नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ऑनलाईन रम्मीचा डाव खेळताना दिसले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. या वादानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याजागी दत्तात्रय भरणे हे नवे कृषिमंत्री म्हणून कारभार पाहतील.
Live Updates: 18 ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ
आता १८ ऑगस्ट २०२५ पासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्येही बसणार
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमधील जनतेसाठी हा निर्णय महत्वाचा राहणार
सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारावरही मराठी छाप
मराठी चित्रपट 'जिप्सी' साठी कबीर खंदारे यांच्यासह ट्रीशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप मराठी चित्रपट 'नाल 2' साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
शामची आईला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषीत
71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून शामची आई या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय सुनील डहाके यांनी केले होते आणि अमृता फिल्म्सने निर्मिती केली होती.
Live Updates: गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण
राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी
गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण
तब्बल एक कोटी बारा लाख 50 हजार इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. गोविंदांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पूर्वेस सरनाईक यांनी केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.
Live Updates: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर! 9 सप्टेंबर रोजी मतदान
9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होईल. यासाठी 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल.
LIVE Updates: ठाकरे गटाकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षाचा प्रकरण पुन्हा मेन्शन
ठाकरे गटाकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षाचा प्रकरण पुन्हा मेन्शन
२० ऑगस्टलाच सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी
मात्र आम्ही तुम्हाला नवीन तारीख दिली आहे ती तुमला आज समजेल तेव्हा आम्ही सुनावणी घेऊ
सुर्याकांत यांचं स्पष्टीकरण
सूर्या कांत यांच्या खंडपीठासमोर होत आहे सुनावणी
२० ऑगस्ट या आधी अंतिम तारीख कोर्टाकडून देण्यात आली होती.
कोर्टाने सांगितलं आम्ही नवीन तारीख दिली आहे.
Live Updates: तुर्भे नाक्याजवळ इ्लेक्ट्रिक बसचा भीषण अपघात
तुर्भे नाक्याजवळ Nmmt इलेक्ट्रिक बस चा भीषण अपघात
तुर्भे नाक्यावरून वाशी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या Nmmt बस चा अपघात
बस चा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
अपघातात सुमारे १०-१२ गाड्यांचे नुकसान
बसच्या पुढील काचेचाही चक्काचूर
बस चालकाला पुढील चौकशीसाठी तुर्भे पोलिसांनी घेतले ताब्यात
जखमीना वाशी रुग्णालयलात उपचारासाठी दाखल
Live Updates: रामदास कदम ओरक्सेट्रा परवाना कदम सरेंडर केला.
रामदास कदम कुंटूबीयांचा सावली बार यावरून वाद होताच ओरक्सेट्रा परवाना कदम यांनी सरेंडर केला.
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची अडचण वाढली असताना ओरकेस्ट्रा परवाना रद्द करून फक्त रेस्टोबार हाॅटेल परवाना ठेवला आहे.
कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्यासोबतच करारनामा ही रद्द केला.
गृहराज्यमंत्री कदम यांच्यावर विरोधकांनी राजीनामा मागणी केली असतानाच बचावात्मक पवित्रा घेण्याची कदम यांनी तयारी केली.
सावली बार यास आधी ओरक्स्ट्रा परवाना असताना तिथ लेडीजबार चालवत असल्यान कारवाई झाली होती. त्यानंतर योगेश कदम यावर कारवाई करावी विरोधक मागणी करत होते
Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काळात काँग्रेसला गळती सर्वाधिक?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काळात काँग्रेसला गळती सर्वाधिक?
काँग्रेस पक्षात साध्या आउटगोइंग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे
या सगळ्याला सुरुवात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याने झाली
त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात काँग्रेस पक्षाला गळती सुरु झाली आहे
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा काँग्रेस मुक्त होणार आहे येत्या काही दिवसात
त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे
LIVE Updates: एकनाथ शिदेंना धक्का, शिवाजी सावंत यांनी दिला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा
शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा एकनाथ शिंदे यांना दिला आहे. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे बंधू असणारे शिवाजी सावंत हे गेल्या काही दिवसापासून शिवसेनेवर नाराज आहेत. संपर्कप्रमुख असून शिवसेनेत विश्वासात न घेता नेमणुका केल्या जातात. असे कारण देऊन सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय. सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीचा फटका थेट शिवसेना शिंदे गटाला सोलापुरात बसला आहे. काही दिवसापूर्वी शिवाजी सावंत यांच्या कार्यक्रमाला ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यावेळी पासून सावंत नाराज असल्याची चर्चा आहे.
LIVE Updates: शहरात वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई
नंदुरबार शहर वाहतूक विभागाकडून बेसिस्तपणे वाहन पार्किंग करणारे, ट्रिपल सीट मोटर सायकल चालवणारे तसेच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे या मोहिमे दरम्यान २६६ वाहनांवर कारवाई करत १ लाख ४४ हजार रुपयाचे दंड वसूल करण्यात आले आहे, वाहतूक विभागाकडून होत असलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांना शिस्त लागणार असून पुढेही अशा प्रकारची कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून मिळाली आहे.
Live Update: पालकांकडून आदिवासी आश्रम शाळा बंद पडण्याचे सत्र सुरूच..
शासकीय आश्रमशाळांमध्ये १००% शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तातडीने नियुक्ती करावे या मागणीसाठी आमदार नितीन पवार यांनी केलेल्या आंदोलन व आवाहना नुसार नाशिकच्या कळवण सुरगाणा मतदार संघातील पालकांनी आदिवासी शाळा बंद करण्याचे सत्र सुरू केले असून कळवणच्या दळवट,चणकापुर,खिराड,मोहनदरी,या चार आश्रम शाळा पालकांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना घरी नेले. शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांअभावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून तातडीने शासनाने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्त करण्याची आग्रही मागणी पालकांनी केली.
Live Update: जळगाव मधील मेहरून तलावाचा जलसाठा 50 टक्क्यांवर
जळगाव मधील मेहरून तलाव पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही अद्यापही भरलेला नसून गेल्या वर्षीच्या तुलनेत जळगाव शहरात पाऊस कमी झाल्याने परिणामी जुलै महिन्याच्या अखेरीस तलावात केवळ 50 टक्के जलसाठा शिल्लक आहे. प्रतिवर्षी जुलै महिन्यात मेहरून तलाव शंभर टक्के भरून तलावातून ओसांडून पाणी वाहू लागते. मात्र यावर्षी जुलै महिना संपूनही तलावात केवळ 50 टक्के जलसाठा शिल्लक आहे.
Live Update: वाघुर धरणाच्या रस्त्यावर झाडे झुडपे वाढल्याने अपघाताचा धोका वाढला
जळगाव कडून वाघुर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे धुडपे वाढली असून यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. धरणावर फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची या रस्त्यावर पावसाळ्यात वर्दळ पाहिला मिळते मात्र रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत झाडे झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन सहज दिसत नसल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
Live Update:मनमाडला शिवसेना पदाधिकाऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक
वाढीव वीज बिल तसेच वीज कंपनीबाबत विविध समस्यांबाबत नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी युवा सेना जिल्हाधिकारी फरहान खान व शहरप्रमुख मयुर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात धडक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर विविध समस्यांचा पाडा वाचला. वीजपुरवठा सुरळीत करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.