
BJP Mumbai President: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये भाजपच्या मुंबई अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. अमित साटम यांच्याकडे भाजप मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांआधी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची घोषणा केली आहे. भाजपकडून मुंबई अध्यक्षपदी आक्रमक चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. अमित साटम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक पार पडली. यावेळी ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
Vasai News: महिला आमदारांची सिंघम स्टाईल! मध्यरात्री अवैध बारवर धाड; अधिकाऱ्यांची खरडपट्टी
कोण आहेत अमित साटम?
अमित साटम हे भाजपमध्ये २००० च्या दशकापासून सक्रिय आहेत. ते मुंबई महानगरपालिकेचे (BMC) नगरसेवक (कॉर्पोरेटर) राहिले आहेत. ते मुंबईतील भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक समित्यांमध्ये कार्यरत होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकी अंधेरी लढले होते, अंधेरी पश्चिम येथून ते आमदार आहेत. आमदार म्हणून ते विले पर्वत मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती, जलपुरवठा, आणि प्रदूषण नियंत्रण यांसारख्या मुद्द्यांवर काम करतात. ते मुंबईतील ट्रॅफिक आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणांसाठी ओळखले जातात.
भाजपच्या माध्यमातून ते स्थानिक स्तरावर आरोग्य, शिक्षण, आणि युवा विकासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात. कोविड-१९ काळात ते मुंबईतील मदत कार्यात सक्रिय होते. अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. विधानसभेतही मुंबईचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडताना दिसतात. मुंबईतून आमदारकीची त्यांची तिसरी टर्म आहे. याशिवाय सुरुवातीपासून भाजपमध्ये असून दुसऱ्या पक्षातून आलेली नाहीत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड भाजपसाठी फायद्याची ठरु शकते.
Mumbai Metro: गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ; भक्तांसाठी मेट्रोच्या अधिक फेऱ्या
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world