
Punjabrao Dakh's and IMD rain prediction: गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपून काढलं आहे. त्याशिवाय मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस कायम आहे. ऑक्टोबर महिना जवळ आला. त्यामुळे पाऊस कधी परतणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीने अंदाज व्यक्त केला आहे. जाणून घेऊया कोणाचा काय आहे अंदाज...
IMD चा हवामान अंदाज
28 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नंदूरबार, जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आणि इतर सर्व जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर 29 सप्टेंबरला पुणे, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, मुंबई उपनगरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावासाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर 30 सप्टेंबर या दिवशी कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट तर इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. तर 1 ऑक्टोबरला मुंबई-पुण्यात पाऊस नसेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरला विदर्भाला आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सूचना
27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही नद्या नाल्यांना पूरदेखील येण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे. या कालावधीत मुंबई आणि पुण्यात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रभरात जोरदार पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसार तयारी करावी असा सल्ला पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. यावेळी ते असंही म्हणाले, 1-2-3 ऑक्टोबरला पाऊस थोडी विश्रांती घेईल. 4 ते 7 ऑक्टोबरदरम्यान पुन्हा पाऊस होणार आहे. तरी ही पूर्वकल्पना म्हणून अंदाज लक्षात घ्यावा अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world