![POP Ganesha idols : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार! POP Ganesha idols : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार!](https://c.ndtvimg.com/2025-01/ah2nk1so_supreme-court_625x300_26_January_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती विसर्जनावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी गणेशमूर्तींच विसर्जन करू न देण्याची भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणात राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहे. या वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांच्यासह काही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली होती. प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन करू न देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने माघी गणेशोत्सवात घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित करण्यात आला.
नक्की वाचा - Political News : CM फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीचं कारणं काय? समजून घ्या राजकीय अर्थ
मशिदीवरील भोंगे काढण्याच्या आदेशाची पोलीस व अधिकारी अंमलबजावणी करीत नाहीत. मात्र मूर्तींवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात निर्माण होणारा संभाव्य पेच लक्षात घेऊन तातडीने सर्वोच्च न्यायालयाचे दार पुन्हा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world