जाहिरात

लंडनहून आणलेल्या महाराजांच्या वाघनखांचा साताऱ्यातील संग्रहालयात आज भव्य सोहळा

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी नेते उपस्थित राहतील.

लंडनहून आणलेल्या महाराजांच्या वाघनखांचा साताऱ्यातील संग्रहालयात आज भव्य सोहळा
सातारा:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त गेल्या वर्षभर उत्सुकता लागून (Chhatrapati Shivaji Maharaj) राहिलेली वाघनखे मोठ्या कडक बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आली. ही वाघनखे आणताना पुरेपूर गुप्तता पाळण्यात आली होती. शिवछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखे ठेवण्यात आली आहेत. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखे शिवभक्तांना दर्शनासाठी आज दिमाखदार सोहळ्यानंतर उपलब्ध होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धकाळात वापरलेली वाघनखे ही साताऱ्यात अत्यंत गुप्तता पाळत पोलीस बंदोबस्तात 17 जुलै रोजी आणण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्हास्तरावर महानाट्याचे आयोजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्याशी निगडित घटना, स्थळे व महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित 13 विशेष टपाल तिकिटांचे व टपाल आवरणाचे अनावरण करण्यात येणार आहे. पुढील सात महिने ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

नक्की वाचा - Rain Update : शुक्रवारची सकाळ काळ्या ढगांनी, मुंबईत मुसळधार तर कोकणाला रेड अलर्ट

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्रप्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. शिवशस्त्र प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र दालन, वस्त्र दालन, नाण्यांचे दालन व इतर दुर्मीळ वस्तू पाहावयास मिळतील. तलवारी, बंदुकी, भाले, पट्टे, कुऱ्हाडी, कट्यारी, बाण, गदा अशी वेगवेगळी शस्त्रे पाहावयास मिळतील. या स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण शहरभर स्वागत कमानी उभारून बॅनर्स, पोस्टर्स, वस्तूसंग्रहालयाभोवतालची अतिक्रमणे काढून स्वच्छता केली आहे. वस्तूसंग्रहालयाची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम येथून वाघनखे आणण्यात आली आहेत. ही शिवकालीन वाघनखे वस्तूसंग्रहालयातील दालन क्रमांक तीनमध्ये ठेवण्यात आली आहेत. वाघनखाच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सॉर तसेच संरक्षण यंत्रणेने बंदोबस्त चोख ठेवला आहे. दररोज सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इतर प्रेक्षकांना प्रति 10 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वाघनखे पाहण्यास दालन खुले राहणार आहे.

वाघनखे अशी आहेत.... 

* घटक : पोलाद, चामडे व रेशीम

* मोजमाप : लांबी ८.६ सेंमी, खोली ९.५ सेंमी, पट्टीची लांबी ७.५ सेंमी, अंगठ्याचा व्यास २.५ सेंमी (मोठी), २.३ सेंमी (लहान)

* एकूण वजन ४९ ग्रॅम

* नख्यातील अंतर (मोठी अंगठी ते लहान अंगठी) १.८ सेंमी, १.८ सेंमी, १.५ सेंमी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com