
Maharashtra Rain Update : मुंबईसह उपनगरात आज (14 ऑगस्ट 2025) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली असून गोरेगाव, अंधेरी, वांद्रे परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. हवामान विभागाकडून (IMD Alert) पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असून पुढील तीन तास मुंबईसाठी महत्त्वाचे असतील अशी माहिती आहे. 15 ते 17 ऑगस्ट सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यात या तिन्ही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पावसाचं सावट असेल असा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शुक्रवारपासून राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. उद्या १५ ऑगस्ट, शुक्रवारपासून राज्यभरात पाऊस सक्रिय होणार असल्याची चिन्हं आहेत.
3 जिल्हे वगळता, राज्यभरात पावसाचा यल्लो अलर्ट
राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. सांगली, धुळे, नंदूरबार वगळता सर्व राज्याला पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाण्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून गोरेगाव, अंधेरी, वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस आहे.
नक्की वाचा - Pune Junglee Maharaj Road: पुण्यातल्या या रस्त्यावर खड्डा का पडत नाही ? 55 वर्षानंतरही आहे एकदम गुळगुळीत
कोयना धरणाचे सहा दरवाजे सहा इंचाने उघडले, 15 ऑगस्टच्या पाश्वभूमीर लेझर शोचे प्रात्यक्षिक
सातारा - पावसाचा जोर ओसरल्यानंतर काल रात्री कोयना धरणाचे सहा दरवाजे खास लेझर शोसाठी सहा इंचाने उघडण्यात आले. आणि रात्री सोडलेल्या पाण्यावर भारताचा नकाशा, छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील अनेक पैलू लेझर शो द्वारे दाखवण्यात आले. 15 आॕगस्टच्या पाश्वभूमीवर या शोचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आज अंधार पडल्यानंतर रात्री हे लेझर शो स्थानिक आणि पर्यटकांना पाहण्यासाठी सुरू ठेवले जाणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world