Maharashtra Cabinet: नाराजीनाट्याचा नवा अंक? 'या' 18 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही; कारण काय?

Mahayuti Cabinet: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नसल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेत आलेल्या महायुतीमधील नाराजीनाट्य काही संपत नसल्याचं दिसत आहे. आधी मुख्यमंत्रीपदाचा घोळ, त्यानंतर खाते वाटप आणि मंत्रिपदावरुन झालेली रस्सीखेच राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. अशातच आता महायुतीमधील नाराजीनाट्याचा नवा अंक समोर आला आहे. 

महायुती सरकारमधील खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिपदाच्या शपथविधीला 15 दिवस उलटल्यानंतरही अद्याप 18 मंत्र्यांनी आपला पदभार स्विकारला नसल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. आवडीची खाती न मिळाल्याने अद्याप पदभार स्विकारला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या मंत्र्यांनी पदभार स्विकारला नाही:

पदभार  न स्विकारलेल्यांपैकी अनेक नेते हे परदेश दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अनेकांच्या वैयक्तिक कारणांमुळे या मंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नसल्याचं सांगण्यात येत असून काही मंत्र्यांनी पदभार न स्विकारता कामाला सुरुवात केल्याचंही सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच बघायला मिळत असतानाच ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत त्यांचाच पालकमंत्री असेल असं वरिष्ठ पातळीवर ठरलं असल्यामुळे पालकमंत्री आमचाच होईल असा दावा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. यासोबतच छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार नाही ते नाराज नसून त्यांचे किरकोळ समज गैरसमज झाले आहेत मात्र त्यांच्याशी 
वरिष्ठ पातळीवर बोलणं सुरू असल्याचं कोकाटे यांनी म्हटले आहे. 

Advertisement