राहुल कुलकर्णी, राहुल कुलकर्णी: 2024 चे वर्ष संपायला अन् नवे वर्ष सुरु व्हायला काह दिवस उरलेत. नव्या वर्षाच्या स्वागताला तरुणाई सज्ज झाली असून थर्टी फस्टच्या पार्टीची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील किल्ले आणि पर्यटन स्थळांवर थर्टी फर्स्ट (31 डिसेंबर) च्या पार्टीसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही नियमावली महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने जारी केली असून, पर्यावरण संरक्षण व सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहेत.
प्रमुख नियमावली:
1. पर्यावरण संरक्षण:
• किल्ल्यांवर प्लास्टिक, थर्माकोल व अन्य प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचा वापर पूर्णतः प्रतिबंधित आहे.
• किल्ल्यांच्या परिसरात कचरा टाकणे किंवा फेकल्यास कडक कारवाई केली जाईल.
2. अल्कोहोल व पार्टीसाठी परवानगी:
• कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, धुम्रपान किंवा नशापानावर पूर्णतः बंदी आहे.
• पार्टीसाठी मोठ्या आवाजातील संगीत, डीजे किंवा साऊंड सिस्टीम वापरणे प्रतिबंधित आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
3. सुरक्षेचे नियम:
• किल्ल्यांच्या संवेदनशील भागांवर चढणे, किल्ल्यांचे अवशेष तोडणे, भिंतीवर रंगकाम/लेखन करणे किंवा नुकसान पोहोचवणे यावर कठोर बंदी आहे.
• सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन व वन विभागाकडून सर्व पर्यटकांवर नजर ठेवली जाणार आहे.
4. आग व फटाके:
• किल्ल्यांच्या परिसरात फटाके उडवणे किंवा शेकोटी पेटवणे पूर्णपणे निषिद्ध आहे.
• आगीमुळे किल्ल्यांच्या पर्यावरणास व ऐतिहासिक रचनेला धोका होऊ शकतो.
5. पर्यटन विभागाकडून परवाने:
• मोठ्या गटांना किल्ल्यावर जाण्यासाठी स्थानिक प्रशासन व पर्यटन विभागाकडून आधी परवानगी घेणे बंधनकारक असेल.
• बिना परवानगी प्रवेश करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जाईल.
6. नियम मोडल्यास दंड:
• नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा कायदेशीर कारवाई केली जाईल.
• पर्यटन स्थळांवरील सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस आणि गृहरक्षक दल तैनात असतील.
7. किल्ल्यांची वाहतूक आणि गर्दी नियंत्रण:
• काही निवडक किल्ल्यांवर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येतील.
• गर्दी नियंत्रणासाठी गटागटाने प्रवेश दिला जाईल.
ट्रेंडिंग बातमी - संतोष देशमुख हत्या! आरोपी बरोबर काय संबंध? धनंजय मुंडे पहिल्यांदाच थेट बोलले
नियम लागू होण्याचे कारण:
• किल्ले हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा असून, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पार्ट्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.
• पूर्वी किल्ल्यांवर फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.
• स्वच्छता, सुरक्षा आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी सूचना:
• किल्ल्यांवर भेट देणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छता राखावी, कचरा सोबत नेऊन योग्य ठिकाणी टाकावा.
• स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
• नियमांचे उल्लंघन टाळून पर्यटनाचा आनंद शांततेत व सुरक्षित पद्धतीने घ्यावा.
या नियमावलीमुळे पर्यटकांना किल्ल्यांवर सुरक्षित व सुखकर अनुभव मिळेल तसेच किल्ल्यांचा ऐतिहासिक व पर्यावरणीय वारसा जपला जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world