Maharashtra Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुढील 4 दिवस मुसळधार; 'या' जिल्ह्याला रेड अलर्ट

उद्या पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात तुफान पावसाची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Rain Alert : पुढील चार दिवस राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज (17 ऑगस्ट) पहाटेपासूनच मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. काल (16 ऑगस्ट) मुंबई आणि उपनगरात दहीहंडीचा उत्साह होता. यादरम्यान पावसाची रिपरिप सुरू होती. 

पुढील 4 दिवस पालघर, ठाणे , मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबईत दादर, लोअर परेल, वांद्रे, सायन परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. आजही मुंबईसह उपनगरात नागरिकांना जोरदार पावसाचा सामना करावा लागणार आहे. 19,20 आणि 21  ऑगस्ट रोजीही कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांनाही हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

नक्की वाचा - LIVE Blog: मुंबईत पावसाची संततधार सुरुच! सखल भागात साचलं पाणी


अनेक ठिकाणी रेड तर ऑरेंज अलर्ट....

आज 17 ऑगस्टदरम्यान पालघर, ठाणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर सिंधुदुर्ग, जळगाव यांना ऑरेंज अलर्ट तर पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस जवळपास अशीच परिस्थिती राहणार असल्याचं आयएमडीकडून दिलेल्या अलर्टमधून स्पष्ट होत आहे. उद्या पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

जळगावातील धरणगावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला मोठा पूर...

जळगावच्या धरणगाव शहरातील धरणी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला नदीसदृश स्वरूप प्राप्त झाले असून कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने दुकाने व घरांमध्ये शिरले. परिणामी धरणी परिसर आणि जैन गल्ली पूर्णपणे जलमय झाला आहे. अनेकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कालच्या तुलनेत आज पुराची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल आलेल्या पुरानंतर देखील पालिका प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Advertisement