Maharashtra Live Blog: पुण्यातील स्वागरेट स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची भयंकर घटना घडल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी (26, फेब्रुवारी) पहाटे साडे पाच वाजता ही भयंकर घटना घडली. अत्याचारानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला तब्बल 72 तासानंतर अटक करण्यात आली. कोर्टात हजर केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कोर्टात आरोपीच्या वकिलांनी मोठा दावा केला असून पिडीत मुलगी आणि आरोपी एकमेंकांना ओळखत होते, दोघांच्या संमतीनेच शरीरसंबंध ठेवले गेल्याचे म्हटले आहे, त्यामुळे या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात एसटी बस चालकाच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार
कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासण्याचे प्रकार सुरूच आहेत. कर्नाटकातील कलबुर्गी शहरात कन्नड कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड आगाराची बस थांबवून चालक व वाहकांना काळे फासल्याची घटना घडली आहे. धाराशिवच्या उमरगा बसस्थानकात बस दाखल होताच चालक- वाहकाने आगार व्यवस्थापकांना हा प्रकार सांगितला. महाराष्ट्रातील बसवर काळ्या पिवळ्या व लाल रंगाने कन्नड भाषेत 'जय कर्नाटका' असेही लिहीले.
Live Update: इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला आहे. कोरटकरला 11 दिवसांचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे. पुढील अकरा दिवस प्रशांत कोरटकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी कोर्टानं दिली आहे. कोरटकर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.
ज्येष्ठ लेखिका डॉ. मीनाताई प्रभू यांचे निधन
ज्येष्ठ लेखिका डॉ. मीनाताई प्रभू यांचे आज दुपारी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
स्वातंत्र्य वीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. याचिकाकर्ते यांचे वकील मनोज पिंगळे यांनी ही माहिती दिली आहे. ऑनलाइन हजर राहता येणार नाही. प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. पुढील सुनावणी मे मध्ये होणार आहे. कोर्टात सर्वजण समान असल्याचे न्यायालयाने सांगितलं.
शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला
शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांची पुण्यात भेट घेतली. कालवा समितीच्या बैठकीसाठी दाखल झालो असल्याचं उत्तम जानकर यांनी यावेळी सांगितलं. उत्तम जानकर अजित पवारांसोबत कालवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. उत्तम जानकर यांच्यासोबत उमेश पाटील देखील बैठकीसाठी दाखल झाले.
Latur News: दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या रूम रामभरोसे
लातूरमध्ये दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या संरक्षक रूम रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. परीक्षा केंद्रावरील संरक्षण रूम सीलबंद असायला हव्यात मात्र प्रश्नपत्रिका ठेवलेल्या रूममध्ये इतर कर्मचाऱ्यांचा वावर असल्याचं दिसत आहे. प्रश्नपत्रिका ठेवलेल्या रूममध्ये कर्मचाऱ्यांकडे मोबाईल असल्याचा सुद्धा दिसत आहे. या अगोदर जर पाहिलं तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना कॉपी प्रकार समोर आला असताना आता लातूरमध्ये चक्क प्रश्नपत्रिका ठेवलेल्या रूम राम भरोसे असल्याचे दिसत आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग यावर काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचा आहे..
Jalna News: चोरट्यांकडून सोयाबीन आणि हरबऱ्याची चोरी
अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी दुकानाचे गोडाऊन फोडून सोयाबीन आणि हरभऱ्याचे पोते चोरून नेल्याची घटना घडलीय. 5 ते 6 अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन चे कुलूप तोडून गोडाऊन मध्ये थप्पी करून ठेवलेले सोयाबीन आणि हरबऱ्याचे सुमारे 70 हजार रुपये किंमतीचा पोते चोरून नेलेत. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील अंबडगाव या ठिकाणी ही घटना घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.या प्रकरणी प्रसाद जऱ्हाड यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात 5 ते 6 अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरू केलाय....
Nandurbar News: आदिवासी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
- आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱया विद्यार्थीनीची आत्महत्या...
- आश्रमशाळेतील वसतीगृहाच्या इमारतीमधील तिच्या खोलीत केली आत्महत्या...
- मोहीदा एकलव्य मॉडेल स्कूलची आठवीत शिकणारी 13 वर्षीय विद्यार्थीनी...
- मात्र एकलव्य मॉडेल शाळेचे काम सुरु असल्याने तालुक्यातील सुलतानपुर येथील आश्रमशाळेत तात्पुरती स्थलांतरी होती ही शाळा...
- धडगाव तालुक्यातील अट्टी गावची रहिवासी...
- सकाळी वर्ग मैत्रीणी खोलीत गेल्यावर उघड झाला प्रकार...
- पोलीस पालकांची करत आहे प्रतिक्षा...
- आत्महत्येचे कारण अस्पष्ट...
Pune News: पुण्यात नामदेव ढसाळ यांच्या समर्थनात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन
पुण्यात नामदेव ढसाळ यांच्या समर्थनात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी पक्षाच आंदोलन
सेन्सॉर बोर्डाने नामदेव ढसाळ यांच्या विरोधात केलेल्या विधानानंतर पुण्यात आंदोलन
नामदेव ढसाळ कोण? अस विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात करण्यात आल आंदोलन
सरकारने बौद्धिक योग्यता नसलेल्या लोकांना पदावर बसवल्यामुळे अशी विधानं होत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप
Nashik News: नाशिकमधील कॅफेवर आमदार देवयानी फरांदेंचा छापा
- नाशिकच्या उच्चभ्रू गंगापूर रोडवरील 'मोगली कॅफेवर भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा छापा
- कॅफेमध्ये अंधारात जोडप्यांचे सुरू होते अश्लील कृत्य
- महाविद्यालयीन मुला मुलींना 100 ते 200 रुपयात रूम दिले जात असल्याचा फरांदे यांचा आरोप
- आमदारांच्या छाप्या नंतर पोलिस घटनास्थळी दाखल, पोलीसांवरही फरांदे संतापल्या
Live Updates: भाईंदरमध्ये सकल मराठा समाजाचे जोडो मारो आंदोलन, प्रशांत कोरटकर विरोधात संताप
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात मीरा-भाईंदर शहरात संतापाची लाट उसळली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने गोल्डन नेस्ट सर्कल येथे जोरदार "जोडो मारो" आंदोलन करण्यात आले.
यावेळी समाजाने सरकारकडे ठणकावून मागणी केली की, छत्रपती महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कायदा करावा आणि अशा वक्तव्यांना आळा घालावा.
आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी इशारा दिला की, कोरटकर हा जर मराठा समाजाच्या हाती लागला, तर त्याला जिथे भेटेल तिथे चोप देण्यात येईल. मराठा समाजाच्या भावना दुखावणाऱ्या कोणालाही माफ केले जाणार नाही, असेही ठणकावून सांगण्यात आले.
Nashik News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवरील शिक्षेची सुनावणी लांबणीवर
कोकाटेंवरील शिक्षेसंदर्भातील पुढची सुनावणी आज दुपारी.. हरकत याचिकेंमुळे निकाल लांबणीवर
LIVE Updates: आजपासून शनिदेवाला ब्रँडेड तेलाचा अभिषेक
- आजपासून शनिशिंगणापूरच्या शनि देवाला ब्रँडेड तेलाने केला जाणार अभिषेक
- भेसळयुक्त सुट्टे तेलाने देवाच्या शिळेची झीज होत असल्याचा देवस्थानने केला होता दावा
- मंदिराबाहेर सुट्टे तेल विक्रीला बंदी
- भेसळीचे तेल ओळखणार तरी कसे ? हा प्रश्न कायम
- दर्शन रांगेत सुट्ट्या तेलावर देवस्थानचे कर्मचारी ठेवणार वॉच
- वर्षभरात अंदाजे पाच लाख लिटर तेल भाविकांकडून वाहिले जाते
Chhatrapati Sambhajinagar: महिलेशी चॅटिंग केल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण
एका महिला सोबत सोशल मीडियावर बोलल्याचा राग मनात धरून एका 26 वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याला गाडीत कोंबून अपहरण करण्यात आल्याची घटना कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे घडली होती.या प्रकरणाचा तपास लावण्यात पिशोर पोलिसांना यश आले असून अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करत एकूण सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.सर्फराज रऊफ शहा असे अपहरण झालेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव असून सय्यद मोहम्मद, शोएब अली, मंजूर अली, मोसिन शेख, सुलतान तांबोळी आणि जुनेद अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सरफराज याची सुटका केली आहे.आणि आरोपीविरोधात पिशोर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्ली हायकमांकडून निर्णय
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
विधानसभा
अमीन पटेल - उपनेते
अमित देशमुख - मुख्य प्रतोद
विश्वजीत कदम - सचिव
शिरीषकुमार नाईक - प्रतोद
संजय मेश्राम - प्रतोद
विधानपरिषद
सतेज ऊर्फ बंटी पाटील - गटनेता
अभिजीत वंजारी - मुख्य प्रतोद
राजेश राठोड - प्रतोद
Palghar News: पालघरच्या ओस्तवाल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग
पालघर च्या बिडको येथील ओस्तवाल इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शेतीचे प्रयत्न सुरू
सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही,आगीचा कारण अस्पष्ट
सॉक्स बनविणाऱ्या कंपनीला लागली आग
Mumbai Goa Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, 2 जखमी
मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील वळणावर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला अपघात झाला.. या भीषण अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर यांना वाचविण्यात यश आलं आहे, मात्र अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर काहीच वेळात कंटेनरला भीषण आग लागली.. काल रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.. भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंदकुमार सुर्वे यांनी आपला पाण्याच्या टँकर उपलब्ध करून दिला. तसेच महामार्ग ठेकेदाराकडून टँकर उपलब्ध करून देण्यात आला. राजापूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.. मात्र आगीत कंटेनर जळून खाक झाला.
Pune Crime: इंदापूर खून प्रकरण: पाच जणांना ठोकल्या बेड्या
पुण्याच्या इंदापूर तालुक्यात श्रेय वादाच्या लढाईतून खोरोची येथील उत्तम जालिंदर जाधव या 34 वर्षे युवकावर आमच्या दुश्मनांना आमच्या खबरी देतो असं म्हणत धारदार शस्त्राने सपासप वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान जाधव यांचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत पाच आरोपींना जेरबंद केल आहे. राजु भाळे, नाना भाळे, रामदास भाळे, शुभम आटोळे, बालाजी वाघमोडे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
Akola news: काेचिंग क्लासच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
अकाेला शहरात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका काेचिंग क्लासच्या विद्यार्थ्याने ताेष्णीवाल ले-आऊट परिसरातील जलाराम अपाटर्मेटमधील एका भाड्याच्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास घडली. शहरातील जलाराम सोसायटी मध्ये भाड्याने असणाऱ्या १७ वर्षीय प्रसन्न वानखडे या रा. बेळगाव,ता. मेहकर, जि. बुलडाणा असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहेये..
विद्यार्थी हा नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी अकाेला शहरात खाेली करुन समवयस्क मुलांसाेबत राहत हाेता. विद्यार्थ्याचे मित्र बाहेर पडल्यावर शुक्रवारी रात्री आठनंतर या मुलाने खाेलीत एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केलीये, अशी माहिती सिव्हिल लाइन पाेलिसांनी दिलीय.
Nagpur Crime: बहीण- भावाने चक्क बोगस दवाखाना टाकला, नागपुरातील प्रकार
नागपुरात एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांनाही बहीण- भावाने चक्क बोगस दवाखाना टाकल्याची आणि कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांनाही रुग्णांना तपासणे, औषध देणे ही कामे केल्याची घटना समोर आली आहे.
नागपूरच्या अन्सार नगर परिसरातील घटना.
डॉक्टर साजिद अन्सारी हा दवाखाना चालवायचे. मात्र, त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा 23 वर्षीय जैद अन्सारी आणि बहीण समन अन्सारी हे नियम धाब्यावर बसवून दवाखाना चालवत असल्याने महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या दवाखान्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
Live Update: राज्यातील 17 कारखान्यांना प्रदूषण मंडळाकडून क्लोजर नोटीस
दूषण रोखण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठवाड्यातील 17 कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने क्लोजर नोटीस म्हणजे कारखाने बंद करण्याची नोटीस बजावली आहे. मागील वर्षभरात प्रथम कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहे. तरीही या कंपन्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष कार्यवाही केली नाही. यामुळे या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रदूषण विभागाने घेतलाय. त्यामुळे कंपन्यांना त्यांचे कारखाने बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
Manikrao Kokate: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालाचा आज होणार फैसला
अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या अडचणीत सापडले असून त्यांच्या निकालाचा फैसला आज होणार आहे. 20 फेब्रुवारीला नाशिक कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 2 वर्ष कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. या निकालाला आव्हान देत कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली होती. 24 आणि फेब्रुवारीला कोकाटे यांच्या वकीलांची आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद पार पडला होता आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवत 1 मार्च ही तारीख दिली होती, कोकाटे यांच्या वकीलांनी केलेली शिक्षेवरील स्थगितीची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली होती. आज निकाल येणार असल्याने कोकाटे यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे त्यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवारही कायम असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनातही या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.