Maharashtra IAS Transfer: महाराष्ट्र राज्य प्रशासनात प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी राज्य सरकारने वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. २२ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार, महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि ऊर्जा विभाग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये नवीन नियुक्त्या झाल्या आहेत.
Mumbai News: मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! दादर स्टेशनवरील संतापजनक VIDEO; सकाळचा नाश्ता करताना सावधान
प्रशासकीय क्षेत्रात मोठे बदल, ३ अधिकाऱ्यांच्या बदल्या
मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी पी. वेलरासू (२००२ बॅच) यांच्या १६ जून रोजी झालेल्या नियुक्तीच्या आदेशात बदल करण्यात आला आहे. आता त्यांची नियुक्ती 'अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई' या पदावर करण्यात आली आहे. वेलरासू हे अनुभवी अधिकारी असल्याने त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली एमएमआरडीएची जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजीव कुमार (२००३ बॅच) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता 'सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय' या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागाची धुरा सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा राज्याला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले विक्रम कुमार (२००४ बॅच) यांची नियुक्ती 'अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी' (महापारेषण) म्हणून करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world