जाहिरात

Uddhav Thackeray: 'काळ्या विद्येमुळे संधी हुकली..', विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरे हे काय बोलले?

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. 

Uddhav Thackeray: 'काळ्या विद्येमुळे संधी हुकली..', विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरे हे काय बोलले?

विशाल पुजारी, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिक्षक सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज दादरमध्ये पार पडत आहे.  या अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"गुरूजनांना मी काय मार्गदर्शन करणार, मात्र  आपल्या व्यतिरिक्त जे दिवटे आहेत त्यांना मार्गदर्शन केलंच पाहिजे. मलाही खात्री नव्हती की शिक्षक मतदार संघ आपण जिंकू पण ते तुमच्यामुळे जिंकलो.  ताकदीने लढलो आणि जिंकलो, शिक्षक आणि शिवसेना हे कधी जुळेल असं वाटलं नव्हतं पण ते जुळलं. तुमच्या इतक्या मागण्या की मी मुख्यमंत्री झालोय असं वाटू लागलं, " अशी फटकेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली. 

पंतप्रधान मोदींवर टीका..

"कुंभात जाऊन अनेक जण डूबकी मारली , पंतप्रधानांनी पण मारली. पण आज अनेक गणपतींचे विसर्जन नाही. मी घरी बसलो असं बोलतात अरे पण मी काम करून दाखवलं, काम करून सुद्धा हा खोटा निकाल लागला, हा निकाल मी मानत नाही. काम करून सुद्धा हा खोटा निकाल लागला, हा निकाल मी मानत नाही. दिल्लीत अरविंद केजरीवालांनी काम केले, हा गडबड घोटाळाच आहे," असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )

काळ्या विद्यांमुळे पराभव...

"आरएसएस जसं करतं की जिथे जाते तिथे पोखरंत. आपल्याला वाळवी सारखं काम करायचं नाही. जिथे जाऊ तिथे काम करा , वाळवी सारखं काम आपण नाही करायचं.  शिक्षकांनो तुम्ही सदस्य नोंदणी करून घ्या. काळ्या विद्या असतील किंवा आणखी काही माध्यम असतील त्यामुळे आपली संधी हिरावली , कारण जिथं जिथं जाईल तिथे लोक बोलत आहेत तुमचा पराभव होऊ शकत नाही," असे सर्वात मोठे विधानही त्यांनी केले.