जाहिरात

सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट

पर्यटनस्थळी धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इ. ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट
पुणे:

भारतीय हवामान विभागाने सातारा व पुणे या जिल्ह्यांना 9 जुलै रोजी म्हणजेच मंगळवारी  रेड अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर सातारा व पुणे जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईलवर सचेत ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. नदीकाठी/ दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पर्यटनस्थळी धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इ. ठिकाणी जाण्याचे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच अतिवृष्टी दरम्यान जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी 1077 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com