जाहिरात

Thane Water Cut : ठाण्यात 12 दिवस पाणी कपात! ठिकाण, तारीख अन् वेळ कोणती? सर्व 12 दिवसांची माहिती वाचा

ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा 20 टक्के कमी झाल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पुढील 12 दिवसांसाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

Thane Water Cut : ठाण्यात 12 दिवस पाणी कपात! ठिकाण, तारीख अन् वेळ कोणती? सर्व 12 दिवसांची माहिती वाचा
Thane City Water Cut News
मुंबई:

Thane Water Cut Latest Update : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. महापालिकेमार्फत भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी न्युटिक गेट सिस्टमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.यासाठी 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत न्युटिक गेट सिस्टमच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी खालावलेली असेल. परिणामी, ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा 20 टक्के कमी झाल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पुढील 12 दिवसांसाठी खालीलप्रमाणे पाण्याचे शटडाऊन घेऊन पाणी वितरणाचे नियोजन करण्यात केले आहे.

बुधवार 28 जानेवारी 

 गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा 28 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून 29 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. 

गुरुवार 29 जानेवारी 

 दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 9 वाजल्यापासून ते 30 जानेवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. 

शुक्रवार 30 जानेवारी 

शास्त्रीनगर नं 1 व २, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पाँड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 30 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून 31 जानेवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. 

शनिवार 31 जानेवारी 

लोकमान्य नगर पाडा नं ३ व ४, इंदिरानगर, सावरकररनगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुनागाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 31 जानेवारी 9 वाजल्यापासून 1 जानेवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 
तास बंद राहणार आहे.

नक्की वाचा >> "ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही...", बाळासाहेबांच्या 100 व्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

रविवार 1 फेब्रुवारी

लोकमान्य नगर पाडा नं १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं २, शास्त्रीनगर नं २, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इंटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णु नगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हन सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा 1 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 2 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

सोमवार 2 फेब्रुवारी 

बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रम्हांड, रुतु सिटी, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकर अली, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्पलेक्स, आंबेडकर नगर, क्रांती नगर, साकेत कॉम्पलेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बस स्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी १ व २. आकाश गंगा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 2 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास तास बंद राहणार आहे.

मंगळवार 3 फेब्रुवारी 

माजीवाडा, मानपाडा, कोठारी कंपाऊड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुनवाल, डोंगरीपाडा, विजयीनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली परिसरातील पाणी पुरवठा 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 4 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

नक्की वाचा >> राज्यभरात या लग्नाची चर्चा! फक्त 150 रुपयांत पार पडलं माजी आमदार कन्येचं लग्न, नवरा-नवरीने घेतला मोठा निर्णय

बुधवार 4 फेब्रुवारी 

गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा 4 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 5फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

गुरुवार 5 फेब्रुवारी 

दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा 5 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 6 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. 

शुक्रवार 6 फेब्रुवारी 

शास्त्रीनगर नं 1 व २, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पौंड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 6 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 7 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. 

शनिवार 7 फेब्रुवारी 

 लोकमान्य नगर पाडा नं १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं २, शास्त्रीनगर नं २, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर परिसर, परबवाडी इटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा 7 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 8 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

वरील कामामुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com