घड्याळाचा गजर, तुतारी थंड! शरद पवार विरुद्ध अजित पवार लढाईत कोण जिंकलं?

Maharashtra Assembly Election 2024:  लोकसभेला अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता, मात्र  आता विधानसभेला मतदारांनी अजित पवार यांच्या पारड्यात भरभरुन मतदान टाकले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचे निकाल आता हाती येत आहेत. प्राथमिक निकालानुसार मतदारांनी महायुतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष  म्हणून समोर आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झिट पोलमध्ये कुठेही आघाडीवर नसलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत शरद पवारांच्या तुतारीला धक्का दिला आहे.  लोकसभेला अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता, मात्र  आता विधानसभेला मतदारांनी अजित पवार यांच्या पारड्यात भरभरुन मतदान टाकले आहे. त्यामुळे विधानसभेच्या या रणसंग्रामात अजित पवार यांनी शरद पवारांवर मात केल्याचे दिसत आहे. 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्यासमोर नव्याने पक्ष बांधणीचे मोठे आव्हान होते. तुतारी हे नवे चिन्ह घेऊन शरद पवार मैदानात उतरले. लोकसभेला अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी 8 उमेदवार  निवडून आणले होते. लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावत कोणत्याही परिस्थितीत सत्ता बदलण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पिछाडी झाल्याचे दिसत आहे. 

नक्की वाचा: पुन्हा 23 नोव्हेंबर! संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा दिवस; 5 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला 19 ते 20 जागांवर विजय मिळताना दिसत आहे तर अजित पवार यांच्या पक्षाला 36 च्या वर जागा मिळताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे यांचा विजयही जाहीर झाला आहे. त्यामुळे लोकसभेनंतर अजित पवार यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारत साहेबांना जोर का झटका दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांना जवळपास 35 हजारांपेक्षा जास्त लीड मिळाले असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. शरद पवार यांच्याकडून मैदानात उतरलेले युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादीचे अजित पवार या काका पुतण्याच्या लढाईत अजित पवार हे बाजी मारणार असून राजकारणात नव्याने एन्ट्री केलेल्या युगेंद्र पवार यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. 

Advertisement

महत्वाची बातमी: देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर