसमोरील रस्त्यावर पाणी साचलं. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना स्टेशन गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागलो. रिक्षा चालक, वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला.

मुंबईत यंदा पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडला आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत सुमारे अडीच हजार मिमी पाऊस पडतो. या वार्षिक सरासरीचा विचार करता यंदा आतापर्यंत मुंबईत शहर आणि उपनगरांत एकूण 102.45 टक्के पाऊस पडला. दरम्यान, मुंबईत बुधवारी संध्याकाळी पडलेल्या परतीच्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. त्यामुळे मुंबईत पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी संध्याकाळपासून पडलेल्या पावसाने मुंबईकरांची त्रेधा उडविली. मुंबई सुमारे 10 ठिकाणी घराचा भाग पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोकल ठप्प झाल्यामुळे घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. 

शिवसेना शिंदे गटाला आणखी एक महामंडळ मिळणार ?

नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसेंचे पुनर्वसन होण्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच एका महामंडळाच्या अध्यक्षपदी गोडसे विराजमान होण्याची शक्यता आहे. 'एकनाथ शिंदे न्याय देतील' असं म्हणत गोडसेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. गोडसेंना महामंडळ मिळाल्यास महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. परिणामी सायन गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाणी जरी साचलं असलं तरी अजून वाहतूक कोंडीवर याचा परिणाम दिसून आलेला नाही. 

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतपत्रिकांच्या छाननीला सुरुवात

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतपत्रिकांच्या छाननीला सुरुवात झाली असून ७२०० मतपत्रिकांच्या एकूण बारा पेट्या खुल्या करण्यात आल्या आहेत. आता या छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली असून छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोटा ठरवला जाईल. 

कपालेश्वर मंदिरातील त्या पाचही दानपेट्या अखेर सील

अखेर कपालेश्वर मंदिरातील त्या पाचही दानपेट्या सील झाल्या आहेत. नाशिक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या प्रसिद्ध श्री कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीच्या हिश्श्यावरून गुरवांमध्ये वाद-विवाद सुरू होते. दानपेटीच्या वादावरून मंदिराची शहरभर चर्चा रंगली होती. मंदिराच्या सीसीटीव्ही वरून गुरवांचे वाद सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर नाशिकच्या धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. मंदिरातील दानपेटीला सुद्धा सील करण्यात आले आहे. पंचवटी पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील पाचही दानपेट्या सील करण्यात आल्या आहेत. 

अजित रानडेंना मोठा दिलासा..

अजित रानडे हे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू म्हणून 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहू शकतात असा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 

कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, उद्या काय असेल स्थिती?

गुजरातच्या भावनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली

Switch To Dark/Light Mode
Previous Article
'जगून काय करणार? लेक अकरावीला पण...' त्या, एका कारणासाठी पती- पत्नीचं टोकाचं पाऊल
Maharashtra Rain Update : मुसळधार की रिमझिम, मुंबई, ठाण्यात आज काय आहे पावसाचा अंदाज? 
Raj Thackeray entry and Shiv Sena party split Eknath Shinde film Dharmaveer 2 controversy
Next Article
धर्मवीर-2 च्या कथानकातील राज ठाकरेंची एन्ट्री ठरणार वादाचं कारण? चित्रपटात नक्की काय दाखवलंय?