पुन्हा माढ्याचा तिढा; तानाजी सावंत यांच्या बंधूंची महायुतीकडे टेन्शन वाढवणारी मागणी

माढा विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन शिंदे हे आमदार आहेत. नुकतीच आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या निवडणुकीमध्ये आमदार शिंदे यांचे चिरंजीव रणजीतसिंह हे इच्छुक आहेत. अशातच माढा मतदारसंघाच्या जागेवर आता शिवसेनेच्या शिवाजी सावंत यांनी दावा केला.

Advertisement
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही माढा मतदारसंघाचा तिढा वाढणार आहे. माढा मतदारसंघात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी आता थेट आमदारकीची मागणी केली. विधानसभेला उमेदवारी अन्यथा राज्यपाल नियुक्त आमदारकी द्या. अन्यथा युतीधर्म पाळणार नाही, अशी थेट भूमिका माढा मतदारसंघात शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघाचे राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माढा विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन शिंदे हे आमदार आहेत. नुकतीच आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या निवडणुकीमध्ये आमदार शिंदे यांचे चिरंजीव रणजीतसिंह हे इच्छुक आहेत. अशातच माढा मतदारसंघाच्या जागेवर आता शिवसेनेच्या शिवाजी सावंत यांनी दावा केला. शिवाजी सावंत यांनी घेतलेल्या मेळाव्यात मोठे शक्ती प्रदर्शन केले. माढा मतदारसंघाच्या जागेवेर आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत, अशी उघड भूमिका त्यांनी घेतली. 

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंनी घातलं काँग्रेसचं उपरणं ! बाळासाहेबांचं नाव घेत म्हणाले...)

एकीकडे शिंदे - सावंत यांची उमेदवारी पुढे येत असताना. दुसरीकडे अभिजीत पाटील यांनीही माढा मतदारसंघातून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र या सर्वांमध्ये आता उमेदवारी द्या अन्यथा राज्यपाल नियुक्त आमदारकी द्या. मात्र आमदारकी हवीच, अशी जाहीर आणि उघड भूमिका शिवसेनेने घेतली आहे. 

( नक्की वाचा : 'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप )

शिवसेना नेते शिवाजी सावंत यांना उमेदवारी द्या, अन्यथा राज्यपाल नियुक्त आमदारकी द्या तरच विधानसभा निवडणुकीत युतीधर्म पाळला जाईल. अन्यथा 75 हजार मताहून अधिक कार्यकर्त्यांचा सावंत परिवार वेगळी वाट पकडेल, असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे माढ्यातील तिढ्याचे राजकारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पाहायला मिळणार आहे. 

Advertisement

लोकसभा निवडणुकीतही उमेदवारीवरून राज्यात माढ्याचा तिढा गाजला होता. यानंतर आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत आता तीन पक्षाचे युतीमध्ये आमदारकीवरून माढ्याचा तिढा अधिक गुंतागुंतीचा होणार असल्याची लक्षणे दिसत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article