जाहिरात
11 hours ago

Maharashtra Live Blog: संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला तरी अद्याप एक आरोपी फरार असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात मोर्चे, आंदोलने काढली जात असून आरोपीना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे. दुसरीकडे बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्याही अडचणी वाढताना दिसत असून खंडणीसाठी विष्णू चाटेच्या फोनमधून त्याने धमकीचा कॉल केल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातील महत्त्वांच्या अपडेट्समध्ये आजपासून शिर्ड़ीमध्ये भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन सुरु होत आहे. उद्या अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाची सांगता होणार आहे.

वाल्मीक कराडची तब्येत बिघडली, अशक्तपणा जानवू लागल्याने डॉक्टरांकडून तपासणी

खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला अशक्तपणा जानवू लागला 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली तपासणी, कोठाडीतच करण्यात आली तपासणी 

डॉक्टरांनी केला औषधोपचार, वाल्मिक कराड ला 14 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय

सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 सततच्या नापिकीमुळे तालुक्यातील अंगलगाव तांडा येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना ११जानेवारी शनिवार रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली, नामदेव रामू जाधव वय ५५ वर्षं रा. अंगलगाव तांडा ता. जिंतूर असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणताही आरोपी सुटणार नाही : CM देवेंद्र फडणवीस

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करतील. जेवढे पुरावे आहेत त्या सर्व पुरावांच्या आधारावर कारवाई होईल, कुणीही सुटणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे. 

छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा; दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर शहरातील 22 कोटी क्रीडा संकुल घोटाळा अपडेट

आर्थिक गुन्हे शाखेने इंडियन बँकेच्या असिस्टंट मॅनेजरसह एक क्लार्कला केली अटक. 

तसेच क्रीडा संकुल येथील क्लार्क तांगडे याला देखील अटक. 

काही वेळापूर्वी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले आहे.

Sanjay Raut: महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी होणार नाही: संजय राऊत

बीड हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी बाहेर आहेत अशी लोकांची भावना आहे. मोका लावण्यासाठी केस आहे जनतेचा दबाव इतका होता की पोलीस प्रशासनाला दुसरा पर्याय नव्हता.  महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी येणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था बाबीत हे माझे विधान आहे.

फडणवीस बोलले की उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत राजकारनात काही होऊ शकते यावर बोलतांना संजय राऊत म्हटले की , काल देवेंद्र फडणवीस येथे पण आले होते व्यक्तीगत संबंध कायम असतात. परळी आणि बीड प्रकरणामध्ये सरकार एक्शन घेत नाही का सरकारचं काम चालू आहे

Khandoba Yatra Pali: यळकोट यळकोट जय मल्हार.. पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात

महाराष्ट्र, कर्नाटकमधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या  पालीच्या खंडोंबाची यात्रा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यात्रेचा आज मुख्य  दिवस आहे पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जात आहे तर  मुलं भंडार खोबऱ्यात जोकून तो भंडार  खोबरे खंडोबा देवावर उधळुन केलेली नवसे फेडले जात आहेत.

या यात्रेत पेंबर गावातुन  खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधुन मानकऱ्यांच्या सोबत जातो अशी परंपरा असुन मानकरी कमरेला देवाचा मुखवटा बांधुन देवाला  विवाहस्थळी नेण्यात येते यावेळी भाविक यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत  रथावर भंडार खोबरे उधळण करतात.   पौष पोर्णिमेच्या मृग नक्षत्र गोरज मुर्हतावर हा विवाह सोहळा पार पडतो.

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण: सर्व आरोपींवर मोक्काची कारवाई

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.  संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये ही कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. 

Dharashiv Morcha: संतोष देशमुख हत्या प्रकरण: धाराशिव, वाशिममधील जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, या मोर्चासाठी संभाजी राजे छत्रपती,मनोज जरांगे पाटील ,आमदार सुरेश धस , आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार संदीप क्षीरसागर  , देशमुख कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. 

धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर संत गाडगेबाबा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे भव्यसभेत रूपांतर होणार आहे. या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. तर वाहतूक व्यवस्था देखील बदलण्यात आली आहे.

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांपर्यंत मविआ अस्तित्वात नसेल: राधाकृष्ण विखे पाटील

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढवण्याचे संकेत दिलेय यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी महाविकास आघाडीला चिमटा काढलाय, स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर उभ राहून लढू याची आम्हाला चिॅता नाही. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे घरी गेलेय, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेन नाकारल असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी पर्यंत महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नसल्याचे मोठ विधान मंत्री विखे पाटील यांनी शिर्डीत केले आहे. 

Torres Scam: टोरसच्या इंन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ

टोरेस प्रकरणातील घोटाळ्या नंतर वारंवार टोरेस इंस्टाग्राम अकाउंट वर विडिओ अपलोड करणे सुरूच आहे. काल पुन्हा नवीन विडिओ अपलोड करण्यात आला आहे आणि या व्हिडिओ मधून गुंतवणूक दारांना या प्रकरणातील दोषी लोकांची नावे जाहीर करण्यात आली आहे

टोरेस दुकानात लूटमार झाली असून ती लूटमार आणि दुकान तौफिक रियाझ याने प्लॅन करून लुटले असल्याचे सांगितले आहे. या टोरेस दुकानात काम करणारे ऐकून 49 लोकांची नाव देण्यात आली आहेत

आणि पुन्हा टोरेस कंपनी कडून नागरिकांना पैसे देणार असल्याचे आमिष देण्यात येत आहेत.

Sanjay Raut: सर्व पालिका निवडणूका स्वबळावर लढणार: ठाकरे गटाकडून मोठी घोषणा

आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकांसह राज्यातील सर्व  निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सर्वात मोठे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणूका स्वबळावर लढू... असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. 

Torres Scam: टोरस ब्रँड प्रकरणात पोलिसांची छापेमारी, 5 कोटी रुपये जप्त

कोट्यवधी रुपयांची टोरस ब्रँड प्रकरणात पोलिसांचा अजून देखील छापेमारी सुरु आहे.  गेले तीन दिवस छापेमारी सुरु असून   मुंबईतील सर्व दुकानांचा मु्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत. परवा केलेल्या छापेमारी मध्ये पोलिसांना या दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने तसेच 5 कोटी रुपये देखील. मिळाल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली. आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पथका कडून सर्व मुद्देमाल जप्त केला जाणार आहे दुकानाच्या आत पंचनामा सुरु आहे

Malvan Fort News: मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण: शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण:

शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही - हायकोर्ट

याप्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही

आपटेला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती नितीन बोरकर यांचं महत्त्वपूर्ण निरिक्षण

Ambanath News: अंबरनाथ पालिकेतील 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली

अंबरनाथ नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ६२ कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आली आहे. यातील अतिक्रमण विभागातील सर्वच्या सर्व २० कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून यापैकी १० कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे.

अंबरनाथ पालिकेच्या खाते प्रमुखांची खाती महिनाभरापूर्वी बदलण्यात आली होती. यानंतर वर्षानुवर्ष एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होणार असल्याचीही चर्चा होती. विशेषतः अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता अतिक्रमण विरोधी पथकातील सर्वच्या सर्व २० कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यात आली असून सफाई कामगार या मूळ पदावर कार्यरत असलेल्या अतिक्रमण विभागातील १०, कर विभागातील ४, नगररचना आणि लेखा विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची थेट आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे. 

Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये कारची रिक्षासह तीन गाड्यांना धडक

उल्हासनगरच्या कॅम्प ४ भागातील सिद्धार्थ नगर रस्त्यावर एका कारने रिक्षासह तीन गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला आहे. या रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका भरधाव कारने येऊन रिक्षासह अन्य गाड्यांना अचानकपणे जोरदार धडक दिली. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा आणि दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून चालकाला ताब्यात घेतलं  आहे. जखमी रिक्षा चालक सचिन पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा कारचालक मध्यधुंद अवस्थेत भरगाव वेगाने कार चालवत होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.

Devendra Fadnavis: भंडाऱ्याच्या सुकडीत मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले पल्लवीचे पालकत्व, झारखंडच्या रांचीत 68 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत गाजवले होते मैदान.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईच्या निधनानंतर तेरावीच्या कार्यक्रमानिमित्त सांत्वनसाठी भंडाऱ्याच्या सुकळी या पटोलेंच्या मूळ गावी गेले होते. त्यांना भेटण्यासाठी म्हणून फडणवीस गेले असताना मुख्यमंत्र्यांचा हा दौरा एका कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात सेंदूरवाफा येथील पल्लवी सेवकराम डोंगरवार (वय वर्ष 19) ही येथील राजीव गांधी महाविद्यालयात शिकणारी धावपटू असून तीने झारखंडच्या रांची येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत मैदान गाजवले होते. 

धावण्याच्या शर्यतीत पल्लवीने ब्रॉन्झ पदक महाराष्ट्राला मिळवून दिले होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्याच्या सुकडीत नाना पटोले यांच्या घरी सांत्वना भेटी दरम्यान तिची विचारपूस करत पाठीवर कौतुकाची थाप दिली. व महाराष्ट्रासाठी पदक जिंकले असल्याने आणखी चांगले प्रशिक्षण मिळाल्यास महाराष्ट्रासाठी चांगली कामगिरी पल्लवी करू शकते म्हणत पल्लवीचे पालकत्व महाराष्ट्र स्वीकारणार असल्याचे सांगितले.

Dharashiv News: धाराशिवमध्ये आज सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

 धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, या मोर्चासाठी संभाजी राजे छत्रपती,मनोज जरांगे पाटील ,आमदार सुरेश धस , आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार संदीप क्षीरसागर  , देशमुख कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर संत गाडगेबाबा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे भव्यसभेत रूपांतर होणार आहे. या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. तर वाहतूक व्यवस्था देखील बदलण्यात आली आहे.

BJP Adhiveshan Shirdi: शिर्डीमध्ये भाजपचे प्रदेश अधिवेशन भरणार; अमित शहांसह 10 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार

विधानसभा निवडणूकीत महा विजय मिळविल्यानंतर महाराष्ट्र भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय, याच पार्श्वभूमीवर भाजपनं येत्या 12 जानेवारीला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी येथे महाविजय अधिवेशनाच आयोजन केलय. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीतचा मुहूर्त साधून भाजपच हे अधिवेशन शिर्डीत साई संस्थानच्या प्रसादालयाच्या शेजारील मैदानावर पार पडत आहे.

या अधिवेशनासाठी सगळ्या आमदार , खासदार आणि मंत्री यांना शिर्डीमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  त्या आधी सदस्यता नोंदणी जास्तीत जास्त करण्याच्या देखील पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या या अधिवेशनाची सांगता होणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com