
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरूध्द पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होणार आहे. तर माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरूद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार आहे. या लढतींमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी (Wrestling Competition) किताबासाठी आज (रविवारी) सामना होणार आहे.
महाराष्ट्र केसरी 2025 कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झालेल्या अटीतटीच्या लढतीत गादी विभागात डबल महाराष्ट्र केसरी नांदेडला शिवराज राणे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगणार आहे. याशिवाय माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात लढत होणार आहे. कोणाला महाराष्ट्र केसरी मिळणार हे आज जाहीर होईल.विशेष म्हणजे चौघेही मातब्बर असल्याने कोण बाजी मारणार हे सांगणं कठीण आहे.
नक्की वाचा - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतीक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्याच्या उपस्थिती महाराष्ट्र केसरी सामना पार पडणार आहे. उपांत्यफेरीच्या लढती हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पार पडले असून डोळ्याचे पारणे फेडणारे हे सामने होत असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक जणं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्यातील 44 जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी नोंदणी केली आहे. राज्यभरातून मल्ल व त्यांचे प्रशिक्षक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world