Maharashtra Kesari 2026: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ या मानाच्या स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र केसरीत कुठे एकतर्फी विजय, कुठे चुरशीची झुंज, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला थरार अशा विविध रंगांनी नटलेल्या या लढतींमधून अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज महाराष्ट्र केसरीची फायनल होणार असून विजेत्यावर बक्षीसांचा वर्षाव होणार आहे.
कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र केसरी पैलवान कोण याचा फैसला आज होणार आहे. वाघोली येथील स्वर्गीय अजित दादा पवार क्रीडा नगरीत 68 व्या महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. स्पर्धेसाठी क्रीडांगणात दोन मातीचे आणि दोन मॅटचे असे एकूण चार आखाडे उभारण्यात आले आहेत. अंतिम सामना नेटवर्क खेळवला जाणार आहे.
माती विभागात वावटळ वेगाचा सिकंदर शेख विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड अशी लढत होणार आहे. तर गादी म्हणजे मॅट विभागात हर्षवर्धन सदगीर विरुद्ध युवा पैलवान जय पाटील यांच्यात कुस्ती रंगेल. सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघंही पैलवान डबल महाराष्ट्र केसरी होण्याच्या जिद्दीने मैदानात उतरतील.
मानाची गदा पटकावणारा पैलवान होणार मालामाल!
यंदा मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावणारा मल्ल मालामाल होणार आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या पैलवानाला मानाची चांदीची गदा, 5 लाख रुपये रोख आणि सर्वात मोठं आकर्षण म्हणजे आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण पार पडणार आहे.
Akola News : 3 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाचा भयंकर शेवट; कुटुंबावर मोठा आघात, नेमकं काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world