जाहिरात

Yasharee Shinde Case: यशश्री शिंदेच्या कुटुंबियांना राज्य सरकारचा आधार! सरकारी नोकरीसह 8 लाखांची मदत

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शब्द दिल्याप्रमाणे यशश्री शिंदेच्या बहिणीला राज्य सरकारने सरकारी नोकरी आणि ८ लाखांची आर्थिक मदत केली आहे. 

Yasharee Shinde Case: यशश्री शिंदेच्या कुटुंबियांना राज्य सरकारचा आधार! सरकारी नोकरीसह 8 लाखांची मदत

Yasharee Shinde Murder Case: उरण येथील 22 वर्षीय तरुणी यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. प्रेमसंबंधास नकार दिल्याने यशश्रीची दाऊद शेख याच्याकडून जुलै 2024 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहेय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शब्द दिल्याप्रमाणे यशश्री शिंदेच्या बहिणीला राज्य सरकारने सरकारी नोकरी आणि ८ लाखांची आर्थिक मदत केली आहे. 

NCP News: सुनिल तटकरेंचा कार्यक्रम वादात! बॅनरवरुन सुनेत्रा पवार, अजित पवारांचे फोटो गायब; राजकारण तापलं

यशश्री शिंदेंच्या कुटुंबियाला मदतीचा हात 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आणि आरपीआय (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या घोषणेनुसार, २०२४ मध्ये उरण येथे हत्या झालेल्या २० वर्षीय वाणिज्य पदवीधर यशश्री शिंदेची बहीण अनुष्का शिंदे हिला राज्य सरकारने ८ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोकरीचे पत्र सादर करण्यात आले.

जुलै २०२४ मध्ये, यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह उरण येथे रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याची घटना घडली होती. या भयंकर हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली होती.  राज्य गुन्हे शाखेने या प्रकरणाचा कसून तपास कर दाऊद शेख याला अटक केली होती. यशश्रीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने तसेच तिचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याच्या संशयातून तिची हत्या केल्याचे आरोपीने कबुल केले होते. 

आरोपी शेख याने यशश्रीला ब्लॅकमेल करत भेटण्यासाठी बोलावले आणि तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला  कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी गुलबर्गा येथून अटक केली. याप्रकरणी आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही रामदास आठवलेंनी केली आहे. 

Ashok Kharat: 'भोंदू बाबा'वर मेहेरबान कोण? यादीत नाव नाही, तरीही खरातच्या मंदिराला निधी मंजूर! रेकॉर्डच गायब

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com