Maharashtra Live Blog: पुलवामामधील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून शक्य असलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ (LoC) तसेच अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव सुरू केला आहे. या सरावाच्या दरम्यान पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबाद दरम्यानचे काही हवाई मार्गही तात्पुरते बंद केले आहेत.
दुसरीकडे भारताने रात्रीच्या अंधारात गंगा एक्सप्रेसवेवरील हवाई पट्टीवर लढाऊ विमानांची लँडिंग करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानमधील कलाकार तसेच नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट्सही केंद्र सरकारने बंद केली आहेत.
Live Update : पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर भारत आक्रमक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना, पाकिस्तानने शनिवारी घेतलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी हे “उघड उघड चिथावणी देणारे कृत्य” असल्याचे भारताने म्हंटले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पाकिस्तानी लष्कराने 450 किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या ‘अब्दाली’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यावर भारतानं ही प्रतिक्रिया दिली आहे.
Live Update : पहलगाम हल्ल्याचे कोलंबो कनेक्शन, विमानतळावर तपासणी सुरु
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याबाबत श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या विमानतळावर तपासणी सुरु आहे. श्रीलंका एअरलाईन्समध्ये एक संदिग्ध व्यक्ती असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळालीय. भारतीय अधिकाऱ्यांनी याबाबत सूचना दिली होती. त्यानंतर ही तपास मोहीम सुरु आहे.
Live Update : ओमर अब्दुल्ला घेणार, PM मोदींची भेट
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा होऊ शकते.
Live Update : भारताचा पाकिस्तानला आणखी एक झटका
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला आणखी एक हादरा दिला आहे. पाकिस्तानच्या जहाजांना भारतामध्ये आता प्रवेश मिळणार नाही. पाकिस्तानी जहाजांना समुद्र मार्गे भारतात प्रवेश करता येणार नाही. भारतीय हद्दीत पाकिस्तानी झेंडे लावलेल्या जहाजांना घुसता येणार नाही. त्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
LIVE Updates: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या जालना शहरात गाठी भेटी
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जालना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेतल्या.. शहरातील आयसीटी काॅलेजमध्ये हरिभाऊ बागडे यांचं स्वागत करण्यात आलं.. यावेळी बागडे यांनी मार्गदर्शन केलं असून राजस्थान ही शूर विरांची भूमी तर आहेच. मात्र गोपालनाचीही भूमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात असं कोणतच शहर नाही की त्याठिकाणी राजस्थानी माणूस दिसत नाही.. बिकानेरची मिठाई प्रत्येक शहरात दिसते.. असे वेगवेगळे किस्से सांगत बागडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय...
LIVE Updates: खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 बांगलादेशींना अटक
खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बांगलादेशींना अटक
एक महिला आणि पुरुषाचा समावेश
कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई
खडकपाडा पोलिसांनी सुरु केला पुढील तपास
LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी.
सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचा फटका.
मुंबईकडे जाणाऱ्या आणि कोकणात येणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
माणगाव बाजारपेठेपासून दोन्ही बाजूला सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा.
दररोजच्या वाहतूक कोंडीला वैतागले चाकरमानी आणि पर्यटक.
वाढत्या उन्हात कोंडीने सारेच हैराण.
LIVE Updates: बिबट्याचा दोघांवर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु
पालघरच्या तलासरी तालुक्यातील धामणगाव आणि करजगाव येथे बिबट्याचा दोन जणांवर हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात एक पुरुष आणि एक महिला जखमी
जखमींवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल
धामणगाव मधील एका वाडीत लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू
स्थानिक नागरिक देखील लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी उपस्थित
LIVE Updates: जनगणना झाल्यानंतर आरक्षणावर तोडगा निघेल - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
देशात जातीय जनगणना झाल्यानंतर आरक्षणाचा विषय दूर होऊन यावर तोडगा निघेल असा विश्वास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यांनी व्यक्त केला आहे..प्रत्येक जात संशयाने एकमेकांकडे बघत आहे.जातीय जनगणना झाल्या नंतर आरक्षणाचा विषय मिटेल अस लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूरच्या औसा येथील शंभर कोटी रुपयांच्या उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
Latur News: नीट परीक्षेच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांची आत्महत्या
लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिकेत अंकुश कानगुडे अस आत्महत्या केलेय विद्यार्थ्याचं नाव आहे.
तो मागच्या दोन वर्षापासून लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस येथे तयारी करत होता.
दरम्यान मागच्या वेळी अनिकेत कानगुडे या विद्यार्थ्याला 520 च्या जवळपास मार्क मिळाले मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही.. पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करत होता मात्र परीक्षेच्या एक दिवस आधीच, या विद्यार्थ्याने लातूरमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे..
Pune Accident: नवले ब्रीजवर मर्सिडीजने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू, 1 जखमी
पुण्यातील नवले ब्रीजवर पुन्हा अपघात
नवले ब्रिजवर मर्सिडीज कारने दुचाकीस्वराला उडवले
अपघातात एका जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
दोन कारचालकांना पुणे पोलिसांनी केली अटक
आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल
आज पहाटे चार वाजता घडली अपघाताची घटना
आरोपी ममद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा स्थानिकांचा दावा
LIVE Updates: भारताचा पाकला मोठा दणका! पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद केला आहे. ज्यामुळे पाकिस्तानमधून भारतात काहीही आयात होणार आहे. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानची चांगलीच कोंडी होणार आहे.
Nagpur Crime: नागपुरात बांधकाम मजुराची निर्घृण हत्या
- नागपुरातील भांडेवाडी परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे उघड झाले... सतीश मेश्राम (31 वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे..
- तो बांधकाम मजूर म्हणून काम करत होता... दोन दिवसांपूर्वी कामावर गेला मात्र घरी परतला नाही. सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शोधा शोध करून मिळून न आल्याने पारडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली..
- शुक्रवारी रात्री भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना मृतदेह आढळून आला.. तेव्हा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली... तो मृतदेह सतीशचा असल्याचं निशपन्न झाले..
Kolhapur News: विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.. सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने दिली. करवीर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पती, सासू सासऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाहीन दस्तगीर मुल्ला असे मृत महिलेचे नाव आहे. शाहीन हिच्या मृतदेहाचे कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी मृतदेह रुकडी येथे दफन केला. तिला दोन वर्षांची एक मुलगी आहे. या घटनेचा करवीर पोलिस अधिक तपास करत आहेत.
LIVE Updates:कांजुरमार्ग डंपिंग ग्राउंड पुन्हा संरक्षित वन घोषित, हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
कांजुरमार्ग डंपिंग ग्राउंड पुन्हा संरक्षित वन घोषित
कांजुरमार्ग येथील119.91 हेक्टर डंपिंग ग्राउंड ला मुंबई उच्च न्यायालयाने केले संरक्षित वन म्हणून घोषित
महाराष्ट्र सरकारने 2009 साली संरक्षित वन क्षेत्रातून कांजुरमार्ग डंपिंग ग्राउंड वगळले होते
कायद्याच्या विरूद्ध 2009 सालची अधिसूचना आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अधिसूचना केली रद्द
पर्यायी जागा मिळेपर्यंत पुढील 3 महीने या जागेच्या वापरासाठी मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाची मुदत
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Pehelgam Terror Attack: पाकिस्तानकडून कुरापती सुरुच, सलग नवव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाहीयेत… नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलंय. उरी, कुपवाडा आणि अखनूर भागात पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार सुरू असून, भारतीय जवानांनीही ठाम प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून सलग नवव्या दिवशी ही अशांतता सुरूच आहे…
mumbai Ahmedabad Highway: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 'द बर्निंग ट्रक' चा थरार
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 'द बर्निंग ट्रक' चा थरार
मनोर जवळील जव्हार फाटा भागात ट्रकने घेतला पेट
स्थानिक वाहन चालक गौरव पाटील याने दाखवले प्रसंगावधान
पेटता ट्रक चालवून रस्त्याच्या कडेला नेऊन वाहतूक केली सुरळीत
इतर वाहन चालक आणि स्थानिकांच्या मदतीने पाणी ओतून आग आणली आटोक्यात
Nashik News: नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांचा तडकाफडकी राजीनामा
- नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांचा तडकाफडकी राजीनामा
- प्रतापसिंह चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय
- 2100 कोटींच्या थकीत कर्जामुळे बँक सापडलीय अडचणीत
- बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या कर्जवसुलीला देण्यात आलेली स्थगिती आणि तोटा आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासकांनी राजीनामा दिल्याची चर्चा
LIVE Updates: नाशिकच्या मखमलाबाद परिसरात गावगुंडांचा हैदोस
- नाशिकच्या मखमलाबाद परिसरात गावगुंडांचा हैदोस
- पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला
- घटनेत कृष्णा धात्रक नामक तरुण गंभीर जखमी, उपचार सुरु
- पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या युवकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला
- संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू
LIVE Updates: वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघात "आमदार आपल्या दारी" उपक्रमाला सुरुवात
वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघात "आमदार आपल्या दारी" उपक्रमाला सुरुवात
मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमांतर्गत आणी महसूल विभागाच्या लोकाभिमुख धोरणाच्या अनुषंगाने उपक्रम
आमदार सुमीत वानखडे यांनी एकाच छताखाली महसूल विभागाच्या मदतीने नागरिकांना दिले अनेक प्रमानपत्रे
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शीबिराच्या माध्यमातून नागरिकांना मिळाला दिलासा
LIVE Updates: इंद्रायणी पुन्हा फेसाळली
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी सातत्याने प्रदूषणाच्या विळख्यात असून परिसरातील कंपन्यांमधून सातत्याने केमिकल युक्त पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे. नदी प्रदूषणाबाबत राज्य सरकारकडून केवळ आश्वासन मिळत असून कोणताही ठोस उपाय केला जात नसल्याने स्थानिक आणि भाविक नाराज आहेत. इंद्रायणी माता प्रदूषण मुक्त करण्याची विनंती ते करू लागलेत.
LIVE Updates: आतंकवाद्यांचे चितळे उडवले पाहिजे: बच्चू कडू
जम्मू काश्मीर पहलगम येथील आतंकवादी हल्यावर बोलताना माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काँग्रेस किंवा भाजप, पक्ष कोणताही असो प्रत्येक ठिकाणी जातिवाद पसरल्या जात आहे... दोन आतंकवाद्यांनी 28 भारतीयांची हत्या केली... या आतंकवाद्यांचे चितळे उडवले पाहिजे.. ही जबाबदारी चौकीदाराने स्वीकारली नाही... तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकून वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे... कोणताही राजकीय पक्ष शेतकरी, शिक्षणावर बोलत नाही... असे शुक्रवारी अकोल्याच्या प्रमिलाताई ओक हॉल येथे एका कार्यक्रमाप्रसंगी माजी राज्यमंत्री बच्चू कडू बोलत होते.