जाहिरात

Sikandar Shaikh Arrest : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला गंभीर गुन्ह्यात अटक, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Sikandar Shaikh Arrest :  आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.

Sikandar Shaikh Arrest : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला गंभीर गुन्ह्यात अटक, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
Sikandar Shaikh Arrest :  या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे:

Sikandar Shaikh Arrest :  आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. सिकंदरचा सहभाग आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीत असल्याचा प्राथमिक  तपासातून समोर आला आहे. विशेष म्हणजे, राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

मोहाली पोलिसांच्या सीआयए (CIA) पथकाने आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचा समावेश आहे. ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींकडून एकूण 5 अवैध बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. यात 4 .32 बोरच्या पिस्तुल आणि 1 .45 बोरची पिस्तुल, तसेच जिवंत काडतुसे (live cartridges), रोख रक्कम (cash) आणि 2 लक्झरी कार (luxury cars) जप्त करण्यात आल्या आहेत.

( नक्की वाचा : Amol Muzumdar: 'झिरो' आंतरराष्ट्रीय मॅच! तरीही महिला टीमचा 'हीरो' अमोल मुजुमदार कोण आहे? )
 

मोहालीचे एसएसपी (SSP) हरमनदीप सिंह हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले दानवीर आणि बंटी हे मोहालीत सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला शस्त्रे पुरवण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सीआयए पथकाने सापळा रचून दानवीर, बंटी आणि सिकंदर शेख या तिघांना शस्त्रांसह अटक केली.अधिक चौकशीतून समोर आले की, ही शस्त्रे मोहालीच्या नव्या गावातील रहिवासी कृष्णकुमार उर्फ हॅपी गुर्जर याला पुरवठा केली जाणार होती. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.

सध्या हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील चौकशीत या प्रकरणातील आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. सिकंदरने आपल्या प्रतिमेचा उपयोग शस्त्र विक्रीसाठी केला होता, अशी माहिती पोलिसांनी NDTV ला दिली आहे.  सिकंदरच्या कुटुंबाचा दावा काय?

सिकंदर शेखच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबाने मात्र या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना "खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात आहे" असा आरोप केला आहे. सिकंदरच्या अटकेमुळे राज्याच्या कुस्ती क्षेत्रात तीव्र चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादामुळे चर्चेत

या अटकेमुळे सिकंदर शेख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये पुण्यात झालेल्या माती गटातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. तेव्हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सिकंदरच्या बाजूने जोरदार ट्रोलिंग करत, कुस्तीच्या निर्णयावर बोट ठेवले होते. या ट्रोलिंगमुळे महाराष्ट्रात कुस्तीवरुन वातावरण चांगलेच तापले होते.

त्यानंतर, पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024 ची मानाची गदा पटकावली होती. तत्पूर्वी, त्याने पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, "मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी आहे" असे वक्तव्य केले होते. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूरजवळ भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन केले होते, तेव्हा त्याने हे विधान केले होते. मात्र, आज अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्याने त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com