Maharashtra Budget 2025 : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी अण्णाभाऊ साठे यांच्या नावापासून केली. यंदाच्या अर्थसंकल्पात सागरी महामार्ग, रस्ते प्रकल्प, शेती क्षेत्र येथे मोठ्या घोषणा करण्यात आल्या. दरम्यान अर्थसंकल्प सादर करीत असताना अजित पवारांनी विविध कविताही सादर केल्या. त्यांच्या या कवितांवर विधानसभेत दादही मिळाली.
लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो,
कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो,
केली विकासाची कामे म्हणून आम्ही
पुन्हा आलो...पुन्हा आलो...पुन्हा आलो
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काळी माती ज्याची शान
तिच्यात राबे विसरूनी भान
पोशिंदा हा आहे आपला,
कृतज्ञेने ठेवू जाण
देऊ योजना अशा तया की
राहील त्याचे हिरवे रान
नक्की वाचा - Budget 2025: सागरी दळणवळणात महाराष्ट्र 'महाशक्ती' ठरणार; अर्थसंकल्पात अजित पवारांच्या मोठ्या घोषणा
का आम्हास सत्ता मिळाली याची जाण आहे
करायचे काय याचे भान आहे
साथ द्या आम्हास नेऊ राज्य पुढती
ऊंच त्याची न्यावयाची शान आहे
भाव फुलांना पायी उधळून
आयुष्याचा कापूर जाळून
तुझे सारखे करीन पूजन
गीत तुझे मी आई गाईन
शब्दोशब्द अमृत ओतून
विकासचक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संकुलित मेळ
विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे..
विकास संकल्प, विकासाचा ध्यास, मनी धरू आस विकासाची...
विकासचक्राला देऊनीया गती, साधूया प्रगती वेगातची
मिळोनीया सारे राज्य विकसित, राष्ट्र विकसित करू चला, राज्य विकसित करू चला