CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बुधवारी (1 मे 2024) मुंबईकडे येत असताना रस्त्यावर डम्परचा अपघात झाल्याचे त्यांना आढळले. अपघातग्रस्त डम्परमधील तेल रस्त्यावर सांडल्याने प्रवासी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ आपला ताफा थांबवला आणि परिस्थितीची पाहणी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती पसरवण्याचे काम केले.
पोलिसांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
तसेच त्यांच्या स्टाफमधील पोलिसांच्या मदतीने बाइकस्वारांना रस्त्याच्या एका बाजूने वाहन हळू चालवून पुढे जाण्याचे आवाहनही केले. यानंतर त्यांनी ट्रॅफिक पोलिसांना अपघाताची व त्यानंतर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती दिली. पोलिसांना तेथे मार्गावर थांबवून घाई न करता प्रवाशांचे वाहन पुढे पाठवावे तसेच अपघातग्रस्त डम्पर लवकरात लवकर हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना दिल्या व यानंतर ते आपल्या प्रवासासाठी पुढे रवाना झाले.