जाहिरात
2 hours ago

मुंबईसह, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Live Update : धाराशिव जिल्ह्यातील 36 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान

धाराशिव जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील छत्तीस गावातील नागरिक,शेतकऱ्यांना फटका बसलाय. यात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून शेतीतील आंबा, केळी , भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच वीज पडून दोन जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत. या अवकाळी पावसासह जोरदार वादळी वारा देखील असून यामुळे तब्बल 56 घरांची पडझड झाली आहे. सोबतच विजेचे खांब डीपी रस्त्यावरील झाडे उमाळून पडले आहेत यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाला आहे

Live Update : वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शहरात चार ठिकाणी झाड कोसळली

वादळी वारे आणि पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरात आज जवळपास चार-पाच ठिकाणी मोठी झाड उनमडून पडली आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, जगताप डेअरी आणि चिखली या चार ठिकाणी झाड कोसळल्याची वर्दी अग्निशमन विभागाला प्राप्त झाली आहे. झाड कोसळल्यामुळे काही ठिकाणी चार चाकी वाहनांचे मोठ नुकसान देखील झाल आहे.

Live Update : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस

वाशिम जिल्ह्यातील वाशीम रिसोड कारंजा मानोरा मालेगावसह मंगरुळपिर तालुक्यात काल रात्री दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पडत आहे. हा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Live Update : पाऊण तासाच्या मुसळधार पावसाने नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल

नाशिकमध्ये काल सायंकाळी पाऊण तासातच 30 मिलिमीटर पाऊस कोसळला. दरम्यान या पाऊण तासाच्या मुसळधार पावसानेच नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल केली आहे, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांना जणू नदीचे रूप आले होते तर पवित्र अशा रामकुंड आणि परिसरात गोदावरी नदीच्या पाण्यात जवळच असलेल्या चेंबर्स मधून गटारीचे पाणी थेट मिसळत होते. दरम्यान गोदा प्रदूषणाबाबत वेळोवेळी लढणाऱ्या देवांग जानी या गोदाप्रेमीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून गोदावरी नदी प्रदूषणावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये जातात तरी कुठे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दीड वर्षांनी याच गोदातीरी कुंभमेळा होत असून शासन गोदा प्रदूषणाबाबत  गंभीर नसल्याचं दिसून येतय..

Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिपरिप

कर्नाटकच्या सागरी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काल संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. त्यानंतर रात्रभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आज सकाळपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. तर हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. 

Live Update : नाशिकमध्ये 20 मेला पाऊण तासातच कोसळला 30 मिमी पाऊस

- नाशिकमध्ये 20 मेला पाऊण तासातच कोसळला 30 मिमी पाऊस 

- ताशी 25 ते 30 किमी होता वाऱ्यांचा वेग

- नाशिक हवामान खात्याची माहिती 

- पाऊण तासाच्या पावसाने नाशिकची झाली दैना

- अनेक ठिकाणी रस्त्यांना आले नदीचे रूप, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडेही कोसळली, नागरिकांची उडाली ताराबळ

Live Update : अऱबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील या भागात पावसाचा अलर्ट

Live Update : मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अलर्ट

Live Update : अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.

22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

Live Update : वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

नुकत्याच उद्घाटन झालेल्या सिंहगड रस्त्यावरील संपूर्ण उड्डाण पुलावर काल २० मेला प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

जवळपास २ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपुल आहे.

Live Update : या जिल्ह्यांना गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे. 

गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर

Listen to the latest songs, only on JioSaavn.com