जाहिरात

मद्यविक्रीत नेत्यांचेच प्याले काठोकाठ! 30 टक्के परवान्यांचा भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाभ

४१ पैकी १६ मद्य कारखाने बंद आहेत तर काहींनी परवान्यांच्या लाभासाठी नावाला चालु ठेवले आहेत. या सर्वांच्या वाट्यास मद्यविक्री परवाने येणार आहेत.

मद्यविक्रीत नेत्यांचेच प्याले काठोकाठ! 30 टक्के परवान्यांचा भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाभ

Maharashtra Liquor License: गेल्या 50 वर्षांपासून राज्यातील वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने 328 नवे मद्यविक्री परवाने देण्याची महत्त्वाची घोषणाही राज्य सरकारने केली होती. आता याबाबतच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महसुलात वाढ करण्याच्या योजनेचा भाग म्हणून ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे ३२८ परवान्यांचे वाटप होणार आहे. मात्र हे नवे मद्य परवान्यांचा लाभ भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटानेच घेतल्याचं आता समोर आले आहे. 

राज्य सरकारकडून नव्याने देण्यात येणाऱ्या  ३२८ परवान्यांपैकी ९६ परवाने राजकीय नेत्यांना मिळणार आहेत. यापैकी भारतीय जनता पक्षाचे ४०, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित ३२ आणि शरद पवार गटाशी संबंधित २४ नेत्यांना याचा लाभ होणार आहे. ४१ पैकी १६ मद्य कारखाने बंद आहेत तर काहींनी परवान्यांच्या लाभासाठी नावाला चालु ठेवले आहेत. या सर्वांच्या वाट्यास मद्यविक्री परवाने येणार आहेत.

Pune Ganeshotsav: : पुण्यात 10 दिवस दारू मिळणार नाही, लाऊडस्पीकर वापराला मात्र सवलत

१. भाजप : माजी मंत्री दिवंगत डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांची ‘डेल्टा डिस्टिलरीज'. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन चारुदत्त पालवे यांची ‘रॅडीको एन.व्ही. डिस्टिलरीज'. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेली ‘मानस ॲग्रो इंडस्ट्रीज'. ‘कराड दक्षिण'चे भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यच्च्याशी संबंधित ‘यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना'. ‘दक्षिण सोलापूर'चे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे महेश देशमुख संचालक असलेली ‘लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज' या कंपन्या प्रत्येकी ८ वाईन शाॅपच्या लाभधारक होणार आहेत.

२. राष्ट्रवादी (अजित पवार गट) : माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली ‘विट्ठल कार्पोरेशन'. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे व्यावसायीक भागीदार संचालक असलेली ‘नक्षत्र डिस्टिलरीज अँड ब्रुवरीज'. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या ‘ॲडलर्स बायो एनर्जी' आणि ‘असोसीएटेड ब्लेंडर्स'या कंपन्याना परवाने मिळतील.

३. राष्ट्रवादी (शरद पवार गट) : ‘इस्लामपूर'चे आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील अध्यक्ष असलेला ‘राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना'. ‘शिराळा'चे माजी आमदार मानसिंग नाईक यांचा मुलगा, मुलगी व पत्नी संचालक असलेली ‘विराज अल्कोहोल्स'. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचे पती सत्यजीत होळकर संचालक असलेली ‘ग्रेनॉच इंडस्ट्रीज' या कंपन्यांना फायदा होईल.

Nagpur Crime: दारुमुळे वडिलांचा मृत्यू! बदला घेण्यासाठी मुलाचा भलताच प्लॅन, बारमध्ये शिरायचा अन्....

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com