Breaking News! मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

सदनिका घोटाळा प्रकरणात  नाशिकच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले

जाहिरात
Read Time: 2 mins

Manikrao Kokate Arrest Warrent: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह  यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना दणका

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  १९९५ सालच्या सदनिका घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे. 30 वर्ष जुन्या प्रकरणात नाशिकच्या प्रथम दंडाधिकारी न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! महिला आमदार भाजपच्या वाटेवर, उद्या राजीनामा देणार?

या घोटाळा प्रकरणात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत  दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे आज माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघणार असल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. अशातच न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. 

अटक वॉरंट जारी

माणिकराव कोकाटे सध्या शासकीय रुग्णालयात ऍडमिट असल्याची कोकाटे यांचे वकील मनोज पिंगळे यांनी नाशिक न्यायालयात माहिती दिली. तसेच 4 दिवस अटकेपासून दिलासा मिळावा अशी वकिलांकडून विनंतीही करण्यात आली होती. मात्र काल तुम्ही सत्र न्यायालयात हजर रहाणे गरजेचे होते, कोकाटे रुग्णालयात असल्याचे कोणतेही मेडिकल सर्टिफिकेट दिले नाही, असं सांगत कोर्टाने थेट अटक वॉरंट जारी केले आहे. आता कोकाटे यांची आमदारकी तसेच मंत्रिपदही जाण्याची शक्यता आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Crime News: अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर)