13 minutes ago

मुंबईसह, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

May 21, 2025 20:40 (IST)

नवल किशोर राम पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त

नवल किशोर राम पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.  नवल किशोर राम हे 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत.

राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले. बीड व तेव्हाचे औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. 2020 मध्ये नवल किशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. कोरोना संकाटाच्या काळात त्यांनी स्वतः गावोगावी जाऊन भेटी दिल्या होत्या.  देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी  म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

पुण्यातून त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

May 21, 2025 20:36 (IST)

मुंबईत गेल्या 24 तासात पाच कोरोना रुग्ण वाढले

मुंबईत गेल्या 24 तासात पाच कोरोना रुग्ण वाढले 

मुंबईमध्ये एकूण ऍक्टिव्ह कोविड रुग्णांची संख्या 25 इतकी झाली 

सर्व पॉझिटिव्ह कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

May 21, 2025 19:37 (IST)

भारताचा पाकिस्तानला आणखी एक झटका

भारताने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला आहे.  भारतात पाकिस्तान हायकमिशनमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला 24 तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  पाकिस्तानी अधिकाऱ्याची संशयास्पद हालचाली आढळल्याने भारताने ही मोठी कारवाई केली आहे.  मागील दोन आठवड्यात ही दुसरी घटना आहे.  ज्यात भारताने पाकिस्तानी अधिका-याला हाकलून दिले आहे. यापूर्वी 13 मे रोजी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारतातून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.

May 21, 2025 19:15 (IST)

सरसंघचालक मोहन भागवत यांचा तीन दिवसांचा नाशिक दौरा आटोपला

सरसंघचालक मोहन भागवत हे तीन दिवसांचा नाशिक दौरा आटोपून नाशिकहुन पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आयोजित शिक्षा वर्गाला त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्ग प्रथम (सामान्य) 18 ते 40 वर्ष या वयोगटातील तरुण स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग हा 11 मे पासून सुरू झाला आहे. या वर्गात सहसरकार्यवाह कृष्ण गोपालजी आणि कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी देखील मार्गदर्शन केले.

Advertisement
May 21, 2025 19:14 (IST)

आरोग्यमंत्र्यांनी घेतला राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णसेवा प्रकल्पांचा आढावा

कामगारांचे आरोग्य आणि कल्याण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून रुग्णसेवा योजनांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजच्या बैठकीत दिली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.  या बैठकीस आमदार मनीषा कायंदे, मुख्य अभियंता लेफ्टनंट कर्नल शिवशंकर मंडल, रिजनल डायरेक्टर अभिलाषा झा, राज्य कामगार विमा योजना प्रशासनाचे संचालक तसेच केंद्र व राज्य शासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

May 21, 2025 19:12 (IST)

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव केल्याचं पत्रक जारी

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव केल्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे.  रेल्वे मंत्रालयाने नावात बदल केल्याचं जाहीर केलं आहे.  उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव केलं होतं. मात्र रेल्वे स्थानकाचं नाव बदललं नव्हतं ते आता बदलण्यात आलं आहे. 

Advertisement
May 21, 2025 19:12 (IST)

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव केल्याचं पत्रक जारी

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव केल्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे.  रेल्वे मंत्रालयाने नावात बदल केल्याचं जाहीर केलं आहे.  उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव केलं होतं. मात्र रेल्वे स्थानकाचं नाव बदललं नव्हतं ते आता बदलण्यात आलं आहे. 

May 21, 2025 16:36 (IST)

शेतकऱ्यांना योग्य वेळात पत पुरवठा करा - देवेंद्र फडणवीस

शेतकरी योग्य वेळेत पतपुरवठा करा असा आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहे. शिवाय सिबिल चार्ट मागणी केली जाणार नाही अशी सूचना ही त्यांनी केल्या आहेत. जर सिबिलची मागणी केली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असं ही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.  शेतकरी वर्गाला विनंती आहे की केंद्र शासन अॅप यावर अधारित नोंदणी खत बियाणे खरेदी करा. बोगस बियाणे, खत यामुळे शेतकरी फसवणूक होणार नाही असं ही ते म्हणाले. खरीप हंगाम नियोजन बैठक झाली. त्यानंतर राज्यातील खरीप हंगाम तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी सीएम देवेंद्र फडणवीस, डीसीएम एकनाथ शिंदे , अजित पवार, माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली.  

Advertisement
May 21, 2025 15:55 (IST)

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मेलद्वारे देण्यात आली.  आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देणार असा धमकीचा मेल अज्ञात व्यक्तीकडून आला होता. हा मेल बाहेरच्या  राज्यातून आल्याची माहिती समोर येत आहे.  त्यानंतर कार्यालयातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं.  भर पावसात सातारा पोलिस आणि बॉम्ब स्कॉड पथक दाखल झालं आहे.  शोधकार्य सुरू आहे. दरम्यान  जिल्हा पोलिस प्रमुख समिर शेख यांनी फोनवर दिलेल्या माहितीवरून हे मॉग ड्रिल आहे असं त्यांनी सांगितलं. 

May 21, 2025 13:18 (IST)

Live Update : धाराशिव जिल्ह्यातील 36 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान

धाराशिव जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील छत्तीस गावातील नागरिक,शेतकऱ्यांना फटका बसलाय. यात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून शेतीतील आंबा, केळी , भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच वीज पडून दोन जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत. या अवकाळी पावसासह जोरदार वादळी वारा देखील असून यामुळे तब्बल 56 घरांची पडझड झाली आहे. सोबतच विजेचे खांब डीपी रस्त्यावरील झाडे उमाळून पडले आहेत यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाला आहे

May 21, 2025 10:28 (IST)

Live Update : वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शहरात चार ठिकाणी झाड कोसळली

वादळी वारे आणि पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरात आज जवळपास चार-पाच ठिकाणी मोठी झाड उनमडून पडली आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, जगताप डेअरी आणि चिखली या चार ठिकाणी झाड कोसळल्याची वर्दी अग्निशमन विभागाला प्राप्त झाली आहे. झाड कोसळल्यामुळे काही ठिकाणी चार चाकी वाहनांचे मोठ नुकसान देखील झाल आहे.

May 21, 2025 10:24 (IST)

Live Update : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस

वाशिम जिल्ह्यातील वाशीम रिसोड कारंजा मानोरा मालेगावसह मंगरुळपिर तालुक्यात काल रात्री दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पडत आहे. हा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

May 21, 2025 09:29 (IST)

Live Update : पाऊण तासाच्या मुसळधार पावसाने नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल

नाशिकमध्ये काल सायंकाळी पाऊण तासातच 30 मिलिमीटर पाऊस कोसळला. दरम्यान या पाऊण तासाच्या मुसळधार पावसानेच नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल केली आहे, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांना जणू नदीचे रूप आले होते तर पवित्र अशा रामकुंड आणि परिसरात गोदावरी नदीच्या पाण्यात जवळच असलेल्या चेंबर्स मधून गटारीचे पाणी थेट मिसळत होते. दरम्यान गोदा प्रदूषणाबाबत वेळोवेळी लढणाऱ्या देवांग जानी या गोदाप्रेमीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून गोदावरी नदी प्रदूषणावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये जातात तरी कुठे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दीड वर्षांनी याच गोदातीरी कुंभमेळा होत असून शासन गोदा प्रदूषणाबाबत  गंभीर नसल्याचं दिसून येतय..

May 21, 2025 07:35 (IST)

Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिपरिप

कर्नाटकच्या सागरी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काल संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. त्यानंतर रात्रभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आज सकाळपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. तर हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. 

May 21, 2025 07:31 (IST)

Live Update : नाशिकमध्ये 20 मेला पाऊण तासातच कोसळला 30 मिमी पाऊस

- नाशिकमध्ये 20 मेला पाऊण तासातच कोसळला 30 मिमी पाऊस 

- ताशी 25 ते 30 किमी होता वाऱ्यांचा वेग

- नाशिक हवामान खात्याची माहिती 

- पाऊण तासाच्या पावसाने नाशिकची झाली दैना

- अनेक ठिकाणी रस्त्यांना आले नदीचे रूप, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडेही कोसळली, नागरिकांची उडाली ताराबळ

May 21, 2025 07:28 (IST)

Live Update : अऱबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील या भागात पावसाचा अलर्ट

May 21, 2025 07:21 (IST)

Live Update : मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अलर्ट

May 21, 2025 07:17 (IST)

Live Update : अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.

22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

May 21, 2025 07:14 (IST)

Live Update : वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

नुकत्याच उद्घाटन झालेल्या सिंहगड रस्त्यावरील संपूर्ण उड्डाण पुलावर काल २० मेला प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

जवळपास २ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपुल आहे.

May 21, 2025 07:11 (IST)

Live Update : या जिल्ह्यांना गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे. 

गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर