जाहिरात

नव्या सरकारचा 'कारभार'ही जोरदार! हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस अन् डिजीटल; तारीख ठरली!

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्याही तयारीची लगबग सुरु झाली आहे. मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्येही संपूर्ण पेपरलेस अन् डिजीटल कामकाज सुरु होणार आहे. 

नव्या सरकारचा 'कारभार'ही जोरदार! हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस अन् डिजीटल; तारीख ठरली!

संजय तिवारी, नागपूर: विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्याही तयारीची लगबग सुरु झाली आहे. मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्येही संपूर्ण पेपरलेस अन् डिजीटल कामकाज सुरु होणार आहे. 

नागपूर येथे विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात मुंबई येथील विधान भवनातील दोन्ही सभागृहाच्या कामकाज प्रमाणे पेपरलेस व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक टेबलवर अत्याधुनिक स्क्रीन आणि कंट्रोल व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे दररोज कामकाजाचे कागद, सारे अहवाल स्क्रीनवर उपलब्ध असतील. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाची तयारी सध्या पूर्ण झाली आहे. 

नक्की वाचा: 'गृहमंत्रीपद मिळणार नाही...', भाजपकडून एकनाथ शिंदेंना निरोप? 'या' 3 खात्यांमुळे तिढा सुटेना

या अधिवेशनात प्रत्येक डेबलवर डिजीटल प्रणाली असणार आहे. त्यामुळे  एखाद्या प्रस्तावावर सभागृहातील बहुमत कुणाकडे आहे ते पाहण्यासाठी आता मुंबई प्रमाणे नवीन प्रणाली असेल. हात उंचावून किंवा व्होटिंग पॅडऐवजी आता टेबलवरच येस, नो आणि अबस्टेन म्हणजे गैरहजर अशी बटने उपलब्ध करण्यात आली आहेत. ही व्यवस्था मुंबईत दोन अधिवेशनापूर्वी करण्यात आली आहे. तसेच नव्या संसद भवनाच्या सेन्ट्रल विस्टा आणि केरळ येथील विधी मंडळ सभागृहात हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

कधी होणार हिवाळी अधिवेशन?

राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन फक्त  5 दिवसांचे असेल. प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिले अधिवेशन कमी दिवसांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नव्या सरकारचे पहिले अधिवेशनही जोरदार होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

विरोधकांचा कस लागणार? 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून तब्बल 230 जागा जिंकत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला असून विरोधकांना फक्त 46 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेता नसेल. एकीकडे 230 सत्ताधारी आमदारांची फौज असताना 46 विरोधी बाकावर बसणाऱ्या आमदारांचा चांगलाच कस लागणार असल्याचे दिसत आहे. 

महत्वाची बातमी: एकदाचं ठरलं! 5 तारखेला 5 वाजता आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com