जाहिरात

Jayant Patil: "चीनमधून बेदाण्यांची बेकायदेशीर आयात, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ"; जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, "एकीकडे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आणि त्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. तर दुसरीकडे, हे सरकार चीनमधून बेदाणा आयात करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे."

Jayant Patil: "चीनमधून बेदाण्यांची बेकायदेशीर आयात, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ"; जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

चीनमधून होणाऱ्या बेदाण्यांच्या बेकायदेशीर आयातीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. या मुद्द्यावर सरकारची उदासीनता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सांगलीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "पावसाळी अधिवेशनात मी स्वतः हा मुद्दा सरकारसमोर मांडला होता, पण त्यावर कोणताच निर्णय घेतला गेला नाही. यामुळे सरकार या विषयावर गंभीर आहे की नाही, असा प्रश्न आम्हाला पडतो आहे."

(नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप)

'चीनच्या बेदाण्यांमुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले'

यावर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत बेदाणा उत्पादनही कमी झाले आहे. अशातच, चीनमधून कर चुकवून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात होत आहे. या दुहेरी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि देशाच्या परकीय गंगाजळीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे पाटील यांनी सांगितले. या आयात बेदाण्यांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

सांगलीसह नाशिक, जळगाव आणि सातारा या भागांमध्ये मोठ्या संख्येने द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सरकारने उत्पादित केलेल्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

(नक्की वाचा-  PM मोदी- एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली; वाचा भेटीची Inside Story)

सरकारवर गंभीर आरोप

जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, "एकीकडे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आणि त्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. तर दुसरीकडे, हे सरकार चीनमधून बेदाणा आयात करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे." शासनाची ही उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने बेकायदेशीर आयात झालेल्या बेदाण्याची विक्री थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com