जाहिरात

पुन्हा 23 नोव्हेंबर! संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा दिवस; 5 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळासाठी अन् पुढील पाच वर्षातील वाटचालीसाठी  निर्णायक ठरणार आहे. त्याआधी म्हणजे पाच वर्षांपूर्वी 23 नोव्हेंबर ही तारीख प्रचंड चर्चेत आली होती.

पुन्हा 23 नोव्हेंबर! संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा दिवस; 5 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

Maharashtra Vidhansabha Election Result: दोन महिन्यांचा प्रचार अन् मतदान संपल्यानंतर अखेर अंतिम फैसल्याचा दिवस उजाडला.  आज म्हणजेच 23 नोव्हेंबर ला राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे आजचा दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळासाठी अन् पुढील पाच वर्षातील वाटचालीसाठी  निर्णायक ठरणार आहे. त्याआधी म्हणजे पाच वर्षांपूर्वी 23 नोव्हेंबर ही तारीख प्रचंड चर्चेत आली होती.  नेमकं काय घडलं होतं? वाचा सविस्तर...

आज 23 नोव्हेंबर. राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल अन् सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याबाबतचा फैसला होणार निर्णायक दिवस. मात्र 23 नोव्हेंबरही तारीख राज्याच्या राजकारणात पाच वर्षांपूर्वीही प्रचंड चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. अशातच भल्या पहाटे झालेल्या शपथविधीने राज्याची झोप उडवली होती.

नक्की वाचा: 'मविआ'चा मुख्यमंत्री ठरला? काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याने जाहीरही केलं, 'निकालानंतर....'

2019 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार राज्यामध्ये येईल अशी शक्यता होती. मात्र शिवसेना अन् भाजपमधील चर्चेचे गुऱ्हाळ रखडल्याने मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चित्र स्पष्ट होत नव्हते. एकीकडे सर्व पक्षांमध्ये सत्तेची सुत्रे हाती घेण्यासाठी जुळवाजुळव सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 ला भल्या पहाटेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकीय इतिहासातील हा दिवस सर्वात नाट्यमय घडामोडींपैकी एक मानला जातो.

परंतु, भल्या पहाटे स्थापन झालेले हे सरकार काही जास्त काळ टिकू शकलं नाही. अवघ्या साडेतीन दिवसातच या सरकारला आपला कारभार गुंडाळावा लागला. त्यामुळेच हा पहाटेचा शपथविधी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील सत्तेवर कोण येणार? याबाबतचा फैसला 23 नोव्हेंबरलाच होणार आहे. आज विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहताना राजकीय जाणकारांना पुन्हा एकदा या पहाटेच्या शपथविधीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. 

महत्वाची बातमी: हॉटेल, चॉपर, चार्टर्ड प्लेन... निकालाच्या आधी सर्वच पक्षांची कशी आहे तयारी?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com