जाहिरात

Political News : CM फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीचं कारणं काय? समजून घ्या राजकीय अर्थ

Raj Thackeray-CM Devendra Fadnavis Meet : शिवाजी पार्क येथील नियोजित कार्यक्रमाआधी देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा राज ठाकरेंच्या घरी वळवला. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

Political News : CM फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीचं कारणं काय? समजून घ्या राजकीय अर्थ

Raj Thackeray-CM Devendra Fadnavis Meet : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवसस्थानी जाऊन भेट घेतली. शिवाजी पार्क येथील नियोजित कार्यक्रमाआधी देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा राज ठाकरेंच्या घरी वळवला. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, भेटीचं कारण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

CM फडणवीस-राज भेटीचं कारण काय? 

दिल्लीच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर भाजपचं लक्ष मुंबई महापालिकेवर आहे. देशाच्या राजधानीत भाजपने 27 वर्षांतर सत्ता स्थापन केली आहे. आता देशाच्या आर्थिक राजधानीच्या महापालिकेची सत्ता मिळवण्याचं लक्ष्य भाजपचं आहे. यासाठीच्या मोर्चेबांधणीतून ही भेट झाली असण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा-  Saif Ali khan : जलद रिकव्हरी, रिक्षाने प्रवास, हल्ल्याबाबत संशय; सैफ अली खानने लोकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं दिलं उत्तर)

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राज ठाकरे महायुतीसोबत आले तर त्याचा फायदाच होणार आहे. यासाठीच्या संवादाची ही सुरुवात असावी. विधानसभेवेळी खूप उशीरा चर्चा झाल्याने त्यात काही निष्पन्न होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी आधीपासूनच सुरुवात झाली असावी. 

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राज्यात म्हणावं तसं यश मिळालं नाही. मात्र मुंबईत ठाकरे गटाची कामगिरी दमदार राहिली आहे. ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार मुंबईतील आहे. यावरुन ठाकरे गटाची मुंबईतील ताकद दिसून येते. अशावेळी महायुतीत आणखी काही बेरजेचं राजकारण करता येतं का याची चाचपणी सुरु झाल्याची चर्चा आहे.  

(नक्की वाचा- Suresh Dhas: सोमनाथ सूर्यवंशींना वेगळा न्याय का? सुरेश धसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चांना उधाण)

मुंबईकर आणि ठाकरे यांचा एक वेगळं नातं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या रुपात ठाकरे नाव महायुतीसोबत जोडलं गेलं तर याचा फायदा महायुतीला होईल. त्यामुळे राज ठाकरे सोबत असल्यास ते महायुतीची अतिरिक्त ताकद ठरतील, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु झाले असावेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Raj Thackeray, Devendra Fadnavis, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे