जाहिरात

Maharashtra Board SSC Result 2025 : दहावीच्या निकालाची तारीख ठरली, अवघे काही तास शिल्लक

यंदाचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर करण्यात येणार असल्याची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. 

Maharashtra Board SSC Result 2025 : दहावीच्या निकालाची तारीख ठरली, अवघे काही तास शिल्लक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र दहावीचा (इयत्ता 10वी) निकाल उद्या, मंगळवार 13 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना आपले निकाल शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरुपात पाहता येणार आहे. गेल्या वर्षी 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदाचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदाच्या परीक्षेत 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मुलांची संख्या 8,64,120 आणि विद्यार्थिनींची संख्या  7,47,471 इतकी आहे. याशिवाय 19 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. 

HSC Result 2025 : बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरला, गेल्या 4 वर्षात किती होती टक्केवारी?

नक्की वाचा - HSC Result 2025 : बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरला, गेल्या 4 वर्षात किती होती टक्केवारी?

2024 मध्ये दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला होता. नेहमीप्रमाणे मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त होतं. गेल्या वर्षी 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या, यात मुलांची संख्या 94.56 टक्के इतकी होती. कोकण विभागातून सर्वाधिक (99.01 टक्के) निकाल लागला होता तर नागपूर विभागातून सर्वात कमी (94.73 टक्के) निकाल लागला होता. 

SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा

नक्की वाचा - SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा

कुठे निकाल पाहू शकता : 

mahresult.nic.in
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com