
विशाल पुजारी, कोल्हापूर:
Kolhapur Social Media Campaign For Madhuri Elephant: कोल्हापुरमध्ये सध्या माधुरी हत्तीणची जोरदार चर्चा आहे. नांदणीच्या महादेवी मठातील माधुरी हत्तीणची वनतारा येथे रवानगी करण्यात आली. ज्यानंतर कोल्हापुरकरांसह राज्यभरात याला जोरदार विरोध होत आहे. कोल्हापुरकरांनी तब्बल 30 वर्ष सांभाळलेली माधुरी वनतारामध्ये नेण्यास जोरदार विरोध करत थेट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाही आव्हान दिले आहे. माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापुरकरांनी अनेक मार्गाने आपला लढा तीव्र केला आहे.
काही दिवसांपूर्वीच माधुरीसाठी नांदणीसह समस्त कोल्हापुरकर रस्त्यावर उतरले होते. राजकीय नेत्यांसह, महिला, तरुण, वृद्धांच्या गर्दीत तब्बल ४५ किलोमीटर निघालेला हा मोर्चा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता नांदणीकरांनी माधुरीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवी मोहिम सुरु केली आहे. कोल्हापुरात माधुरी हत्तीणसाठी आज (6 ऑगस्ट) सोशल मीडिया मोर्चा निघणार आहे.
Mumbai News: माधुरी नांदणीत परतणार! CM फडणवीसांची वनतारासोबत बैठक, काय निर्णय झाला?
'आपली लढाई अजून संपली नाही. कारण अजून आपली माधुरी आपल्या घरी आली नाही' म्हणत कोल्हापुरकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला जाग येण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या भावना पूर्ण भारताला कळण्यासाठी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर माधुरीसाठी कॅन्पेनिंग होणार आहे. यासाठी खास नियमावलीही जाहीर केली आहे.
सोशल मीडियाची का गरज आहे?
सरकारला जाग येण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या भावना पूर्ण भारताला कळण्यासाठी सर्व आपण twiter म्हणजे X ऍप वर आपल्या माधुरीसाठी कॅम्पेन सुरू करू, असा संदेश सर्व कोल्हापुरकरांना पाठवण्यात आला आहे.
पोस्ट मधे काय लिहायचं?
1) तुमच जर X वर अकाउंट नसेल तर काढा
2) पोस्ट मधे लिहीत असताना आपल्या भावना लिहा किवा माधुरीचा फोटो, व्हिडिओ असेल तर पोस्ट करा.
3) सर्वांत महत्वाचं आपले #bringbackmadhuri आणि #myvillegemyelephant हॅशटॅग न विसरता टाका
4) पोस्ट करताना आपल्या महाराष्ट्र सरकार आणि centeral goverment च्या forest deparment metion करा.
सर्वानी कधी पोस्ट करायची?
दिनांक:-6 ऑगस्ट, वार - बुधवार
वेळ :- 9.00 वाजल्या पासून सुरुवात करायची
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world