जाहिरात
1 minute ago

Maharashtra Assembly Monsoon Sessions LIVE Updates: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. बुधवारी अधिवेशनाच्या कामकाजात शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आजही विरोधक शेतकरी प्रश्नांवरुन सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आज मुख्य म्हणजे विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचे वक्तव्य केलं त्याचा निषेध विरोधकांकडून केला जाणार आहे. त्याचसोबत . मंगेशकर रुग्णालयात जो काही प्रकार घडला त्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आलेल्या जागांविषयी लक्षवेधी आज मांडली जाणार आहे.

LIVE Updates: राज ठाकरेंबाबत वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक

राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक 

पुण्यातील वनाज भागात राहत आहे केदार सोमण 

मनसेच्या कार्यकर्ते चोप देत करणार पोलिसांच्या हवाले 

मनसे कार्यकर्ते आक्रमक 

केदार सोमण अस त्याच नाव

राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात मनसे आक्रमक 

कार्यकर्त्यांना पकडून मनसैनिकांनी केली मारहाण

LIVE Updates: संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै पासून सुरू होणार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारनं  बोलविली सर्वपक्षीय बैठक 

१९ जुलैला संसदेत होणार बैठक

पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून सुरू होणार 

अधिवेशन एक महिना चालणार, २१ ॲागस्ट चालणार

स्वातंत्र्य दिनानिमित्त १३ आणि १४ तारखेला अधिवेशन होणार नाही. 

अँकर: संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक १९ जुलै रोजी बोलावली आहे. या बैठकीत विरोधी पक्षांसह एनडीएच्या घटकपक्षांसोबत संसदेतील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी चर्चा होणार आहे.

पहलगाम हल्ला आणि ॲापरेशन सिंदूर नंतर संसदेचे हे पहिलेच  

अधिवेशन असणार आहे. 

कोणते मुद्दे अधिवेशनात गाजणार?

१. पाकिस्तान विरोधात भारताची भूमिका त्याच बरोबर एअर फोर्सचं नुकसान झालं आहे का यांसह अनेक प्रश्नांचा भडीमार विरोधकांनी सरकार केला आहे. 

२. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाक युद्धात मध्यस्थी करण्यावरही विरोधक आक्रमक होणार आहेत.

पावसाळी अधिवेशनातही विरोधात पहलगाम हल्ल्यावरून सरकारला लक्ष्य करणार आहे. 

३. मागील काही महिन्यांपासून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा मतदानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावर प्रश्न उपस्थित केले होते.

४. अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

LIVE Updates: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी.. पक्षविरोधी कारवाई केल्याने हकालपट्टी केल्याची संजय राऊत यांनी ट्विट करत दिली माहिती

LIVE Updates: नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

- नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

- काही माजी नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी आज करणार भाजपमध्ये प्रवेश

- प्रशांत दिवे, सीमा ताजणे, सचिन मराठे या तिन माजी नगरसेवकांचा आज प्रवेश

- काही दिवसांपूर्वीच महानगरप्रमुख पदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

- तिनच दिवसांपूर्वी मामा राजवाडे यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा झाला आहे दाखलL

LIVE Updates: खासदार विशाल पाटील यांच्यासह 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

 शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलन करणाऱ्या चाळीस आंदोलन शेतकऱ्यांवर धाराशिव शहर पोलिसात गुन दाखल करण्यात आले आहेत. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन न देण्याच्या भूमिकेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. शासनाकडून सुरू असलेली मोजणी प्रक्रिया रोखल्यानंतर मंगळवारी सोलापूर धुळे महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलन केलेल्या या 40 शेतकऱ्यांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. रधारी साडथळा आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका या शेतकऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

LIVE Updates: पुण्याला रात्रभर पावसाची संततधार

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले होते 

पुणे शहरांसह घटमाथ्यावर पावसाने काल रात्री  हजेरी लावली 

शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

घटमाथ्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय.

रात्री 12 पासून 6451 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलाय...

पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलीय.

पाण्याच्या या विसर्ग वाढवल्यानंतर  शहरातील भिडे पुलाला पाणी लागलेलं पाहायला मिळत आहे

LIVE Updates: नाशिकमध्ये एका वकीलावर जीवघेणा हल्ला

- नाशिकमध्ये एका वकीलावर जीवघेणा हल्ला

- माडसांगवी परिसरातील काल सायंकाळची घटना

- रामेश्वर बोराडे यांच्यावर तीन जणांनी केलेला हल्ला CCTV कॅमेरात कैद

- आपल्या कार्यालयात काम करत असताना घडली घटना

- हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट, बोराडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू 

- बोराडे यांनी एका हल्लेखोराला पकडून ठेवताच कुटुंब धावले मदतीला, आजींनीही दिला हल्लेखोराला चोप

- आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

LIVE Updates: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

नगर शहराचे राष्ट्रवादीचे (AP) आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ...

आमदार संग्राम जगताप यांचे  खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली धमकी..

कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल...

या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला 

हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत...

LIVE Updates: बसमध्ये चढताना तरुणाचा मोबाईल चोरी

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे बस स्थानकातून विदगाव कडे जाणाऱ्या बस मध्ये चढताना एका तरुणाचा मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती दरम्यान चोरीची घटना लक्षात येताच एसटी चालकाने एसटी बस थेट पोलीस स्टेशनला घेऊन जात याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी बसमधील प्रवाशांची अंगझडती घेतली असता दोन तरुणांकडे चोरीचा मोबाईल आढळून झाल्याने त्या तरुणांना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईन शेख व फरदीन खान असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

Jalgaon News: रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील पूरग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या धुरखेडा येथे तापी नदीला येत असलेल्या पुरामुळे नदीलगत असलेल्या घरांना धोका निर्माण होत असून त्यामुळे या घरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव हा गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र पुरामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जीवित हानी होण्याचा धोका देखील निर्माण होतो त्यामुळे तातडीने पूरग्रस्त भागातील घरांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली असून तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com