
Maharashtra Assembly Budget Session: 'महायुतीला 100 दिवस होतील. पहिल्या इनिंगमध्ये आम्ही अडीच वर्ष काम केले ते खऱ्या अर्थाने अडीच वर्षाच्या कामाची पोहोचपावती होती. महाराष्ट्राच्या जनतेने प्रत्येक कामात रिझन देणाऱ्यांचा सिझन संपवला.पाच वर्षाची टेस्ट मॅच असली तरी आमची बॅटिंग ट्वेंटी ट्वेंटी सारखीच आहे," असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विधान परिषदेमध्ये ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
राज्याची अर्थव्यवस्था चांगली आहे ती सांभाळायला राज्य सरकार सक्षम आहे. तुम्ही आपली चिंता करा, लोकांच्या न्यायालयाने दाखवले कोण कामाचे कोण घरी बसवणारे हे दाखवून दिले. रोज दुसऱ्यांना शिव्या शाप देऊन बरे होत नसते. गरिबांविषयीचा तुमचा कळवळा किती खरा किती खोटा? हे सर्वजण ओळखून आहेत. काही लोकांनी सरकारविरुद्ध काही आरोपी केलेत, आमच्यामध्ये फूट पडेल, वाद होतील म्हणून देव पाण्यात ठेवलेत, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.
"सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हौ सकता... विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विरोधक चिंतन करतील असे वाटले. डुब गए अहंकार में कई सारे, अब तो सुधर जाओ प्यारे... सपकाळांना देवेंद्रजी औरंगजेबासारखे वाटले. मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना आता समजल असेल. गद्दार कोण याचा निकाल जनतेने आणि अध्यक्षांनी दिला आहे. म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा.. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नक्की वाचा - Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन नवा वाद, नामांतर प्रकरण पेटण्याची शक्यता
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामरा प्रकरणावरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आमच्या बदनामीसाठी काही पाखंडी लोक ठेऊन शिखंडी लोक कट रचत आहेत.तुम्ही जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता पण प्रणित मोरेला मारलं, केतकी चितळेला मारल, राणा दांपत्याला आत टाकलं तेव्हा कुठे होते तुमचे संविधान? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world