जाहिरात
19 hours ago

Maharashtra LIVE Updates: अहिल्या नगरच्या जामखेड येथील चौंडी या ठिकाणी आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच मंत्री छगन भुजबळ पंकजा मुंडे अतुल सावे जयकुमार गोरे राजकीय नेते मंडळ उपस्थित राहणार आहेत. सकाळपासूनच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांच्या दर्शनासाठी भाविकांची स्मारकाजवळ गर्दी झालेली पाहायला मिळते

Live update : पुण्यातील चाकणच्या तलावात बुडून 4 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Live update : पुण्यातील चाकणच्या तलावात बुडून 4 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुण्यातल्या चाकणमधील पाझर तलावात बुडून चार शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर गेलेले मुलं घरी परतली नाहीत. त्यानंतर घरच्यांशी शोधाशोध सुरु केली. 

 पाझर तलावा जवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्यानंतर तलावात त्यांचा शोध घेण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चाकण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

Live Update : पुण्यात वेगवान कारने 12 जणांना उडवले

पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका वेगवान कारने 12 जणांना उडवले आहे. हे सर्व जण MPSC चे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवतहानी झालेली नाही. पण, 2-3 जणांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.

या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो मद्यप्राशन करुन कार चालवत होता. भावे हायस्कूल जवळ काही विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहा पीत असताना हा अपघात घडला.  जयराम शिवाजी असं या कॅबचालकाचं नाव आहे. हुंडाई टुरिस्टच्या कारनं हा अपघात झाला आहे. 

Live Update : निलेश चव्हाणच्या घरी काय सापडले?

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या घरी तब्बल दीड तास तपास करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हा तपास केला. त्यानंतर पोलीस निलेश चव्हाणला घेऊन परतले. या तपासामध्ये  लता हगवणे आणि करिष्मा हगवणेचा मोबाईल बावधन पोलिसांनी केला जप्त केला आहे. 

मोबाईलसह इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट देखील बावधन पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाण चे कॉल रेकॉर्ड देखील पोलीस तपासणार आहेत. पुण्यातील कर्वेनगर भागातील निलेशच्या घरी पोलिसांनी हा तपास केला. 

Live Update : निलेश चव्हाणच्या घरी पोलीस दाखल

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पोलीस दाखल झाले आहे. निलेशला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आरोपी निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरी दाखल झाले आहेत.  

निलेश चव्हाणकडे असलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या घरी गेले आहेत.  वैष्णवी हगवणेची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे आहेत. ते जप्त करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले आहेत. 

Live Update : शाळेची भिंत कोसळल्याचे प्रकरण, संचालकाला अटक

ठाणे जिल्ह्यातल्या टिटवाळामध्ये के.बी.के. इंटरनॅशनल स्कूलची भिंत शुक्रवारी कोसळली होती. या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शाळेचे संचालक सुबाराव खराडेला अटक करण्यात आली आहे. त्यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Live Update : वसुलीचा जाच! बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यानं संपवलं आयुष्य

 बीडच्या पाटोदा येथील व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  यावेळी त्यांच्या गाडीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली आहे. यामध्ये दोघा जणांनी व्याजाने दिलेले पैसे परत दे म्हणून उचलून नेऊन चटके देण्याची धमकी दिली होती.. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.. आता या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले आणि दीपक साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही फरार आहेत.. या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली असून हे आरोपी अटक न झाल्यास कुटुंबीयांच्या देखील जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे..

LIVE Update: संतोष लड्डा यांचा जिगरी दोस्तच निघाला दरोड्याचा सूत्रधार

छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट 

उद्योजक संतोष लड्डा यांचा जिगरी दोस्तच निघाला दरोड्याचा कर्ताधरता 

बालासाहेब इंगोले नावाच्या लड्डाच्या मित्राने दिली घरातील सर्व माहिती 

सोनं आणि घरातील मुद्देमालची माहिती इंगोलेने दिली

LIVE Updates: मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

अपघातात कार मधील तिघांचा मृत्यू तर, दोन गंभीर जखमी

दोन ट्रक च्या मध्ये कार सपासून अपघात

मुंबई वाहिनीवर  मनोर जवळील वाडा खडकोना गावाच्या हद्दीत अपघात

अपघातात 10 वर्षाचा मुलगा  आणि एक पुरुष बचावला

जखमीना उपचारासाठी मनोर येथील रुग्णालयात केलं दाखल

LIVE Updates: शिवसृष्टीच्या बोर्डवर लघु शंका केल्याचा धक्कादायक प्रकार, मराठा समाज आक्रमक

पुण्यात एका वयस्कर इसमाकडून शिवसृष्टीच्या बोर्डवर लघु शंका केल्याचा धक्कादायक प्रकार 

पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या बोर्डवर केली लघुशंका 

अमोल कुलकर्णी असं वयोवृद्ध इसमाचे नाव 

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

सदर इसमाला भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक 

 मराठा समाज आक्रमक, आरोपीला मराठा समाजाने फासलं काळ 

आरोपी मतिमंद असल्याची प्राथमिक माहिती

LIVE Updates: पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वि जयंती जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांच्या उपस्थितीत जेजुरी गडावरील अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आलीय.

LIVE Updates: वैष्णवी हगवणे प्रकरण: निलेश चव्हाणला शिवाजीनगर कोर्टात आणले

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निलेश चव्हाणला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. 

LIVE Updates: वसमतच्या टोकाई फाट्याजवळ भीषण अपघात, 2 ठार

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टोकाई फाट्याजवळ भरधाव कार समोर उभे असलेल्या टिप्पर च्या खाली घुसल्याने भीषण अपघात झाला आहे.. या अपघातात दोन जण जागी ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील एकाच कुटुंबातील आठ जण एका कार्यक्रमासाठी जात असताना कारचालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने टोकाई फाट्याजवळ उभा असलेल्या टिप्परला कार धडकल्याने हा भीषण अपघात झाला असून अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे..

LIVE Updates: हगवणे बंधुंचा बंदूक परवाना रद्द

हगवणे दोघा भावांचा बंदूक परवाना रद्द

पुणे पोलिसांची कारवाई

निलेश चव्हाणचाही रद्द होण्याची शक्यता

जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ

LIVE Updates: लालबाग परळ करीरोड परिसरात मध्यरात्री पासुन वीज पुरवठा खंडित

दक्षिण मुंबईतील लालबाग परळ करीरोड परिसरात मध्यरात्री पासुन वीज पुरवठा खंडित

अनेक ठिकाणी फेज डाऊनमुळे लालबाग परिसरात बेस्ट विद्युत पुरवठा खंडित

पाऊस नसतानाही तब्बल ३ तासांपासून बेस्ट विद्युत पुरवठा खंडित

बेस्टचे ग्राहक सेवा क्रमांक बंद असल्याने नागरिकांचे हाल

गेल्या तीन दिवसांपासून अनेकदा वीज पुरवठा खंडित

LIVE Updates: विनासेस तूर आयातप्रकरणी मुंबई एपीएमसीची मोठी कारवाई

एपीएमसीची कोणतीही पूर्व परवानगी व बाजार समितीचा सेस न भरता 5000 टन तूरीचे 200 कंटेनर नावाशेवाला आणल्याप्रकरणी संबंधित आयातदारावर 1 कोटी 11 लाख 48 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही तूर दुबईहून आयात करण्यात आली होती. 29 मे रोजी रात्री दक्षता पथकाने उरण जवळील वहाळ फाट्यावर वाहन तपासणीदरम्यान ही आयात उघडकीस आणली. ही कारवाई कृषी उत्पन्न पणन अधिनियमाच्या कलम 32 अंतर्गत करण्यात आली असून, बाजार फी, देखरेख खर्च आणि इतर शुल्कांचीही वसुली होणार आहे. बाजार समिती प्रशासनाने अनधिकृत आयात-व्यवहार करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

LIVE Updates: वर्ध्यात भीषण अपघात, 2 जणांचा मृृत्यू

वर्ध्यात दोन दुचाकी आपसांत भिडून भीषण अपघात

अपघातात दोघांचा मृत्यु

तळेगांव ते आर्वी महामार्गावरील घटना

अपघात एवढा भीषण होता की दुचाकींचे पुढचे चाकच झाले वेगळे

रस्ता क्रॉस करत असतांना घडला भीषण अपघाताचा थरार

LIVE Updates: पावसाची विश्रांती

गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला अखेर पावसापासून उघडीप मिळाली आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी, बहुतांश ठिकाणी आज पाऊस थांबल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून  पावसाने हजेरी लावली होती.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com