
Jalgaon Heavy Rain News: गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बळीराजांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून घरात पाणी शिरल्याने अन्नधान्यही खराब झाले आहे. जळगावमध्येही तुफान पाऊस कोसळला, या पावसाने पाचोरा तालुक्यातील अनेकांची घरे पाण्याखाली गेली असून आम्ही जगायचं कसं? असा आर्त सवाल गावकरी विचारत आहेत.
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावी सोमवारी ढगफुटी झाली होती, गावातील सुंदरा नदीने रौद्ररूप धारण केल्याने जवळपास गावातील निम्मी घरं पाण्याखाली गेली होती, गावकरी जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळी धाव घेत होती आणि यात एक होत्या 70 वर्षांच्या आजी बायदाबाई चव्हाण.. बायदाबाई यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य, डाळी, टिव्ही आणि ईतर साहित्य सर्व खराब झाले आहेत. दोन दिवसांपासून रात्रदिवस धान्य वाळवण्याचे काम आजी आजोबा करत असून दोन दिवस आम्ही झोपलोही नाही, शेतीपीकही खराब झाले डोक्यावर बँकेचे कर्ज असून ते आम्ही कसं फेडायचं ? हे बोलतांना आजीच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये.
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा हाहाकार; 24 तासांत 6 बळी, 4,000 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या सावखेडा सिम येथे असलेल्या निंबा देवी धरण शंभर टक्के भरले आहे. सातपुडा पर्वतरांगात झालेल्या पावसामुळे धरण 100 टक्के भरले असून यामुळे यावल तालुक्यातील सुमारे 15 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून सिंचनासाठी ही या पाण्याचा उपयोग असल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. तर विशेष म्हणजे पर्यटकांसाठी देखील निंबा देवी धरण हे आकर्षणाचे केंद्र असून मात्र तूर्तास पर्यटकांसाठी निंबा देवी धरणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे धरण खुली करावे अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 8 हजार 27 हेक्टर क्षेत्रावरील 17 हजार 332 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने 18 सप्टेंबर रोजी शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर अवघ्या 5 दिवसात शासनाने निर्णय देत 23 सप्टेंबर रोजी ऑगस्ट महिन्याच्या नुकसानीसाठी जिल्हा करता 9 कोटी 86 लाख 26 हजार 245 रुपयांचा निधी घोषित केला आह
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world