जाहिरात
53 minutes ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आज महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आज दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल. सध्याच्या आर्थिक तुटीच्या परिस्थितीत समाजातील तरुण, वृद्ध, शेतकरी, मजूर आदी घटकांच्या अपेक्षांना न्याय देताना राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. 
 

Pune News: अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला एका दिवसाची पोलीस कोठडी

पुण्यामध्ये भरचौकात तरुणाने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता गौरव आहुजाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज त्याला न्यायालयात हजर केले असता आणखी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार- अजित पवार

  • आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार, त्यासाठीच्या जागेसाठी उत्तर प्रदेश सरकारसोबत चर्चा सुरू

  • संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार
  • अटल बिहारी वाजयेपी यांच्या जन्मशताब्दी निमित्त भव्य स्मारक उभारण्यात येणार 

  • बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून  220 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार.

३ ऑक्टोबर मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

मराठी भाषा विभागाला २२५ कोटी प्रस्तावित

३ ऑक्टोबर मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार

३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात सप्ताह म्हणून साजरा होणार

शिर्डी विमानतळाच्या १३६७ कोटींच्या विकासकामांना मान्यता- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

  • शिर्डी विमानतळाच्या १३६७ कोटींच्या विकासकामांना मान्यता
  • शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरु होणार आहे
  • रत्नागिरी विमातळासाटी १४७ कोटींची कामे प्रगतीपथावर
  • अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी निधी उपलब्ध करुन देणार
  • एसटीच्या ६००० डिझेल बसेसचं रुपांतर सीएनजी आणि एलएनजीमध्ये करण्याची प्रक्रिया सुरु
  • नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य केले जाणार

ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग, पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिकेला केंद्राची मान्यता- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

  • ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग, पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिकेला केंद्राची मान्यता
  • पुणे मेट्रोल टप्पा दोन अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप, वारजे, माणिक बाग या दोन मार्गिकांच्या ९८९७ कोटी किमतीचा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. 
  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ असा मेट्रो मार्ग लवकरच हाती घेतला जाणार आहे

मुंबईमध्ये सात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे उभारणार- अजित पवार

मुंबईमध्ये सात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे निर्माण करण्याची सर्वात मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. नवी मुंबईसह, वडाळा, खारघरमध्ये बीकेसीप्रमाणेच व्यापारी केंद्रे उभारली जातील. त्यामुळे मुंंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसीत होईल. कुर्ला, नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल,  खारघर व विरार - बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. यामुळे मुंबईची अर्थव्यवस्था 14 बिलीयन डॉलरवरुन 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.  नवी मुंबईत 250 एकरावर  इनोव्हेशन सिटी उभारणार आहे. रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कडून 10 हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धीमत्ता याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

उत्तन ते विरार उन्नत मार्ग, ५५ किमी , ८७४२७ कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार- अजित पवार

अजित पवार

  • शिवडी-वरळी उन्नत रोड- १०५१ कोटी, मार्च २०२६
  • स्वा.सावरकर सागरी सेतू-वांद्रे ते वर्सोवा दरम्यानचे १४ किमी लांबी, १८१२० कोटींचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
  • उत्तन ते विरार उन्नत मार्ग, ५५ किमी , ८७४२७ कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार
  • येत्या वर्षात मुंबईत ४१.२ किमी, पुण्यात २३.२ किमीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. येत्या 5 वर्षात एकूण २३७.५ किमीचे मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेववरील मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणार- अजित पवार

अजित पवार

  • मुंबई पुणे एक्सप्रेववरील मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणार
  • यामुळे प्रवासा वेळ आणि इंधनाची बचत होईल, वाहतूक कोंडीही कमी आहे
  • वर्सोवा ते मढ खाडी पूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुंलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली असे भूयारी मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
  • यासाठी ६४७८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित 
  • ठाणे ते मुंबई, नवी मुंबई असा आंतरराष्ट्रीय विमातळ उन्नत मार्ग बांधण्याचं लक्ष्य, त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण अशी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार 

२०२५-२६ मध्ये दीड हजार किमी रस्ते बांधण्याचे लक्ष्य- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

  • अमृतकाल राज्य रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित
  • सर्व जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालय जोडण्यासाठी रस्त्यांचा प्रस्ताव
  • रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा एक पूर्ण, दुसरा टप्प्यातील २९३९ कोटींची ४६८ किमी रस्ते सुधारण्याची कामे सुरु, त्यातील ३५० किमीची कामे पूर्ण
  • २०२५-२६ मध्ये दीड हजार किमी रस्ते बांधण्याचे लक्ष्य
  • ६ हजार किमी रस्त्यांचे काँक्रिटिकरण करण्याची कामे सुरु आहे
  • समृद्धी महामार्गांचा अखेरचा टप्पा लवकरच पूर्ण करणार 
  • समृद्धी महामार्गालगत अॅग्रो हब उभारणार

वाढवण बंदरामुळे भारत सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

  • प्रवासी जलवाहतूक आणि किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी आणि बंदर करातून सूट
  • बंदरांच्या करारांचा कालावधी ९० वर्ष
  • वाढवण बंदराचा एकूण खर्च ७६ हजार २२० कोटी, राज्य सरकारचा सहभाग २६ टक्के 
  • जेएनपीटी बंदराच्या क्षमतेपेक्षा वाढवण बंदराची क्षमती तिप्पट असणार आहे
  • २०३० पर्यंत वाढवणमधून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे
  • या बंदरामुळे भारत सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल

गडचिरोलीतील रस्त्यांच्या कामासाठी ५०० कोटींची तरतूद- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

गडचिरोलीतील रस्त्यांच्या कामासाठी ५०० कोटींची तरतूद

नवी मुबंईत नाविन्यत नगर इनोव्हेशन सिटी उभारणार

महाराष्ट्राचं नवी औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाईल- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

महाराष्ट्राचं नवी औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाईल-

यातून ४० लाख कोटींचा गुंतवणुकीचं उद्दिष्ट आहे

यातून ५० लाख रोजगार निर्णिती होईल

राज्यात रोजगार वाढत- अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार

राज्यात रोजगार वाढत आहे

राज्यात देशी परदेशी गुंतवणूक वाढत आहे

गुंतवणूक वाढल्याने रोजगार वाढत आहेत

औद्योगिक विकासात राज्य सातत्याने अव्वल आहे

लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो- अजित पवार

अर्तमंत्री अजित पवार

लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो

कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो

 विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो

Live Update : बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आग

बदलापूरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये ही आग लागली. या आगीत रेकॉर्डमधील कागदपत्रं जळून खाक झाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. या आगीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे रेकॉर्ड जळाल्याची भीती आहे.

Live Update : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी जन आक्रोश आंदोलन

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी अकोट येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चाचा तहसील कार्यालयावर धडकून समारोप करण्यात आला. बिहार सरकारचा १९४९ चा व्यवस्थापन समितीचा कायदा रद्द करून, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध  समाजाच्या ताब्यात द्यावे, या प्रमुख मागण्यासाठी राष्ट्रपती व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व व चरण इंगळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोट व महासचिव रोशन पुंडकर यांनी केले होते.

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचाच्या अभिनंदनाचा ठराव, टीमचं शारदार स्वागत करू असं आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचाच्या अभिनंदनाचा ठराव, टीमचं शारदार स्वागत करू असं आश्वासन

Live Update : कांदा निर्यात शुल्कावरुन विधानसभेत चर्चा

कांदा प्रश्न संदर्भात कायम तोडगा निघावे अशी भूमिका जयकुमार रावल यांनी घेतली. कांदा उत्पादन शेतकरीसह शासन समिती केंद्र शासन याकडे भूमिका मांडू

Live Update : विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात...

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात...

Live Update : डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक

डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक

काल रात्रीच्या सुमारास लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून ही   दगडफेक झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यामध्ये कोणलाही हानी झालेली नाही. 

ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची वीर सावरकर शाखा असून या ठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी व शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यापासून येथे शाखा सुरू होती.

दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सध्या कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

Live Update : 'काँग्रेस सोडताना दु:ख होतंय...'; रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम

'काँग्रेस सोडताना दु:ख होतंय...'; रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. 

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, रस्ते अपघातात चौघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, रस्ते अपघातात चौघांचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील पिशोर खाडीत उसाच्या ट्रकचा अपघात

अपघातात उसाच्या ट्रकखाली दाबल्याने चौघांचा मृत्यू

अपघातात नऊ जण जखमी, उसाचा ट्रक घाटात पलटी झाल्याने झाला अपघात

Live Update : उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे वेळापत्रक बदलले

वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपासून शाळा सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत भरविण्यात येणार आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी शाळांचे वेळापत्रक बदलले जाते. यंदाही शिक्षक संघटनांनी सकाळच्या सत्रात शाळा घेण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Live Update : जयंत पाटलांनी जिल्ह्यातील सहकाराचं वाटोळं, गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सहकाराचे वाटोळे केलंय, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. जतचा सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी ढापला आहे. आता त्यांचा डोळा आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्यावर आणि कवठेमहांकाळच्या महांकाली कारखान्यावर आहे. केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जयंत पाटील जिल्ह्यातील सहकारी आणि सभासदांचे कारखाने हडप करत आहेत, असा आरोप देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Live Update : वर्षभरापासून सतीश उर्फ खोक्या भोसले याचा हद्दपारचा प्रस्ताव धूळ खात पडून

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या कुख्यात सतीश ऊर्फ खोक्या भोसले बद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. सतीश भोसले याला जिल्ह्यातून हद्दपार करावे, यासाठी पोलिसांनी बीडच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु वर्षापासून त्यावर काहीही कारवाई न करता तो धूळ खात ठेवण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा प्रस्ताव पाठवलानंतर देखील त्याने गंभीर गुन्हे केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हद्दपारच्या प्रस्तावावर कोणतेही कारवाई झाली नाही आणि त्यामुळेच खोक्याचे मनोबल वाढला. त्यामुळे आता ही हद्दपारी कोणी रोखली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Live Update : देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून डुक्कर चोरून नेणाऱ्या आरोपींना अटक

शेतकऱ्याच्या शेतातील डुक्कर फार्ममधील वराह चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणून तीन लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करत दोन पीडित बालकांना ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: