जाहिरात
17 hours ago

Maharashtra Live Blog: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असून आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत आहे. फरार असलेल्या आरोपीला अटक करण्याची मागणी करत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मस्सजोगमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आजपासून उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. 

15 जानेवारी रोजी होणारी NET UGC परीक्षा पुढे ढकलली

मकर संक्रांती आणि पोंगलसह इतर सणांमुळे 15 जानेवारी रोजी होणारी NET UGC परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. पीएचडी, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) प्रवेश आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. 

शेलूबाजार-वाशिम रस्त्यावरील दुचाकील भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

शेलूबाजार-वाशिम रस्त्यावरील गोगरी फाट्याजवळ दुचाकीला भीषण अपघात. दोन जणांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. राजू येवले आणि हनुमान आंबेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू. 

Washim News : कुख्यात गुंडाची पोलीस कर्मचाऱ्याला कारागृहात बेदम मारहाण

कुख्यात गुंड संतोष ठोकेची पोलीस कर्मचाऱ्याला कारागृहात बेदम मारहाण, 

वाशिम जिल्हा कारागृहातील खळबळजनक घटना

खंडणी मारहाण आणि इतर गुन्ह्यांमध्ये मागील अनेक वर्षांपासून संतोष ठोके हा कारागृहात बंद 

वाशिम आणि अकोल्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा संतोष ठोकेवर गंभीर गुन्हे दाखल 

सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही, अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा, सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही

आगामी सिल्लोडची नगरपरिषद माझी शेवटची निवडणूक असणार : अब्दुल सत्तार 

मतदारसंघाचा विकास करूनही, जातीपातीवर निवडणूक होत असल्याची सत्तारांची खंत

Kalyan News : मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना चोप, पोलिसांनी रोडरोमियोंना घेतलं ताब्यात

कल्याण पूर्व येथील 100 फूट रोडवर भरदिवसा मुलींची छेड काढण्याचा प्रकार समोर आला आहे. टेम्पोमधून मुलींची छेड काढणाऱ्या तीन आरोपींना संबंधित विद्यार्थिनींनी धडा शिकवला. नागरिकांनी आरोपींना चांगली अद्दल घडवली. रोशन शर्मा, कपिल जयस्वाल, आणि आशिष कुमार गौतम अशी या तिन्ही रोड रोमियोची नावे असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टोरेस कंपनीच्या मुंबईतील शाखेतून एकूण 20 कोटी रुपये जप्त

टोरेस कंपनीच्या मुंबईतील शाखेतून एकूण 20 कोटी रुपये जप्त. येस बँक, कोटक बँक आणि एचडीएफसी  बँकेत असलेले टोरेसचे अकाऊंट पोलिसांकडून सील.  तिन्ही अकाऊंटमध्ये 11 कोटी. आतापर्यंत 2000 गुंतवणूकदारांची जवळपास 38 कोटी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. यातील 50 टक्के पैसे लोकांना परत मिळतील अशी आशा आहे. 

Nashik News : नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या मुलांच्या वडिलांना अटक

Nashik News : नायलॉन मांजाचा वापर करणे मुलांच्या वडिलांना भोवले. नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या मुलांच्या वडिलांना करण्यात आली अटक. 50 गुन्ह्यांमध्ये 28 आरोपींवर कारवाई यात 7 वडिलांचा समावेश. काही अल्पवयीन मुलांवरही करण्यात आली कारवाई. सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांविरोधात नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर.

सांगलीत मित्रांसोबत फिरायला आलेला तरुणा वारणा नदीत बुडाला

सांगलीच्या चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडाला. रविवारी संध्याकाळी घडली घटना. अभिषेक काळे (वय 25)  असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. शोधकार्य सुरू आहे. अभिषेक व त्याचे काही मित्र पर्यटनासाठी चांदोली परिसरात आले होते. येथील उखळू पुलाजवळ त्यांनी पार्टी केली. त्यानंतर अभिषेक आणि त्याचे काही मित्र नदीमध्ये अंघोळीसाठी  उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अभिषेक पाण्यात बुडू लागला सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला. 

मिरज मार्गे धावणारी पुणे-एर्णाकुलम एक्सप्रेसची सेवा दोन महिन्यांसाठी बंद

सांगली, मिरज मार्गे जाणारी पुणे-एर्णाकुलम एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. 18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत ही रेल्वे सेवा पुणे- सांगली मार्गे बंद असणार असून ती आता पुणे पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. दक्षिण- पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसलराक ते कुलम रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून सातारा, सांगली आणि मिरज मार्गे जाणारी एर्णाकुलम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. यामुळे पुणे ते नागपूर रेल्वे सेवा 18 जानेवारी ते 12 एप्रिल आणि बेळगावकडून पुण्याकडे जाणारी एर्णाकुलम एक्सप्रेस 20 जानेवारीपासून 14 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे, अशी माहिती मिरज रेल्वे कृती समितीकडून देण्यात आली आहे.

CM देवेंद्र फडणवीसांचा बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन

आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला, एकही आरोपी सुटता कामा नये, मुख्यमंत्र्यांच्या सूचना 

तपासात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे

कुणावरी दया दाखवू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Congress New Campaign: ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान, ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्यभर आयोजन

भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून २६ जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महू येथे एक भव्य रॅलीने त्याची सांगता होणार आहे.

राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी २६ जानेवारी २०२५ रोजी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान अधिक मजबूत करण्यासाठी २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहिम सुरु केली जाणार आहे. या अभियानात प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, सेल व विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Torres Scam: टोरेस घोटाळा प्रकरण: अटक आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

टोरेस घोटाळ्याप्रकरणी अटक आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ 

अटक करण्यात आलेल्या तानिया कासातोआ, व्हॅलेंटीना गणेश कुमार आणि सर्वेश सुर्वे यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी 

विशेष MPID कोर्टाने केली तिन्ही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

टोरेसच्या गुंतवणूकदारांची संख्या 2000 वर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती

फरार आरोपींची संख्या 12 वर, फरार आरोपींमध्ये अनेक आरोपी रशियन आणि युक्रेनचे नागरिक

Dhule News: धुळ्यात ठाकरे शिवसेना आक्रमक; खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोखे आंदोलन

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या कमलाबाई कन्या विद्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या रस्त्यावरून विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर भविष्यात शिवसेना स्टाईलने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Ratnagiri News: शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड; पालकांनी दिला शिक्षकाला चोप

 दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची छेडछाड काढल्याप्रकरणी पालकांनी शिक्षकाला चोप दिल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडला आहे. शहरातील एका नामांकित शाळेत सदर प्रकार घडला आहे. दरम्यान, याप्रकरणात कंत्राटदार तत्वावर असलेल्या शिक्षकाला शाळेनं त्वरित निलंबन केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. छेडछाड केलेल्या विद्यार्थीनीच्या पालकांनी शाळेत जात संबंधित शिक्षकाला जाब विचारत त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पोलिस आणि संस्थेचे सदस्य देखील शाळेत दाखल झाले. याप्रकरणी चौकशीसाठी काही मुलींचे जबाब देखील पोलिसांकडून नोंदवले जाणार आहेत. 

Torres Scam: टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई, आर्थिक गुन्हे शाखेची पोईसरमध्ये छापेमारी

मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडवर

टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई

आर्थिक गुन्हे शाखेची पोईसरमध्ये छापेमारी

दादर पाटोपाट आता पोईसरमधील टोरेस कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेचा छापा

Thane Protest: ठाणे महापालिकेबाहेर प्रहार दिव्यांग संघटनेचं आंदोलन, गेट तोडून आयुक्त दालनात घुसण्याचा इशारा

दिव्यांगांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, मात्र ठाणे महापालिकेकडून या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक दिव्यांग बांधव या योजनांपासून वंचित राहिल्याचा आरोप करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं आज ठाणे महापालिकेवर धडक देत ठिय्या आंदोलन केलं.

व्हीओ : दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे फलक हातात घेत ठाणे महापालिकेविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांना महापालिकेचा मासिक २ हजार रुपये निधी २ वर्षांपासून मिळाला नसल्याचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा आरोप आहे. आमचा दोन वर्षांपासूनचा निधी हा लाडक्या बहिणींना दिला जात असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास  गेट तोडून आयुक्तांच्या दालनात घुसू, असा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं दिला आहे.

Washim News: संत झोलेबाबा यांच्या 60 व्या भव्य यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात

वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील श्रीक्षेत्र चिखली येथे परमहंस संत झोलेबाबा यांच्या ६० व्या भव्य यात्रा महोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे.आज सकाळी ४ वाजता संत झोलेबाबा यांची महापूजा करण्यात आली, ज्यासाठी दूरदूरून आलेल्या भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यात्रेच्या निमित्ताने संध्याकाळी ७१ क्विंटल महाप्रसादाचे वितरण होणार आहे, ज्याचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविक घेत आहेत.यात्रा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. विशेष आकर्षण म्हणून, चिखली गावातील गायत्री गावंडे आणि प्राप्ती गावंडे या भगिनींनी संत झोलेबाबा यांची हुबेहूब प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे, जी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.यात्रेच्या वातावरणात भक्तीभाव आणि उत्साह अनुभवायला मिळत आहे.

Indapur Accident: इंदापुरमध्ये भीषण अपघात, 4 जण गंभीर

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळ सिनारमास या ठिकाणी क्रुझर गाडीला अपघात झालाय.पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली क्रुझर पुढे निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली आणि या अपघातामध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. मात्र या अपघाताच नेमकं कारण समजू शकलं नाही.

Live Update : न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं - धनंजय देशमुख

न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं - धनंजय देशमुख 

Live Update : सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

थोड्याच वेळात बैठकीला होणार सुरुवात.

100 दिवस नियोजन आराखडा सादरीकरणा संदर्भात बैठक

बैठकीत शालेय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पणन, इतर मागास बहुजन कल्याण, पर्यटन, माहिती व जनसंपर्क या विभागाचा घेतला जाणार आढावा

Live Updates : तब्बल 4 तासांनंतर धनंजय देशमुखांचं आंदोलन मागे

धनंजय देशमुख गेल्या चार तासांपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत होते. अखेर त्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. ते पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले आहेत. 

Santosh Deshmukh Murder Case: धनंजय देशमुख यांचे टॉवरवर चढून आंदोलन, मनोज जरांगेंची विनंती

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मस्सजोगचे गावकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. दुसरीकडे सर्वजण त्यांना खाली उतरण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे मस्सजोगमध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Congress Maharashtra Chief: काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष ठरले? पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला रवाना

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तात्काळ बोलावणं, पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसकडून याची दखल घेत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे

Thane Bombay Duck Fire: ठाण्यामधील बॉम्बे डक हॉटेलला भीषण आग; पाळीव मांजराचा मृत्यू

ठाण्याच्या उपवन भागातील बॉम्बे डक हॉटेलला पहाटे मोठी आग

आगीत हॉटेलमधील साहित्य जळून खाक

आगीत हॉटेलमधील पाळीव मांजरीचा धुराने गुदमरून मृत्यू

सकाळी साडेसात वाजता ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश

Amabadas Danve: संतोष देशमुखांच्या हत्येतून वाल्मिक कराडला का वगळले: अंबादास दानवेंचा सवाल

संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचे स्पष्ट आहे . या सर्व घटनेचा कर्ता  धर्ता वाल्मीक कराडच आहे. असं असताना वाल्मीक कराड याला मोका का लावला जात नाही असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला केलाय. वाल्मीक कराडला मोका लावत नसतील तर देशमुख कुटुंबीयांचा संयमाचा बांध फुटणे साहजिक आहे. अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. वाल्मीक कराड याला मोका लावला नाहीतर आपण स्वतःला संपवू असा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सरकारला दिलाय. त्यावर ते बोलत होते.

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! मंत्री गिरीश महाजन यांनी बोलावली बैठक

- नाशिकमधील भयंकर अपघातानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी बोलवली पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक:

- नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक

- नाशिकच्या उड्डाण पुलावर रात्री झालेल्या अपघात प्रकरणी तातडीची बैठक 

- अपघातात वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न 

- वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन करणार पोलीस आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांची चर्चा

Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांसह संघटना आक्रमक

आशिया खंडातील कांद्याची सर्वात  मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या  लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत  कांद्याच्या दरात 1000 रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांद्याचे सरासरी कांद्याचे  दर तेराशे रुपये पर्यंत कोसळल्यामुळे  कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना आक्रमक झाली केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे संपूर्ण राज्यात रस्ता रोको रेल रोको सारखे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला 

Ratnagiri Accident: प्रवाशांनी भरलेली बस पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली; मोठा अनर्थ टळला

मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाटात मध्यरात्री 1 च्या सुमारास दाभोळ-मुंबई बस सुमारे पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली.. सुदैवाने बस झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला.  तसेच काही अंतरावर धरण असल्याने बस धरणात जाण्यापासून बचावली.  बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते. पैकी 7 प्रवासी जखमी झाल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.अपघातग्रस्त बस क्रेनच्या साह्याने दरीतून काढली जाणार आहे. या अपघाताला प्रथमदर्शनी चालक जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.. अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत..

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरण, देशमुख कुटुंबाचा टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला एक महिना झाला तरी अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपी अटक नाहीत एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला तात्काळ अटक करावी तसेच वाल्मीक कराड वर 302 तसेच मोका नुसार कारवाई करावी यासह इतर मागण्या साठी देशमुख कुटुंब आज टॉवर चढून आंदोलन करणार आहे.

दरम्यान प्रशासनाने कुठलाही अनुचित प्रकार होण्यासाठी मस्साजोग परिसरात असलेले तिन्ही मोबाईल टॉवरखाली पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात करण्यात आला आहे.

Kiit Somaiya Amravati Visit: किरीट सोमय्यांचा अमरावती दौरा

भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर. बांगलादेशी, रोहिंग्याना अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांनी 1100 जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप सोमैया यांनी केला होता... या आरोपानंतर सोमैय्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर....

अंजनगाव सुर्जी तहसीलमध्ये घेणार आढावा बैठक...

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीचे राजकीय वातावरण तापणार..

Bus Service Stopped: मुंबईमधील खासगी कंत्राटदारांची बससेवा बंद; चाकरमान्यांचे हाल

मुंबईमध्ये खासगी कंत्राटदारच्या वाहक चालकांनी बस सेवा बंद केली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार सदर बस वाहक , चालक यांना पगार वेळेवर मिळत नाही,त्यांना कायमस्वरुपी कामगार घेण्यात यावे,अश्या विविध मागण्या आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी बाहेरील व्यक्तीने प्रतीक्षा नगर येथील सदर कॉन्ट्रॅक्टर मधील एका कामगार वर्गास येऊन मारले होते. बस वेळेवर येत नाही त्यामुळे सदर व्यक्ती डेपो मध्ये विचारण्यास गेली असता त्यांच्यात वाद झाला होता. कंत्राटदार कामगार वर्गास कोणतीही सुरक्षा नाही, त्यांना वेळेवर पगार नाही, बेस्टचे कोणतेच फायदे त्यांना होत नाही, वेळेवर पगार नाही,  त्यांना बेस्ट उपक्रमाने कायमस्वरुपी करावे अशी त्यांची मागणी आहे

Varsha Gaikwad: सुहास कांदेंच्या पीएची दादागिरी, वेटरवर बंदुक रोखली

महाराष्ट्र आता थांबणार नाही, असं म्हणणाऱ्या सरकारच्या बोलण्याचा अर्थ नक्की काय आहे ते पहा.. सर्वसामान्यांच्या सुरक्षेला घेऊन महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती आहे, ती पाहता गुन्हेगारी फोफावणं म्हणजेच या सरकारच्या लेखी विकास म्हणावा बहुतेक.

सत्ताधारी पक्षातील आमदार सुहास कांदे यांचा सुरक्षा रक्षक हॉटेलमध्ये चारचौघात वेटरवर थेट पिस्तूल रोखून धरतो.. हा माज आणि एवढा निडरपणा आला कुठून? कायद्याची जराही भीती नाही. महाराष्ट्र आता थांबताना दिसत नाही पण, तो वाढत्या गुन्हेगारीच्या आणि गुंडशाहीच्या बाबतीत. कपटी सरकारकडून गुन्हेगारी पोसली जातेय, महाराष्ट्राचं दुर्भाग्य..!

Santosh Deshmukh Murdrer Case: मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सामुहिक आत्मदहनाचा इशारा

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात  गतीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी दि.14 जानेवारी रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार असून यामध्ये वाल्मीक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच मकोका लावावा, आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी, शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीश मानेशिंदे यांची नियुक्ती करावी, एसआयटीमध्ये पंकज कुमावत या अधिकार्‍याची तत्काळ नियुक्ती करावी, सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती कुटूंबीयांना द्यावी , पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करुन सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून या निवेदनावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह 25 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी देखील आहेत.

Khandoba Yatra: नळदुर्ग येथील श्री खंडोबा यात्रेस प्रारंभ, लाखो भाविक मैलारपुरात दाखल

महाराष्ट्रसह, आंध्र प्रदेश कर्नाटक व तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा यात्रेस प्रारंभ झाला. धाराशिव, सोलापूर व लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात काठ्या दाखल होत आहेत. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून फुलांच्या माळांनी सजवले आहे. सोमवारी (दि.१३) यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे रविवारपासूनच भाविक मंदिर परिसरात दाखल होत आहेत. भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. भाविक श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात येताहेत. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या दणदणाटाने मंदिर परिसर दणाणला आहे.

Bhandara News: बेकायदेशीर रेती वाहतुकीवर कारवाई; 6 जणांना अटक

तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रेती चोरी व वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून बावनथडी नदी पात्रातून रेती चोरी होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांना प्राप्त झाले होते. यावरून त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.मध्यप्रदेशातून अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर गोबरवाही हद्दीत जाणार असल्याची माहिती मध्यरात्री मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

Malegaon News: मालेगावच्या सोयगावमध्ये संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

मालेगावच्या टेहरे फाटा ते डि के चौकापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील गतिरोधक हटविल्याने काल सायंकाळी भरधाव  वाहनाच्या धडकेत 8 वर्षाचा चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी रात्री उशिरा बच्छाव सर्कल येथे रास्ता रोको आंदोलन केले.या रस्त्यावरील गतिरोधक बसवावे अशी नागरिकांची मागणी होती.मात्र. पोलिस प्रशासनाने मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com