मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पाच दिवसांपासून उपोषणास बसले होते. पाचव्या दिवशी त्यांनी सरकारचा नवा प्रस्ताव मान्य करत उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने महत्त्वाच्या मागन्या मान्य केल्यानंतर जरांगे यांच्यासह मराठा बांधवांनी विजयोत्सव साजरा केला. मात्र हा जीआर म्हणजे पुन्हा एकदा तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
Live Update : लक्ष्मण हाकेंनी फाडला राज्य सरकारचा GR
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं काढलेल्या GR विरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. या जीआरच्या विरोधात पुण्यातील महात्मा फुले वाड्यात ओबीसी नेत्यांचं मौन आंदोलन सुरु झालं आहे. या आंदोलनाच्या वेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारचा GR फाडला.
सरकारच्या GR नंतर छगन भुजबळांची नाराजी, राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक
ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार
भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची दुपारी २ वाजता देवगिरी या सरकारी निवासस्थानी बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल बैठकीला उपस्थित राहणार
महायुतीत मंत्री भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संभाव्य अडचणी लक्षात घेत बैठक होतं असल्याची सूत्रांची माहिती
मंत्री भुजबळ यांनी पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीत ओबीसी आरक्षण प्रश्नी होतं असलेल्या अन्यायाबाबत उघड भूमिका घेतल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या पार पडणाऱ्या बैठकीला विशेष महत्व
Pune News : राज्य सरकारने काल काढलेल्या जीआरनंतर ओबीसी नेते आक्रमक
राज्य सरकारने काल काढलेल्या जीआरनंतर ओबीसी नेते आक्रमक
राज्य सरकारच्या निषेधार्थ ओबीसी नेते पुण्यातील महात्मा फुले वाड्यात निषेध आंदोलन करणार
लक्ष्मण हाके, मंगेश ससाने मृणाल ढोले पाटील आणि इतर ओबीसी नेते तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन करणार
थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार
आजच GR काढला जाणार
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
मराठा आरक्षणाचा GR काढण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा -विखे पाटील
मराठा आरक्षणाचा GR काढण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा -विखे पाटील
Manoj Jarange: मनोज जरांगे यांनी पुन्हा अभ्यासकांची बैठक बोलावली
मनोज जरांगे यांनी पुन्हा अभ्यासकांची बैठक बोलावली
उद्या गॅलक्सी रुग्णालयात जरांगे अभ्यासकांची बैठक घेणार
हैदराबाद गॅजेट जीआरवर अभ्यासकांशी जरांगे चर्चा करणार
अनेक अभ्यासकांनी जीआरवर हरकती घेतल्या आहेत
होणारा विरोध पाहता जरांगे घेणार बैठक
नंदुरबारमध्ये एसटी बसला अपघात, अनेक विद्यार्थी जखमी
नंदुरबारच्या तळोदा तालुक्याच्या वाल्हेरी येथून येणाऱ्या बसला अपघात झाला आहे. सकाळच्या सत्रातील शाळेत येणारे विद्यार्थी मोठे संख्येने या बसमध्ये होते. ७५ च्या जवळपास विद्यार्थी होते यातील चार विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना तळोदा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. तर किरकोळ जखमी असलेल्या विद्यार्थ्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने बस अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
बीडमध्ये 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आज परळी बंदची हाक
sg
तारापूर MIDC मध्ये भंगार माफीयांचा उच्छाद
तारापूर MIDC मध्ये भंगार माफीयांचा उच्छाद
बँकेने जप्त केलेल्या कंपन्यांवर भंगार माफी यांचा डल्ला
भंगार चोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी पकडले
भंगार चोराला पकडतानाचा थरार NDTV मराठीच्या कॅमेऱ्यात कैद
Thane News Live : कासारवडवलीत दोन मृतदेह सापडल्याने खळबळा
ठाण्यात कासारवडवली परिसरातील एका शेतजमिनीत उघड्या खड्ड्यात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली
35 वर्षीय महिलेचा आणि तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला
अडीच फूट खोल शेत जमिनीचा हा खड्डा आहे...
स्थानिकांना या खड्ड्यात दोन मृतदेह तरंगताना दिसल्याने स्थानिकांनी याबाबत माहिती कासारवडवली पोलिसांना दिली
GR मध्ये जे सांगण्यात आले आहे, त्यावरून आमचे समाधान: बबनराव तायवाडे
डॉ बबनराव तायवाडे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
जो शासन निर्णय काढण्यात आला आहे, त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास केला, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली
काढलेल्या GR मध्ये जे सांगण्यात आले आहे, त्यावरून आमचे समाधान आहे, समाजाचे नुकसान झालेले नाही. आतापर्यंत प्रचलित असलेल्या पद्धतीनुसारच जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद या GR मध्ये आहे..
आम्ही आज कायदेतज्ज्ञांशी चर्चा करू, त्यानंतर आम्ही आमच्या आंदोलन आणि साखळी उपोषण बद्दल अंतिम निर्णय घेऊ..
Manoj Jarange Maratha Morcha : मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याच सत्र सुरूच
मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याच सत्र सुरूच
गैरकायद्याची मंडळी जमवल्या प्रकरणी तसेच दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
मराठा आंदोलकांविरोधात आत्तापर्यंत अनेक गुन्हे दाखल
बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मंगळवारी सोडलं
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच हजारोंच्या संख्येने मुंबईत आलेले मराठा बांधव माघारी फिरले