
मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी मंत्री नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी केली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अभिनेता आदित्य पांचोली आणि दिनो मौर्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यावरून आज विधानपरिषदेत जोरदार घमासान पाहायला मिळाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिल परब यांचा रौद्रावतार...!
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केली. यावरुनच विधानपरिषदेत घमासान पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. या केसमध्ये सीआयडीने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. सरकारने एसआयटीही लावली आहे. याआधी पूजा चव्हाणवरुनही संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. त्याचे पुढे काय झाले? असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरेंवर चौकशीचा प्रस्ताव आणला. त्याा मनिषा कायदेंचे ट्वीट मी वाचून दाखवतो. 'सत्य परेशान हो सकता हे, पराजित नही' याची प्रचिती देशवासीयांना आली आहे. दिशा सालियानचा मृत्यू अपघातानेच झाला असल्याचे सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजपा आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थयथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी,असे ट्वीट अनिल परब यांनी वाचून दाखवले.
(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील या ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी)
या मनिषा कायंदे, सरड्यापेक्षाही फास्ट रंग बदलला. आता उपसभापतीच्या खुर्चीवर बसायचे आहे. वरिष्ठांना खुश करायचे आहे. आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी संबंध असेल तर त्याची काळजी कोर्ट घेईल. संजय राठोड, जयकुमार गोरेंची केस, त्यांचे उघडे नागडे फोटो दिसले त्याबद्दल का बोलत नाही? किरीट सोमय्यांची केसचे काय झाले? असे म्हणत अनिल परब यांनी जोरदार हल्लाबोल केला.
(नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world