shivkalin wagh nakh Exibition : ऐतिहासिक वाघनखांच्या कोल्हापुरातील (Kolhapur News) प्रदर्शनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. मराठाकालीन शास्त्राच्या प्रदर्शनाचा उदघाट्न सोहळा उद्या 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेली वाघनखं प्रमुख आकर्षण असणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरकरांना आता ही वाघनखं पाहता येणार आहेत.
कुठे असेल प्रदर्शन?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ऐतिहासिक वाघनखं आता कोल्हापुरात पाहता येणार आहे. शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाअंतर्गत शिवकालीन वाघनखं नागरिकांना पाहता येणार आहे. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस याठिकाणी हे प्रदर्शन असणार आहे. 28 ऑक्टोबरपासून हे प्रदर्शन सुरू होणार आहे. पुढील सहा महिन्यांपर्यंत हे प्रदर्शन खुले असेल असं सांगितलं जात आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे उदघाट्न होणार आहे. खासदार शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत.
नक्की वाचा - Maharashtra News: शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, तत्काळ अंमलबजावणी
शिवछत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांच्या वापरातील वाघनखे महाराष्ट्रातील जनतेला पाहता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून ही वाघनखं भारतात आणण्यात आली आहेत. त्यामुळे कोल्हापुरात या प्रदर्शनाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून तीन वर्षांसाठी ही वाघनखं भारतात आणण्यात आली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
