3 days ago

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या विशेष अधिवेशनात राज्यभरातील 281 आमदारांनी शपथ घेतली. आज उर्वरित आठ आमदार शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर आज भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे. सायंकाळ चार वाजता राज्यपालांचे अभिभाषण होईल त्यानंतर नागपूर अधिवेशनाची घोषणा होणार आहे. दुसरीकडे राज्यात विरोधी पक्षनेता मिळतो का? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. 

Dec 09, 2024 20:25 (IST)

Live Update : 14 डिसेंबरला कॅबिनेट विस्तार करण्याच्या हालचाली, मुख्यमंत्री दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार

नागपूर अधिवेशना आधी विस्तार करण्याच्या हालचाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्ठीकडे अंतिम मंजुरी घेण्याच्या तयारीत

फडणवीस लवकरच दिल्लीत या संदर्भात भेट देण्याची शक्यता

Dec 09, 2024 20:22 (IST)

Live Update : म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीस अर्ज सादर करण्यास 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून 24 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.        

Dec 09, 2024 20:22 (IST)

Live Update : विरार पूर्व येथील साईनाथनगर येथे भीषण आग

विरार पूर्व येथील साईनाथनगर येथे भीषण आग

कचऱ्याला लावलेल्या आगीने रौद्ररूप धारण करून आग पसरली

आजूबाजूची चार ते पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

सुदैवाने आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी नाही

Dec 09, 2024 18:34 (IST)

Live Update : भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?

Live Update : एकनाथ शिंदेंची विधानपरिषदेच्या नेतेपदी निवड, निलम गोऱ्हेंची घोषणा

Advertisement
Dec 09, 2024 18:26 (IST)

Live Update : सकल हिंदू समाजाकडून उद्या ठिय्या आंदोलन करण्यात येणार

सकल हिंदू समाजाकडून उद्या ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जागतिक मानव हक्क दिनी आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता कलेक्टर ऑफिस येथे ठिय्या आंदोलन असेल. बांगलादेश सरकारने आचार्य चिन्मयदास प्रभुजी आणि अन्य हिंदू संतांची त्वरित सुटका करावी, तसेच बांगलादेशमध्ये हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लीम कट्टरपंथीयांद्वारे जो अत्याचार होत आहे तो त्वरित थांबवावा, अशी मागणी या आंदोलकांची आहे.

Dec 09, 2024 17:28 (IST)

Live Update : 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन

16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन

Advertisement
Dec 09, 2024 17:24 (IST)

Live Update : लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांनी घेतली रेल्वे आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट

दिल्ली येथे लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी रेल्वे आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान लातूरसाठी नवीन आकाशवाणी एफएम केंद्र स्थापनेची मागणी आणि तसेच लातूर रोड ते नांदेड आणि लातूर रोड ते बोधन या नवीन रेल्वे मार्गाच्या विकासासाठी प्रस्ताव मांडला. नवीन रेल्वे गाड्यांसाठी ही मागणी करण्यात आली आहे. 

लातूर- वैष्णवी देवी, लातूर- नवी दिल्ली, लातूर- अजमेर, लातूर- तिरुपती, कोल्हापूर -नागपूर, लातूर- पुणे इंटरसिटी या गाड्या सुरू करण्यात याव्यात, तसेच पुणे मुंबई हैदराबादसाठी वंदे भारत एक्सप्रेसची जोडणी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती यावेळी खासदार डॉक्टर काळगे यांनी केली आहे.  

Dec 09, 2024 16:30 (IST)

Live Update : जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मंत्रीपद मिळावं यासाठी आंदोलन

जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मंत्रीपद मिळावं यासाठी आंदोलन केलं

Advertisement
Dec 09, 2024 16:29 (IST)

Live Update : राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात INDIA आघाडी अविश्वास प्रस्ताव आणणार

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात INDIA आघाडी अविश्वास प्रस्ताव आणणार

सभापती विरोधी पक्षांना बोलू देत नसून पक्षपातीपणा करत असल्याचा सत्ताधारी खासदारांचा आरोप

INDIA आघाडीच्या ५० खासदारांनी प्रस्तावावर सह्या केल्याची माहिती

काँग्रेस, TMC, आप, समाजवादी पक्षाच्या खासदारांच्याही प्रस्तावावर सह्या

सूत्रांची माहिती

Dec 09, 2024 15:23 (IST)

Maharashtra Politics: राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरे गटाचा बहिष्कार

राज्यपालांच्या अभिभाषणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांकडून बहिष्कार टाकला जाणार बेळगावमध्ये जी धर पकड सुरु आहे, त्यावर सत्ताधारी नेते गप्प असल्याने हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे शिवसेनेचे आमदार बहिष्कार टाकत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्यपालांच्या अभिभाषणाला उपस्थित राहणार आहेत

Dec 09, 2024 11:58 (IST)

Aditya Thackeray News: ठाकरे गटाच्या आमदारांचा अध्यक्ष निवडीवर बहिष्कार

Aditya Thackeray Press Conference: 

आज शिवसेनेच्या आमदारांनी अध्यक्ष निवडणूकीवर बहिष्कार टाकला.  मंत्र्यांच्या परिचरायावर देखील आम्ही बहिष्कार टाकला आहे. कोण मंत्री कुठल्या आणि किती वॉशिंग मशीन मधून आलं हे माहित आहे.  जे अध्यक्ष निवडले आहेत त्यांनी घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत केली. ती जखम अजूनही ताजी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

Dec 09, 2024 11:54 (IST)

Eknath Shinde Speech: कर नाही त्याला कसली डर; त्यांचे नाव राहुल नार्वेकर: एकनाथ शिंदे

गेल्या अडीच वर्षात केलेले काम आमच्यासमोर आहे. मी म्हणालेलो 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणेन नाहीतर मी शेती करायला जाईल. तोही शब्द आम्ही पूर्ण केला. त्यानंतर दादा आले आणि बोनस मिळाला.

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड यश दिले. विकासाचे नवे पर्व सुरु आहे. गेल्यावर्षी यावेळी तर विरोधी पक्षनेते पदाची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं.राहुलजी अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत. सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी विक्रम गेल्यावेळीच केला आहे. 

कमीवेळामध्ये जास्तीचे काम, निर्णय घेण्याचे काम आम्ही केले. मी नाना पटोलेंचे आभार मानतो. कारण त्यांनी नार्वेकरांसाठी जागा रिक्त केली अन् तिथून गाडी सुरु झाली. याचे क्रेडिट तुम्हालाच आहे. म्हणून नाना आमचे मित्र आहेत. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे...

राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझा जिल्हा अन् जन्मभूमी आहे. 2022 मध्ये राहुलजींनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यावेळी कसोटीचा काळ होता. सुप्रीम कोर्टाने मोठी जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. आपण घेतलेला तो निर्णय योग्यच होता. आता जनतेनेही दाखवून दिले. या निवडणुकीत जनतेने कामाची पोहोचपावती दिली. 

Dec 09, 2024 11:39 (IST)

CM Devendra Fadnavis Speech: विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडेल त्या आम्ही करु. त्यांनी मांडलेल्या भूमिका स्विकारु: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र संक्रमण काळ होता. सगळ्या मिडीया जनतेच लक्ष असायचे यामुळे सर्वाधिक चर्चेचा विषय चेहरा नार्वेकर राहीले. गेल्या अडीच वर्षाच्या काळात नार्वेकर यांच्या ज्ञानाचा कस लागला,. या काळात त्यांनी न्यायाधीशाचे काम केले. त्यांनी नव्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली. विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडेल त्या आम्ही करु. विरोधी पक्षांनी मांडलेल्या भूमिका स्विकारु. असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे आभार मानले. 

Dec 09, 2024 11:17 (IST)

Devendra Fadnavis: पुन्हा येईन न म्हणता पुन्हा आलात: CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नार्वेकरांचे अभिनंदन

नार्वेकर यांचे फेरनिवड झाली त्याबद्दल अभिनंदन. विरोधी पक्षांचे आभार मानतो. काही अपवाद वगळता बिनविरोध निवडणूक झाली, आता ही निवडीला समर्थन दिले आभार. अध्यक्ष तुम्ही म्हटला नव्हता मी पुन्हा येईल पण तरी पुन्हा आलात. नाना पटोलेंचेही विशेष आभार, कारण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळेच ते अध्यक्ष झाले. 

Dec 09, 2024 11:10 (IST)

Rahul Narvekar Vidhansabha Chief: राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष, एकमताने निवड

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज अध्यक्षांची निवड करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला. त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यासोबतच एकनाथ  शिंदे, आशिष शेलार यांनीही अनुमोदन दिले. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची एकमताने विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली.

Dec 09, 2024 11:03 (IST)

Jayant Patil Taking Oath: जयंत पाटलांचा शपथविधी, सत्ताधाऱ्यांनी करेक्ट कार्यक्रम म्हणत डिवचले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. यावेळी सत्ताधाऱ्यांनी करेक्ट कार्यक्रमच्या घोषणा दिल्या. 

Dec 09, 2024 11:00 (IST)

Maharashtra Assembly Special Session: CM देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री विधानभवनात दाखल

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आदित्य ठाकरे, जयंत पाटील गिरीश महाजन, राहुल नार्वेकर विधानभवनात दाखल झाले आहेत. 

Dec 09, 2024 10:57 (IST)

Belgaum News: बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते नजरकैदेत

बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते नजरकैदेत 

नेताजी जाधव, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर या नेत्यांवर पोलिसांच लक्ष

मराठी भाषिकांच्या मेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर नेते आक्रमक भूमिकेत

Dec 09, 2024 10:54 (IST)

Maharashtra Karnataka Border Dispute: शिवसेना ठाकरे गटाचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना

 शिवसेना ठाकरे गटाचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना 

विजय देवणे, संजय पवार, हर्षल सुर्वे, सुनिल मोदी या नेत्यांचा समावेश 

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलीस बंदोबस्त

सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील नेते जात आहेत 

महाराष्ट्र सीमेवरच या नेत्यांना अडवलं जाण्याची शक्यता आहे 

दूधगंगा नदी पुलावर कर्नाटक पोलीस या नेत्यांना अडवण्यासाठी सज्ज आहेत

Dec 09, 2024 10:53 (IST)

Maharashtra Karnataka Dispute: बेळगावमध्ये पाच ठिकाणी जमावबंदी

बेळगाव येथे आजपासून सुरू होत असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केलाय. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव शहरात प्रवेशबंदी करण्याचा आदेश बजावला आहे. बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाच वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करण्याचं घोषित करण्यात आलेलं. पोलिस आयुक्त मार्टिन यांनी त्या पाचही ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

Dec 09, 2024 10:51 (IST)

Pune Crime: बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानात दरोडा

बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानात दरोडा

घोरपडीतील बी टी कवडे रस्त्यावर अरिहंत ज्वेलरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला आहे. 

रात्री सव्वा नऊ वाजता ही घटना घडली असून यामध्ये दुकानदार किरकोळ जखमी झाला आहे.

सोन्याच्या दुकानात तीन चोरट्यांनी  दुचाकी गाडी वर येऊन पिस्टल लावून डोळ्यात स्प्रे मारून लुटले आहे 

भीती दाखवत पाठीत उलटा कोयता मारून सोन लुटून फरार झाले

मुंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत

Dec 09, 2024 10:00 (IST)

Nagpur Bomb Threat: हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी, नागपुरात खळबळ

नागपूरातील गणेशपेठ परिसरातील द्वारकामाई हॉटेल येथे अग्निशामक दल , बॉम्ब शोधक पथक, पोलिस स्टेशन गणेहा पेठ चे पथक दाखल. हॅाटेलमध्ये बॅाम्ब असल्याचा मेल मिळाल्याने खळबळ. सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल मॅनेजर ला मेल आला. त्यात हॉटेल मध्ये बॉम्ब ठेवला असून 9:30 ला बॉम्ब स्फोट होणार असल्याचा उल्लेख.

माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस आणि बॅाम्बमाशक पथक घटनास्थळी पोहोचले, अन्य कुणालाही आणि मीडियाकर्मिना आत मध्ये जाण्यास प्रतिबंध.  पोलीसांकडून बॉम्ब चा शोध सुरू, हॉटेल मधील स्टाफ, गेस्ट यांना सुरक्षिततेच्या साठी बाहेर काढलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉटेल परिसरात दाखल.

Dec 09, 2024 08:55 (IST)

Rajapur Fraud: जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

राजापूर तालुक्यातील तेरवण येथील एका महिलेची पावणेसहा लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. 

एका महिलेसह अरविद सिन्हा नामक एका अज्ञात व्यक्तीने कमी वेळात जादा परताव्याचे आमिष दाखवून आपली ५ लाख ८५ हजार ३०७ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची फिर्याद या महिलेने राजापूर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी अरविंद सिन्हा व अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dec 09, 2024 08:54 (IST)

Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगेंमुळे समाजाचे नुकसान...', मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

आजपर्यंत आडमुठी भूमिका घेतल्यामुळेच मराठा समाजाचे मोठे नुकसान  झाले आहे असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी नाव न घेता जरांगे पाटील यांच्यावर केला आहे. मात्र आता समाजाला सत्य सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही लवकरच मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा बांधव बैठकीचे आयोजन करून निर्णय घेणार असल्याचं नागणे यांनी सांगितले.

मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने 50% च्या आतून ओबीसी मधून आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा सरकारला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

Dec 09, 2024 08:01 (IST)

Maharashtra Assembly Opposition Leader: दिल्लीप्रमाणे राज्यातही विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता

दिल्लीत केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद दिले होते. तसेच महाराष्ट्रातही होईल का याची उत्सुकता सगळ्यांना आहे. राज्यात विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते, त्यासाठीचा कायदा कोणता, अशी विचारणा करणारे पत्र उद्धवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना दहा दिवसांपूर्वी देण्यात आले होते. 

 या पत्रात विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात तत्काळ अवगत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही माहिती अद्याप मिळाली नसल्याने रविवारी उद्धवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन पुन्हा ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली

Dec 09, 2024 07:59 (IST)

MLA Oath Ceremony: राज्यातील 8 आमदारांचा शपथविधी बाकी

अद्याप ८ आमदारांचा शपथविधी बाकी

शपथ विधी सोहळ्यात ८ आमदार अनुपस्थित

उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके

आज उर्वरित काही आमदार घेणार शपथ

काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घेणार शपथ

Dec 09, 2024 07:58 (IST)

Maharashtra cabinet Expansion: वर्षावर मध्यरात्री खलबतं, मंत्रिमंडळ खाते वाटपावर चर्चा

काल रात्री  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली

या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 10 कॅबिनेट मंत्रि आणि 3 राज्यमंत्री देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मात्र अद्याप अजित पवार यांच्या पक्षाला किती पद मिळणार याची चर्चा झाली नसल्याचं समजतंय