जाहिरात
Story ProgressBack

'तुम्ही सर्वात बेस्ट सूनबाई!' कोणी दिली सुनेत्रा पवारांनी ही शाबासकी

Lok Sabha Election 2024: सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रविवारी (21 एप्रिल) मुळशी तालुक्यामध्ये प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळेस सर्वात बेस्ट सूनबाई असे म्हणत त्यांना शाबासकी देण्यात आली. कोणी केले त्यांचे कौतुक?

Read Time: 2 min
'तुम्ही सर्वात बेस्ट सूनबाई!' कोणी दिली सुनेत्रा पवारांनी ही शाबासकी

- प्रतीक्षा पारखी/पुणे
Sunetra Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या रविवारी (21 एप्रिल) मुळशी तालुक्यामध्ये प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ताथवडे येथेही भेट दिली. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ताथवडे येथे येणार म्हणून माजी खासदार नाना नवले (Nana Navale) हे देखील त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. नवले यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी घरामध्ये पाऊल टाकताच नाना नवले म्हणाले, "तुम्ही सर्वात बेस्ट सूनबाई आहात" (यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ-you are one of the best daughter in law). माजी खासदार नाना नवले यांच्या या वक्तव्यामागे नेमकी कोणत्या विषयाची पार्श्वभूमी आहे? हे ओळखून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. तर सुनेत्रा पवार यांनी नाना नवले यांना नमस्कार करून त्यांनी केलेली प्रशंसा नम्रपणे स्वीकारली. 

(नक्की वाचा : सभेनंतर काँग्रेसच्या 2 नेत्यांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी, गाडीची फोडली काच)

शरद पवारांचे ते विधान आणि टीका 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी संबंधित विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 'मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार' असे विधान केले होते. यावरून विधानावरून शरद पवार यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. कधी नव्हे तर पवार यांनीही केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले होते. वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला असे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या विधानावरून आता माजी खासदार नाना नवले यांनीही सुनेत्रा पवार यांची पाठराखण करत "तुम्ही सर्वात उत्तम सून आहात" असे म्हणत त्यांना शाबासकी दिली आहे. 

(नक्की वाचा : उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी)

काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनीही नाना नवले यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळेसही त्यांनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना दर्शवला होता. आता त्यांनी शाब्बास सूनबाई म्हणत सर्वात बेस्ट सून असल्याचे दिलेले प्रशस्तीपत्र महत्त्वाचे मानले जात आहे.  

(नक्की वाचा : 'उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय'; राधाकृष्ण विखे पाटलांची टीका)

VIDEO: पवारांनी सांगितले मविआ किती जागा जिंकणार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination