Maharashtra Live Blog: नवीन वर्षाभिनंदन. राज्यभरात मोठ्या उत्साहाने सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत केले जात आहे. थर्टी फस्टच्या पार्ट्यांमध्ये तरुण- तरुणी धुंद झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूरमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुसरीकडे राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असून या प्रकरणात आहे. या प्रकरणी रडारवर असलेल्या खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
कामोठ्यात बंद घरात आई, मुलाचा मृतदेह सापडला, हत्या की आत्महत्या?
कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज आपार्टमेन्ट मध्ये दोघांची हत्या झाल्याचा संशय आहे. बंद घरात आई आणि मुलाचा मृतदेह सापडला आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण आहेत. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे आढळले आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर हत्या की आत्महत्या हे समजेल. सोसायटीचे सीसीटीव्ही पोलिस चेक करत आहेत.
अमेरिकेतील लुईझियानामध्ये दहशतवादी हल्ला
अमेरिकेतील लुईझियानामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. गर्दीत भरधाव गाडी घुसवून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. याहल्ल्यात 12 नागरिकांचा मृत्यू, तर 30 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर गाडीतून उतरुन चालकाने अंदाधुंद गोळीबार केला आहे.
वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती ओव्हर हेड पोर्टलवर चढला
वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती OHE पोर्टलवर चढला होता. यामुळे ट्रेन काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. त्याला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. GRP पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
नागपुरात मुलानेच केला आई वडिलांचा खून
24 वर्षीय मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा गळा आवळून खून केला आहे. तर महाजेन्को कंपनीत नोकरीला असलेल्या वडिलांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांना संपवलं. त्यानंतर त्याने आपण खून केल्याचे कबूल केले.
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत . यावेळी अतिदुर्गम भागातील काही महत्त्वाच्या नक्षलवादी म्होरक्यांसह 10 नक्षल्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 130 जणांची चौकशी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जवळपास 130 लोकांची चौकशी केली आहे. सीआयडी अधिकाऱ्यांकडून ही चौकशी केली जात आहे. वाल्मिक कराडचीही चौकशी होत आहे. शरण येण्या आधी वाल्मिक हा कर्नाटक, गोवा, पुणे असा फिरत होता. त्यावेळी सर्व विमानतळावरही त्याची माहिती देण्यात आली होती.
Nashik Crime: थर्टी फस्टच्या पार्टीत राडा, तरुणाच्या हत्येने नाशिक हादरलं
नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली. उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेले तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला. घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गुन्हे शाखेची पथके संशयीतांच्या मागावर रवाना करण्यात आल्याचे समजते.
Chhatrapati Sambhajinagar: शाळेत रेडा घुसल्याने विद्यार्थी जखमी, संभाजीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगर-शहरातील जुबली पार्क भडकल गेट परिसरामध्ये असलेल्या नवखंडा कॉलेज परिसरामधील मॉडर्न स्कूलमध्ये मधल्या सुट्टीत विद्यार्थी बाहेर आले असता एक रेडा मध्ये घुसला रेडा आत मध्ये आला . हा रेडा बाहेर दोन तीन जणांना धडक देऊन सरळ शाळेच्या परिसरात घुसल्याने धावपळ सुरू झाली त्यामध्ये विद्यार्थी जखमी झाले शाळेच्या गेटवर वॉचमनने रेड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु रेडा सरळ आत मध्ये शिरला आणि काही विद्यार्थ्यांना जखमी केले त्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये भरती केले जखमी विद्यार्थ्यांवर घाटी मध्ये उपचार सुरू आहे या घटनेमुळे कोण्या विद्यार्थ्याला जास्त दुखापत किंवा काही जीवित हानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार, राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत
विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीत आणि निवडणूकनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याने तसेच कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे. महिनाभरात राजन साळवी निर्णय घेणार असून ते शिवसेना शिंदे गटात जाणार ही भाजपमध्ये? याबाबत चर्चा सुरु आहे.
Beed News: मस्सजोग जलसमाधी आंदोलन: चक्कर आल्याने महिला रुग्णालयात दाखल
मस्साजोग येथील जल आंदोलनात महिलेला आली चक्कर
बीपी वाढल्यामुळे आली चक्कर
गावकऱ्यांनी महिलेला बाहेर काढले
महिलेला रुग्णालयात हलवले
प्रभावती सोळंके तासभारापासून करत होत्या आंदोलन
केज येथील रुग्णालयात हलवले
Walmik Karad: वाल्मिक कराडच्या CID चौकशीला सुरुवात; परिसरात मोठा बंदोबस्त
बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या सीआयडीकडून चौकशीला सुरवात झाली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची cid पथकाकडून चौकशी होत असून Cid कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा पहिला दिवस आहे. एका बंद खोलीत कराडची चौकशी केली जात आहे.
ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीकरांना ठेवण्यात आला आहे त्या पोलीस ठाण्यात येणाऱ्या आता प्रत्येक माणसाची नोंद घेण्यात येत आहे. यासाठी पोलीस स्टेशनच्या मुख्य गेटवर दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यात एका रजिस्टर वर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नावाची नोंद केली जात आहे.
Solapur Accident News: नववर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
Solapur Accident News: नववर्षाला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जातं असताना मैंदर्गी जवळ ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन हे भाविक गणगापूरला जात होते. यावेळी मैंदर्गीजवळ स्कॉर्पिओ आणि आयशरचा समोरासमोर अपघात झाला. या दुर्घटनेत 2 महिला आणि 2 पुरुषांसह चार जण जागीच ठार झाले.तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील सर्वजण नांदेडमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
CM Devendra Fadnavis: नाराजी नको, त्वरित पदभार स्वीकारा: CM देवेंद्र फडणवीस
महायुतीतील डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याने आता मुख्यमंत्र्यांनीच लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहे. शिवसेना मंत्री यांनी बंगले आणि प्लॅटवरूनही नाराजी व्यक्त केली होती, त्यावर ही सीएम फडणवीस यांनी नाराजी नको तात्काळ फ्लॅट ही ताब्यात घ्यावे काम करावे,.तूर्तास आता देण्यात आलेल्या प्लॅट आणि बंगल्यात रहा असे आदेश दिले आहेत. तसेच येत्या वर्षात काही मंत्र्यांना नव्या जागी मोठे फ्लॅट देण्याचा विचार सुरु असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या प्रकरण: चार आरोपींना बीड पोलीस ठाण्यातून हलवले
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी मोठे पावलं उचलत आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला आता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांसाठी गावकरी एकवटले! आरोपींच्या अटकेसाठी जलसमाधी आंदोलन
बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करा, अशी मागणी करत आज मस्सजोगचे गावकरी एकवटले असून त्यांनी सामुहिक जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संपूर्ण गाव एकत्र आल्याने परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Jayant Patil News: साहेबांचा कार्यकर्ता रडणारा नाही, नव्या लढाईला सज्ज व्हा... जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र
प्रति, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार परिवारातील सर्व सदस्य, आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! २०२४ हे वर्ष आपल्या पक्षासाठी अत्यंत संमिश्र असे वर्ष होते. एकीकडे आपल्या पक्षाचे लोकसभेत सर्वाधिक ८ खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असे यश आपल्याला मिळाले. अर्थात, या अपयशाची कारणीमिमांसा विविध स्तरांवर चालू आहेच. आता दिन दुबळ्यांची, पददलितांची, शेतकरी, कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज होण्याची हि वेळ आहे. सह्याद्री सारख्या कणखर अशा आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही. निवडणुकीत जे अपयश आले ते मागे सोडून आता पुढे जाऊयात. आजही आपल्या पक्षातील एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता जागेवरून हललेला नाही, हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म रक्षणाच्या लढाईसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज होऊयात ! छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा DNA आहे, हे आपण विसरता कामा नये. निवडणुकीतील लाट हि केवळ एकदाच येत असते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे. पुन्हा एकदा आपल्याला व आपल्या कुटुंबातील सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! सदैव आपलाच, जयंत पाटील
Ashatai Pawar: 'पवार कुटुंब एकत्र येऊदे..', अजित पवारांच्या आईचे विठुरायाला साकडे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नववर्षाला पंढरपुरच्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी पवार कुटुंब एकत्र करण्यासाठी त्यांनी विठुरायाला साकडे घातले. घरातील सगळे वाद संपू दे, असे म्हणत वर्षभरात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील असा दावाही त्यांनी केला.
Koregaon Bhima Shourya Din: कोरेगाव- भीमा अभिवादनाला मंत्र्यांची हजेरी, प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकरांकडून विजयस्तंभाला सलामी
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे आज 267 शहरे दिन साजरा होत असतानाच पहाटेपासूनच या जय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे. पहाटे माधुरी मिसळ या राज्यमंत्री यांनी अभिवादन केले त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे इथे येऊन त्यांनी जयस्तंभाच्या ठिकाणी अनुयायांच्या भेटी घेतल्या आणि या स्तंभाला अभिवादन केले त्यानंतर संजय बनसोडे हे कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील आत्ताच विजय स्तंभाला अभिवादन केले आहे.
Mumbai Siddhivinayak Mandir: नव्या वर्षाचे स्वागत, मुंबईकरांची सिद्धिविनायक दर्शनाला गर्दी
नवीन वर्षाचे स्वागत मुंबईकर सिद्धीविनायकाच्या दर्शनाने करत आहेत… मुंबईकरांची अंगारक संकष्टीप्रमाणे सिद्धीविनायक दर्शनासाठी हजारोंच्य संख्येने प्रचंड गर्दी केलीय… सिद्धीविनायक मंदिर न्यासानेही भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विशेष नियोजन केले आहे. नवीन वर्ष चांगले जावो यासाठी मुंबईकर शूभंकर सिद्धीविनायकाच्या दर्शनाने सुरवात करत आहेत.
Pandharpur Vitthal Mandir: विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची आणि फळांची आकर्षक सजावट
नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठल दर्शनाने व्हावी. यासाठी पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आळंदी येथील भाविक प्रदीप सिंह ठाकुर यांनी विठ्ठलाचरणी संत्री आणि फुलांची आकर्षक सजावट केली आहे. झेंडू शेवंती फुलांसह मंदिरामध्ये संत्र्यांची केलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधत आहे.
Ganpatipule Mandir: गणपतीपुळेत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नवी दिशा, नवी आशा व नवी आकांक्षा घेऊन आलेल्या 2025 मधील पहिल्या सूर्योदयाच्या साक्षीने असंख्य भाविकांनी सहकुटुंब देवदर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात केली. त्यासाठी रत्नागिरीतल्या गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.. बाप्पाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक यासाठी गणपतीपुळेत दाखल झाले आहेत. नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना भाविकांनी बाप्पाच्या चरणी मनोभावे केली.
Nashik Saptshrug Gad: सप्तशृंगगडावर भाविकांची गर्दी, आदिमायेचे दर्शन घेत केले नववर्षाचे स्वागत
नववर्षाच्या स्वागतासाठी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपिठ असलेल्या नाशिकच्या श्री.क्षेत्र सप्तशृंगगडावर भाविकांनी आज गर्दी केली.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य व परराज्यातील भाविकांनी सप्तशृंग गडावर कालपासून हजेरी होती.भाविकांची गर्दी पाहता आदिमायेच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवले आहे.नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी या उद्देशाने भाविक १ जानेवारीला आदिमायेचे दर्शन घेवून नव्या वर्षाची सुरुवात केली.पहाटेपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेकांनी आदिमायेचे दर्शन घेत नववर्षाचे संकल्प केले.येणारे वर्ष सुखाने आनंदाने जावो, संकटे दूर व्हावो अशी देवी चरणी प्रार्थना केली..
New Year Nagpur: नागपूरच्या साई मंदिरात भाविकांची गर्दी
नववर्षाची सुरुवात भाविक मंदिरात जाऊन करतात. आज नागपूरच्या वर्धा रोडवरील साई मंदिरात सुंदर फुलांची विशिष्ट पद्धतीने सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
आज नव वर्षाच्या प्रथम दिनाच्या निमित्ताने भक्तांची गर्दी अपेक्षित असून साईबाबा सेवा मंडळ तर्फे नववर्ष साजरा करताना आज दिवसभर मंदिरात आरती आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Koregaon Bhima Shourya Din: कोरेगाव भीमा शौर्य दिन: प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन
महार सैनिकांच्या सन्मानार्थ कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून अनुयायी मानवंदना देण्यासाठी येत असतात. यंदाही कोरेगाव भीमा येथे शाहीर स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेक बांधव तुळापूर येथे येत आहेत.
Jalgaon News: बापरे! ऑनलाइन ऑर्डर केलेल्या मोबाईलच्या बॉक्समध्ये निघाले साबण
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या तांदलवाडी येथे ऑनलाइन ऑर्डर केलेल्या मोबाईलच्या बॉक्स मध्ये चक्क साबण निघाल्याचा आरोप तांदलवाडी येथील सुनील पाटील यांनी केला असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन वर सवलत असल्याने सुनील पाटील यांनी मोबाईल ऑर्डर केला होता मात्र या ऑर्डरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर मोबाईलच्या बॉक्समध्ये चार साबण निघाले असून ऑनलाईन खरेदीवर आपली फसवणूक झाल्याचा आरोप देखील सुनील पाटील यांनी केला आहे.
Happy New Year: खामगाव शहरात पोलीस आणि स्वराज्य फाऊंडेशनकडून मोफत दूध वाटप
नवीन वर्षाचे स्वागत हे मध्य प्राशनाने नसून दूध पिऊन करावं मध्य प्रश्न करून वाहन चालवू नये... असा संदेश देत आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील स्वराज्य फाऊंडेशन सामाजिक संघटनेने तरुणांना दूध वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. अनेकदा 31 डिसेंबरच्या रात्री तरुण मुलं हे दारू पिऊन वाहन चालवतात किंवा धिंगाणा घालतात त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना तरुणाईने काळजी घ्यावी व मध्यापान न करता दूध पिऊन नववर्षाचा स्वागत करावं असा संदेश देत खामगाव शहर पोलीस व सामाजिक संघटनांनी शहरात तरुणांना दूध वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे..
Shirdi News: साईबाबांच्या शिर्डीमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत
साई बाबांच्या शिर्डीत 2024 ला निरोप आणि 2025 या नवर्षाचं अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. साई मंदिरातील घडाळ्यात रात्री बरोबर बारा वाजता साईंचा जयघोष करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्याय.. तर साईंच्या व्दारकमाई समोर लाखो भाविकांनी एकत्र साईनामा जयकारा करत नवीन नव वर्षाच सेलिब्रेशन केलय.. फटाके फोडत, केक कापून साई भक्तांनी 2024 ला निरोप देत 2025 या नवीन वर्षाच आनंदात स्वागत केले.