जाहिरात

'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप

'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप
CM Eknath Shinde (Photo ANI )
मुंबई:

'भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडून त्यांना बॅकफुटवर ढकलण्याच्या योजनेचा भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्लॅन होता. मी त्यावर आक्षेप घेतला त्यावेळी त्यांनी मला अटक करण्याचीही योजना बनवली होती,' असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा मोठा आरोप केलाय. आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी यापूर्वी ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि तेंव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याची योजना आखली होती, असा आरोप केला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होता प्लॅन?

'मला या गोष्टीचं वाईट वाटतं. त्यांनी सर्व योजना तयार केली होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करणार असल्याचं सांगितलं तेव्हा मी त्यावर आक्षेप घेतला. पण या प्रकारामुळे भाजपा बॅकफुटवर जाईल. त्यांचे अनेक आमदार महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं.

मी विरोध केल्यानंतर हे काहीही चुकीचे नाही.  त्यांनी आपल्याला त्रास दिला आहे. त्यामुळे आपणही हे सर्व केलं पाहिजे आणि आपण हे सर्व करणार आहोत सर्व बरोबर आहे, असं त्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

'शहरातील जमीन विक्री प्रकरणाची ती केस होती. त्या प्रकरणात मला अडकवण्याचीही त्यांची योजना होती. काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर मला हा संशय होता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला त्यांची पूर्ण योजना समजली', असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला.

( नक्की वाचा : मुलगा जय विधानसभा निवडणूक लढवणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर )

अनिल देशमुखांवर आरोप

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही  तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला Z प्लस दर्जाची सुरक्षा देण्यास नकार दिला होता, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला. 'मी नगरविकास मंत्री होतो त्यावेळी गडचिरोलीच्या विकासाबाबतचा ठराव संमत केला होता. त्यामुळे चिडलेल्या नक्षलवाद्यांनी मला मारण्याची धमकी दिली होती. पोलीस, गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा दल या सर्वांनी मला झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस केली होती, पण देशमुखांनी ती सूचना फेटाळली, असा दावा शिंदे यांनी केला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Exclusive: औरंगजेबाची कबर आणि आग्रामधील जामा मशिद देखील वक्फची संपत्ती!
'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप
Nitesh Rane has criticized Shiv Sena leader Ramdas Kadam
Next Article
'भाजपच्या मतांशिवाय मित्रपक्षाचे उमेदवार निवडून येणार नाहीत' राणेंनी थेट सुनावले